Skip to main content

Posts

द्रष्टे गोवळकर गुरुजी

  १९३२ -३३ चा काळ होता बनारस हिंदू विद्यालयात एक सभा चालू होती . पंडित मदन मोहन मालवीय व्याख्यान देत होते ,,,,, विषय होता "हिदुस्थान हिंदूंचा",,, मालवीयजी बोलू लागले देशात जे लोक बहुसंख्येने जास्त असतात ज्या समाजाचे लोक जास्त असतात देश त्या सामाज्याचाच असतो . आणि येथे हिंदूंची संख्या जास्त असल्या मुळे हा देश हिंदूंचाच आहे . या पवित्र भूमीचे नाव हि हिंदुंवरून हिंदुस्थान असेच आहे . आणखी हि बरेच जोरदार दाखले दते त्यांनी हा देश हिंदूंचाच हे सभेला पटवून देत होते . आणि टाळ्यांचा कडकडात झाला  आणि त्याच कडकडात एक मुलग उठून उभा राहिला आणि म्हणाला महाराज मी आपल्या मताशी सहमत नाही २७ वर्षाचा तो तरुण म्हणजे गोवळकर गुरुजी होते ते,,,,,,,,,, पंडितजींनी विचारले ते कस काय? तू का सहमत नाही? हिन्दुस्थान हिंदूंचा या सिद्धांताला तुमचा विरोध आहे का? तेव्हा गुरुजी म्हणाले सिद्धांताला विरोध असण्याच  कारणच नाही मी स्वतः हिंदू राष्ट्रवादी आहे ,या देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे . हिन्दुस्थान हिंदूंचाच हे माझेही ठाम मत आहे . पण हिंदू बहुसंख्य म्हणून हिदुस्थान हिंदूंचा हे मा...

आही सारे शिक्षित अडाणी

||मातृ देवो भवः|| सार्या शिक्षित अडन्यांच्या चरणी,, काल परवा मदर्स डे साजरा केला आपण सर्वांनी काही तरी त्या निमित लिहाव असा वाट होत पण भट्टी जमत नव्हती आणि ,,, मघाशीच कलर्स वरील बालिका वधू हि सिरीयल पाहत होतो त्यातील प्रसंग ,,, जग्याची आई त्याला शोधत शोधत मुंबईत येते ,, आणि त्याची विनवणी करते कि,, आनंदी कशी तुझी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहे तिने तुझा जीव वाचवल आहे निदान त्याची तरी लाज बाळग अस परोपरीने सांगते ,, आम्हाला सार्यांना कशी तुझी गरज आहे तुझी दादी मां वाट पाहतेय वैगेरे वैगेरे,,,,,, पण जग्या ढिम्म ,,, उलट तोच आईला सांगतो तू मला समजून घे सारेच मला दोषी समजतात आधी वडील आले ते मला बोल लवून गेले आता तू मला बोल लावत आहेस,,,वैगेरे वैगेरे तेव्हा आई म्हणते जग्या अरे तू लहान होतस ना ! तुला बोलता हि येत नव्हत आणि मला तेव्हाही तुला काय पाहिजे तुझ काय म्हणन आहे ते समजत होत,,,,,, आता एक तर तू खूप मोठा झालायस आणि मी अडाणी अशिक्षित तुझ हे तर्कट माझ्या नाही लक्षात येत अस म्हणत हमसून हमसून रडत होती ती जग्याची आई ,,,,,,,,, डोळ्यात पाणी आल अक्षरशः ,,,, आणि साधारण १०...

