Skip to main content

संतुर्की-- संत्या आणि सुरकीची गोष्ट

*संतुर्की*
संत्या आणि सुरकीची गोष्ट,,
मराठीतील वेब सिनेमा,,

खूपच छान सिनेमा,,,

कुठे ही जाती व्यवस्थेवर दगड फिरकवला जात नाही,,
खूप मोठा डायरेक्टर नाही,,
परदेशी लोकेशन नाही,,
प्रसिद्ध गीतकार सोबत नाहीत,,
गरीब श्रीमंत असा रोजचा घीसापिटा फॉर्म्युला नाही,,
20 वर्षांपूर्वीचा बापाच्या खुनाचा बदला वैगेरे,,
भूत भुताटकी,
देव देवतांवर टीका,,,
हिंदू धर्मावर टीका,,
अस्स काहीही नाही,,,
उंच पुरा तगडा हिरो
2 पीस मधील हिरोईन
महागड्या गाड्या
त्यांची तोडफोड
जुडो कराटे येणारा सर्वगुणसंपन्न हिरो मटेरियल नाही
दारू सिगरेट मोबाईल यांची रेलचेल नाही
*आणि तरीही दोन तास सिनेमा तुम्हाला धरून ठेवतो*
मोठी शाळा कॉलेजेस नाहीत
भारी गुळगुळीत रस्ते नाहीत
आणि *आयटम सॉंग* तर बिलकुल नाही
*आणि तरीही दोन तास सिनेमा तुम्हाला धरून ठेवतो*
सहज साधं निर्मळ प्रेम
कुठेही त्याचा अतिरेक नाही
तू माझी नाही तर कुणाचीही होणार नाही ही भूमिका नाही
आजच्या पिढीच नेतृत्व कबीर सिंग प्रेमभंगात दारुडा हिंसक होतो आणि लोकांना तो आवडतो ही😏
त्या कबीर सिंग वाल्यांनी तर हा सिनेमा तर आवर्जून पहावा
अरे प्रेमाचा पाया त्यागावर पण त्या त्यागाच ही मार्केटिंग या सिनेमात नाही
*आणि तरीही हा सिनेमा तुम्हाला दोन तास धरून ठेवता*
हो फक्त न कळतपणे
श्री अरविंद जगताप यांची राजकरणाविषयीच असलेलं मत मात्र अधोरेखित करतो
संतुर्की,,,,
आहे तो फक्त कॅमेरा जो राज साहेबांनी या संतुर्कीच्या टीम ला दिला आणि त्या एका कॅमेऱ्यावर नितांत सुंदर चित्रपट त्यांनी चित्रित केला
*संतुर्की*
अर्रे देवा सगळं रामायण सांगितलं,,,,
पण
अरे हो
नायक नायिका राहिलीच की,,,🤔❓
साईड हिरो हिरोईन सुंदर दिसावेत इतके साधे हिरो हिरोईन,,, अगदी तोंडावर मुरूम असलेले आणि तरीही
*सिनेमा दोन तास तुम्हाला धरून ठेवतो*
तर मग आवर्जून पहाच
संतुर्की,,, संत्या आणि सुरकीची ही गोष्ट,,,
संतुर्की
हो 😊 आता गोष्ट सांगितली तर तात्पर्य तर आलाच,,,,

खर तर एका ओळीच,, छोड दो ,, कवटाळून बसू नका पुढे जात रहा आपल्याच लोकांचा रस्ता हट्टाने अडवून बसू नका,,
एक साधू शिष्यां सोबत मार्गक्रमन करतअसता रस्त्यात एक बाई नदी किनारी  बसली होती विचारपूस करता कळलं की तिला नदीपार जायचं आहे तस त्या साधूने तिला खांद्यावर घेतलं आणि नदीपार सोडलं,,,
इकडे शिष्य विचार करत बसले की दिवसभर हा गुरू तर ब्राम्हचर्याच्या गोष्टी करत असतो आणि इकडे एक परस्त्रीला खुशाल हात लावतो,,😏❓
तेव्हा एका शिष्याने न राहवून विचारलेच की हे कसं?
तेव्हा गुरू म्हणाले त्या परस्त्रीला तर मी केव्हाच नदीपार सोडून आलोय मात्र नसलेलं ओझं तुम्ही अजूनही तुमच्या ओझं खांद्यावर वाहताय *तुमच्या दुःखाच तुमच्या कवताटाळण्यात आहे सोडून द्या*

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...