Skip to main content

परशुरामांचा शाप आणि मोडिशा राजकारण

परशुरामांचा शाप आणि मोदीशा राजकारण,,,

परिस्थितीने केवळ सुत पुत्र असा शिक्का बसलेला कर्ण जेव्हा धनुर्विध्या शिकायचं ठरवतो कारण उद्याच्या संभाव्य युद्धात तोच एक अर्जुनाला भारी पडेल असा प्रतिस्पर्धी असतो त्या प्रमाणे सगळ्यांकडे जातो हात जोडून विनंती करतो परन्तु वेगवेगळी कारण देत त्याच शिक्षण नाकारलं जात शेवटी तो भगवान परशुरामांकडे जातो,, आणि मी ब्राम्हण आहे मला धनुर्विद्या शिकवा अस खोट बोलतो,,
भगवान परशुराम त्याला शिकवतात देखील,
परंतु एकदा दोघे अरण्यात गेले असता दुपारच्या रणरणत्या उन्हात दोघे सावली खाली बसले असता श्री परशुराम कर्ण| च्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जातात आणि खाड्या वेळाने एक भुंगा येतो आणि त्याच्या मांडीला चावतो , आता त्याला हाकलाल तर गुरूंची झोप मोडेल या विचाराने कर्ण त्या भुंग्याच्या चावण्याकडे दुर्लक्ष करतो परन्तु थोडं थोडं म्हणत तो भुंगा त्याची मांडी पोखरून काढतो ते रक्त सगळीकडे पसरत ते गार गार रक्त जेव्हा परशुरामांच्या बाजूनं जात त्या गारव्याने त्यांना जाग येते
बघतात तो कर्ण अगदी ते सारं सहन करत शांत बसला आहे तेव्हा त्यांच्या लक्षात येत हे सारं सहन करायची ताकद साधारण ब्राम्हणात नाही आणि मग रागावून विचारल्या दरडावून चौकशी खर खोटं केल्यावर ते त्याला शाप देतात की,, *जा मला फसवून तू ही जी विद्या माझ्या कडून शिकलास तीच विद्या तुला ऐन वेळी दगा देतील तुझा स्मृती भ्रंश होईल मी शिकवलेलं तुला काही एक आठवणार नाही,,,,*
तात्पर्य:-
आजच्या मोडिशा राजकारणाने सुद्धा जनता रुपी परशुरामाला फसवलं आहे ज्या काँग्रेस ला संपवून हा देश काँग्रेसमुक्त करायचं वचन दिले होते त्याला न जागता
सारी काँग्रेस,,,
सारे देव द्रोही,,,
सारे हिंदुत्व विरोधक,,,
सारे भगवा विरोधक,,
सारे गांधी समर्थक,,,
सारे प्रादेशिक पक्ष संपवत साऱ्या रावणाच्या नाभीवर हल्ला करायच्या ऐवजी त्याची मुंडकी उडवत आपल्यात सामील करत आहेत मुंडक्यांना जीवदान देत ,, *पुन्हा काँग्रेसचीच हिंदू द्रोह्यांची ताकद वाढवत आहेत*
जनतेला दिलेल्या शब्दाशी फारकत घेत आहेत
*पण काळजी नको*
ही परशुराम रुपी जनता असल्या खोटरड्यांची मतदानाच्या या युद्धात त्यांचा स्मृतिभ्रंश केल्या शिवाय राहणार नाही
*हा श्री परशुरामांचा शाप आहे खोटं बोलून, फसवून, कमावलेली मग ते विद्या असो वा धन आयत्यावेळी दगा दिल्या शिवाय राहणार नाही मग भले सांम दांम दंड भेद करत विरोधी पक्षाला फोडून आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद  वाढवली या भ्रमात राहत आपल्या खोट्या दिग्विजयाचा रथ कुणी ना कुणी तरी बिकट प्रसंगी अडवल्या शिवाय राहणार नाही हे मोडिशा प्रवृत्तीने आणि समर्थक भक्तांनी आजच लक्षात घेतलं तर बरं कारण तो शाप परशुरामांचा आहे तो कधीही खोटा ठरत नाही*

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...