औरंगी औलाद

हि गोष्ट आहे गोविंद बुवा आफळे यांनी सांगितलेले त्यावेळी न टीव्हीच प्रस्थ होत न टीव्ही च्यानेलच नकी त्यांच्या टीआरपीच आणि अशा वेळी आकाशवाणी हेच एकमेव साधन होत लोकांपर्यंत पोहचायचं ,,,,,,,,, आणि आकाशवाणीच्या आमंत्रणावरून गोविंदबुवा आफळे आजचे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे वडील ,,,, त्यांनी हि गोष्ट जाहीर पणे आपल्या कीर्तनात सांगितली होती , आणि त्याचा पुरावा आजही आपण ठायी ठायी घेत आहोत , तर घडल अस ,,,,,,,, आफळे बुवा सांगत होते ,पापी औरंगजेबाची  गोष्ट ,,,,,, वयोमानानुसार आणि हिंदूंच्या कडव्या प्रतिकाराला हार जात जात त्याची तब्येत आधीच बिघडली होती.त्यातून त्याला एक गोष्ट सतावत होती तो हरामखोर सिवा ,तो बदमाश संभाजी मी स्वतःच्या हातानी मारला तर हा महाराष्ट्र मला का जिंकता येत नाही ,,,, राहून राहून हा प्रश्न त्याला सतावत होता ,,,आणि अशाच कातर वेळी  विचार करत बसला असता  अल्लाहचा एक शिपाई त्याच्या कडे आला आणि आणि म्हणाला महाराज आपली वेळ भरली आपल्याला अल्लाह कडून बोलावण आला आहे कृपा करा आणि निघायची तयारी करा ...... हे ऐकताच औरंगजेब आपल्या शयन गृहात जा...

झाड ,माणूस आणि प्रेमाचे चार शब्द

आज सक्काळी सक्काळी माझ्या मित्राने मला सुंदर sms केला ,,,,,, diffrence between god & human god- gives,gives,& 4gives man-gets,gets & 4 gets आणि हि गोष्ट आठवली ,,, ,, हि गोष्ट आहे स्वतःचाच विचार करणाऱ्या माणसाची आणि नंतर पस्तवनार्या माणसाची हि गोष्ट आहे प्रेमाच्या चार शब्दांची आपुकीच्या नात्याची एका गावात एक आंब्याच झाड होत खूप बहरलेल त्या झाडाखाली एक अनाथ मुलगा रोज त्याच्याशी खेळायला गप्पा मारायला येत असे तो मुलगा झाडावर चढायचा उतरयाचा आंबे तोडायचा त्या झाडाला त्याच हे त्याचाशी एक रूप होवून खेलना बर वाटत असे,,,, त्याला हि त्याची काळजी वाटत असे त्याला खाली पडून देत नसे त्याची गार गार सावली देत असे, दिवस चालले होते हळू हळू तो मुलगा मोठा झाला तसा तसा तो झाडा पासून दुरावू लागला त्याच्या कडे येईनसा  झाला झाडाला त्याची खूप खूप आठवण येत असे,,,, आणि एकेदिवशी तो मुलगा त्या झाडाकडे आला , झाडाने त्यला विचारलं कारे मित्रा हल्ली तू ये नाहीस माझ्याशी खेळायला,,? तस उर्मट पणे त्याने झाडाला सांगितलं आता तुझ्याशी खेळायला मी काही लहान राहिलो नाही समजल,,,,,,? आ...

दारू तीच बाटली बदललेली ,,,,,,

मी गेली काही वर्ष कच्छाला जातो,,,        येथील मां आशा पुराच्या निमित्ताने साधारण दोन वर्षांपूर्वींची गोष्ट आहे सहज एका माणसाबरोबर ओळख झाली आणि गाडीत गप्पा सुरु झाल्या आणि थोड्याच वेळात त्याला एक sms आला त्यात अस लिहील होत "हा sms १० जणांना पाठवा तुमच भल होईल वैगेरे वैगेरे आणि ज्यानी ह्या sms कडे दुर्लक्ष केल त्याचं कस वाटोळ झाल"  हा sms त्याने मला आवर्जून वाचून दाखवला कारण हा sms त्याला एका राजकीय पुढार्याच्या मोठ्या मुलाने पाठवला होता , मग आमच मग हे कस चुकीच आहे वैगेरे गप्पा सुरु झाल्या ,,,,,,, झाल त्यानानातर हा विषय मी पूर्णतः विसरून गेलो पण आज शनिवार सक्काळी सक्काळी मला पुन्हा असाच sms आला  आणि त्यात सार वरील प्रमाणेच लिहील होत , माझ्या स्वभावाला अनुसरून मी त्याल दम वैगेरे दिला रागावलो  हि ,,,,, आणि अचानक मला माझ्या लहान पणाचे दिवस आठवले मी लहान असताना संतोषी मत नावाचा सिनेमा खूप प्रसिद्ध झाला होता . ज्याच्या त्याच्या घरी दरी शुक्रवार पाळण्यात येत होता मग त्या दिवसाची नवलाई आंबट चिंबट खावू नये वैगेरे वैगेरे,,,,, लहान होतो ...

देवाची लीला लाकूडतोडया,मुलगा, आणि त्याची बायको

लाकूडतोड्याची गोष्ट तुम्हाला माहितच आहे विहिरी काठी लाकड फोडताना पाणी प्यायला गेला असता त्याची कुर्र्हाड विहिरीत पडते गरीब बिच्रा लाकूडतोड्या मग देवाचा धावा करतो देव येतो आणि विहिरीत बुडी मारतो आधी सोन्याची,चांदीची अशा ५\६ कुर्र्हडी काढतो लाकूड तोड्या गरीब असला तरी प्रामाणिक असतो तो त्या कुर्र्हडी नाकारतो आणि सांगतो देवा माझी कुर्र्हाड साधी आहे त्यामुळे ह्या कुर्र्हडी माझ्या नाहीत . देव त्याच्या या प्रामाणिक पणावर खुश होवून त्या सर्व कुर्र्हडी बक्षीस देतो गरीब लाकूड तोड्या श्रीमंत होतो,,,,,,,,, त्याच लाकूड तोड्याचा मुलगा आपल्या बायकोला घेवून एकदा गावी येतो . आणि मग परत ते जुने दिवस आठवले जातात त्या मुलाच्या बायकोला हे सर्व ऐकल्यावर ती विहीर पहायची ईच्छा होते ज्या मुळे आपल्या सासरची भरभराट झाली,,, नवर्या कडे ती हट्ट धरते ती विहीर मला दाखवा मुलगा ती विहीर दाखवायला घेवून जातो    ' अय्या किती खोल आहे ' असे म्हणत असतानाच  जाउन ती विहीरीत पडते . आता देवाचा धावा करण्याची पाळी लाकूडतोड्याच्या मुलाची असते ! देव हि लगेच भक्ताच्या हाकेला ओ देतो देव व्हीरीत बु...

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता,,,,,,,,?

तर हि गोष्ट आहे संत एक नाथांची एकदा नदीवर  स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (हिरवा मुसलमान) त्यांच्यार थुंकला त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली अस १०८ वेळा घडल नाथांनी  न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले शिक्षकांनी हि गोष्ट वर्गात  सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का? असा प्रश्न केला ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली,,, १-नाथ किती महान होते ते कळत २-नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते ३ -माणसाने कस वागाव ते हि गोष्ट शिकवत ४ -एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका ५ -रागावून त्रास तुम्हालाच ६ -शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वरच ७ -दुसर्लाया माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता शिक्षकांनी त्याला विचारले तू काही उत्तर देत त्यावर तो विद्यार्थी उठून उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली पण ...

गोष्ट रंगांची ,,,

दैनिक सकाळ ,दिनांक २१.३.११ स्पृहा जोशी यांनी हि कविता लिहिली आहे खूप खूप वर्ष पूर्वीची गोष्ट आहे रंगपंचमीच्या दिवशी सगळे रंग एकत्र जमायचे ईंद्र धनुष्याच्या कमानीखाली धम्माल करायचे . माणसाला तेव्हा म्हणे रंग म्हणजे काय ते कळतच नव्हते,, त्या दिवशी रंग रंगपंचमी खेळताना ,,,,,, एक माणूस त्यांना कोरडा दिसला , हसू विसार्ल्यासारखा,, रंगानं खूप वाईट वाटल , त्यांनी ठरवलं कि याचा आयुष्य रंगांनी भरून टाकायचं , आयष्य रंबिरंगी झाल कि तो हि हसायला लागेल,,,,,,, त्याला हि भावना कळतील, ईन्द्रधनुश्य  होईल त्याच जगण लाल रंग म्हणाल मी सळसळता उत्साह देईन,,,,,, नारंगी म्हणाला मी देईन उर्जा शिकवेन त्याग ,,, पिवळा म्हणाल मी देईन स्वच्छ विचार न अडखळनारे  ,, हिरवा म्हणाल मी देईन आनंद भरभराट ,,, निळा शांतपणे म्हणाल मी देईन शांती, आणि देईन ओढ असिमाची,,,,,,, पारवा दूर बघत म्हणाला ,,, माझ्या मुले शिकतील हे शहाणपण आणि सुखाने विलीन होतील अनंतात ,,, जांभळ्याने या सगळ्यांचे हात हातात घेतले आणि म्हणाला, मी देईन यांना पूर्णत्व ,,, सारे रंग आनंदले त्यांनी आपल्याकडच हा ठेवा माणसाला बहाल क...

आई, असं का ग केलंस?...

(मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र...) उरिया भाषेतील लेखक... श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक  हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं.  काय करावं ते सुचेना.त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून  ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं...... उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी. ?????????????????????????????????????????????? आई, असं का ग केलंस?????????? का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का?  तू असं का केलंस? मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते;  पण तू मला मारूनच टाकलस. तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते.  आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला. माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं,  ते फक्त तुझ्याचमुळे ग. आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा,  तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस...

गरीब कोण ?

अर्थात नजरेचा फरक ,,,,,, एकदा एक अति श्रीमंत माणूस आपल्या मुलाला जवळच्याच एका खेड्यातल्या शेतावर गेला, तिथली ती गरिबी त्यालोकांच दारिद्र्य आपल्या मुलाने अनुभवाव म्हणून तो त्याला घेवून गेला , आणि मग त्याला आपल्या संपत्तीच महत्व आणि अपूर्वाई आपोआप कळेल .त्यामुळे त्याला आपल्या श्रीमंतीचा सदैव अभिमान राहील असा विचार करून त्या खेड्यात त्या मुलाला तो घेवून आला होता. ते दोघ बाप लेक त्या गरीब शेतकऱ्याच्या शेतावर दोन दिवस राहिले . आणि मग आपल्या गहरी परतल्यावर त्या बापाने आपल्या श्रीमंती गुर्मीत विचारले काय मग कशी वाटली ट्रीप? बघितलस ना गरीब लोक कस जगतात ? यावर तो मुलगा म्हणाला हो हि ट्रीप मला खूपच आवडली, आणि लक्षात  आल कि आपणच त्यांच्या पेक्षा जास्त गरीब आहोत,,,,,, हे ऐकून बाप बेशुद्ध व्हायचा तेव्हडा बाकी होता,,, बाप म्हणाल ते कस काय? मुलगा म्हणाला आपल्याकडे एक कुत्रा आहे ,त्यांच्या कडे चार कुत्रे आहेत, आपल्या अंगणात पोहायचा छोटासा तलाव आहे त्यांच्या कडे खूप मोठी खाडी आहे , ती कुठे संपते ते दिसतच नाही, आपल अंगण गेट पर्यंत आहे त्याचं अंगण क्षितिजाला जावून टेकल आहे, आ...

पत्रास कारण कि , ,,,,,,

||श्री|| ||खंडोबा प्रसन्न|| स.न.वि.वि. प त्रा स कारण कि , मित्रांनो खूप वर्ष लोटली,  कु णाचे मला पत्र आले नाही कि  मी कुणाला पाठविले नाही. तुम्ही शेवटचे आंतरदेशी पत्र , पोस्टकार्ड कुणाला पाठवले?  किंवा तुम्हाला कुणाचे आले? जर आठवून पाहा . .! आज कपाट साफ करता करता एक पोस्टकार्ड फाईल मधून खाली पडले . . आणि गहीवरुन आले . . एक काळ होता किती महत्त्व होते . .या पोस्टकार्ड, आंतरदेशी पत्र ,चिठ्ठी, तार यांना . . यांच्या शिवाय माणसांची नाती एकमेकांत घट्ट राहणे मुश्किल होते . . काकांचे, मामांचे ,आजोळचे पत्र आले की ते वाचताना  सर्व मंडळी कशी त्या पत्रात डोळ्यासमोर साक्षात उभी राहत . . त्या काळी आम्हा लहान मुलांचा पण खूप रुबाब होता .  त्यावेळी मी चौथी ,पाचवीला असेन . रस्त्यावर कुठे पोस्टमन कुणाचे घर शोधत असला तर . . लगबगीने ओ काका मला माहीत आहे त्यांचे घर . .चला मी दाखवतो . . मग त्यांना त्या घरी नेऊन शाबासकी मिळवायची . . जर त्या घरात कुणाला वाचता येत नसेन तर आपला रुबाब अजून वाढला . . ऐ पिंटू हे पत्र वाच जरा कुणाचे आले आहे ? मग त्यांना ते वाचून दाखवून...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

नीती आणि मूल्य

काल दुपारी मी रेडिओवर एका तळ्यात होती बदके पिले सुरेख हे गाण ऐकत होतो आणि नकळत त्या गाण्यात गुंतत गेलो खूप छान गाण आहे ते स्वतःची ओळख करून देणारे ,, स्वतःला जागे करणारे ,आपण कुणी तरी वेगळे आहोत मग कुणी का किती टिंगल करेना आपण आपला मार्ग सोडायचा नाही , जमेल तितक स्वतःला आरशात पाहायचं कारण मनुष्याचा खरा मित्र कोण असेल तर तो आरसा . या आरशात डोकावलं कि तुम्ही कोण आहात ते कळत. स्वत्वाची जाणीव होते स्वतःच वेगळेपण जाणवत , अशावेळी ज्याला जाणीव झालीय स्वत्वाची स्वतःत असलेला राजहंस पणाची त्याने तळ्यातला बद्कात राहू नये त्याच्या साठी मोत्याचा चारा वाट पाहत असतो त्याने झेप घ्यावी आसमंतात आणि हे राजहंस पण केवळ लाल बहादूर शास्त्रीं मध्ये होत. म्हणून ते वेगळे होते ,,,, बाकी सारीच तळ्यातली बदक .. ..... स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असतानाची गोष्ट , शास्त्रीजींचा मुलगा सुनील याला अलिशान मोटार गाड्यांचे खूप आकर्षण , परंतु शास्त्रीजींकडे न स्वतःची गाडी नव्हती त्याला त्याची ईच्छा दाबून ठेवावी लागे, मात्र शास्त्रीजींकडे पंप्रधान म्हणून सरकारी गाडी होती . ती मात्र अत्यंत महागडी आ...

वादळा पूर्वीची तयारी ,,,,,,,,,

काल fb वरील मित्राने सांगितले एयर पोर्टवर कस मुबई च्या ऐवजी bombay  लिहिलंय बाळासाहेबांकडे हि तक्रार मांडा ह्या भैया बिहार्यांचा माज उतरवला पाहजे. शिवसेनेनी काही तरी ठोस भूमिका घेतली पाहिजे . अस बराच काही बोलला,,,, आणि अचानक एक जुनी गोष्ट आठवली ,,, एका व्यक्तीला त्याच्या समुद्र किनार्यावरील फार्म हौस साठी तिथल काम सांभाळणाऱ्या व्यक्तीची गरज होती , त्या ठिकाणी वेळोवेळी येणाऱ्या  वादळान मुळे त्या मालकाचे वेळोवेळी बरेच नुकसान होत असे आणि म्हणून त्या ठिकाणी कुणी कामास हि राहत नव्हते ,,,,,,,, आणि अशा वेळी एक बुटका माणूस  ती नोकरी करावयास तयार झाला. त्या मालकाने त्याला विचारले तुला हे काम येते का? आधी कुठे तू काम केले आहेस का? पण त्या बुटक्या चक्रम माणसाने उत्तरही चमत्कारिक दिले. तो म्हणाल मी वादळा मध्ये शांत झोप घेवू शकतो ,,,,,, मालक थोडा गोंधळला हे उत्तर ऐकून पण कुणीच नाही तर हा तरी म्हणून त्याला कामावर ठेवले,, आणि तो मालक आपली कामे करायला गेला संध्याकाळी आपली कामे आटोपून घरी येतो काय? त्याला वादळाची कल्पना आली आणि धावतच नोकर कस काम करतोय हे पाहण्यास...

भारत देश नेमका कसा आहे?

भारत देश नेमका कसा आहे? जिथे पिज्झा हा नेमका  पोलिस आणि अम्ब्युलंस पेक्षा लवकर घरी येतो,,,,,,,,,  भारत देश नेमका कसा आहे? जिथे कार लोन ५% आणि शिक्षनासाठी १२% कर्जाने मिळत  ,,,,,,,,,,,,,,     भारत देश नेमका कसा आहे? जिथे ४० रुपये दराने तांदूळ तर  १ ० रुपयाला सिमकार्ड मिळत ,,,,,,,,,, १ जिथे २० वर्षापूर्वी,,,, वडापाव ५० पैसे आणि , std कॉल ७ रस, होता आणि आता , वडापाव ७ rs , तर std कॉल ५० पैसे आहे  भारत देश नेमका कसा आहे? जिथे लोक गाव गप्पा मारण्यासाठी  चहाच्या टपरीवर जमतात ,,, वृत्तपत्र हातात घेतात आणि  टपरीवाल्या कड़े  पाहत म्हणतात या लहान मुलांना  कामाला ठेवनार्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे,,,, आणि थोड्याच वेळात ओरडतात  ऐ पोर्या दोन कटिंग आण रे,,,,,, हा आहे भारत ........ 

बाप- नियम

बापाच महत्व वाढवताना येथे मला आईच महत्व कमी नाही   करायचं  पण,,,, कायम उपेक्षित ,दुर्लक्षित ,रागाच,वाईट पणाचा धनी , होणार्या   बापाच महत्व हि कमी नाही हे सांगायचा  अल्पसा प्रयत्न,,,, आई प्रत्येक बाबतीत रडून मोकळी होते  पण बापाने ,,,नाही,, नियमच असतो तो ,,, ज्योती पेक्षा समईने च तापायच असत ,,नियमच,,, जेवण करणारी आई लक्षात   राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणाऱ्या बापाला  विसरतो आपण ,,नियमच,,, स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही ,,नियमच,,,, बहिणींसाठी भावांसाठी आधार व्हायचा असत ,,नियमच,,, देवकी यशोदेच कौतुक करतो सहज पण ,,, कंसाच्या कराल दाढेतून वाचवणारा बापच असतो,,नियमच,,, कौसल्येचा राम असेल हि पण,,, पुत्र वियोगाने जातो दशरथ च ,,,नियमच,,,, मुलाबाळांना चांगल चुंगल देताना जो फाटका राहतो  तो बापच,,, नियमच,,, आमच्या नशिबाची भोक कायम त्याच्या  बनियानवर ,,,नियमच,,, आम्ही १०\१५० सहज खरचतो सलून   मध्ये, तो मात्र अंगाचा साबण दाढीला लावतो,,,नियमच,,, आमच्या आजारपणात धावणारा बाप  स्वतःमात्र ताप अंगावर काढतो,,,नियमच  ,,, आजाराला ना...

प्रश्‍नांची उत्तरं ???????????????????

जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू. २ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत ? ३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील ? ४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का ? हं! काहितरीच काय विचारताय ? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला ? पण , असं वाटलं नसलं तरी , या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच , नाही का ? टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो. पदकं आणि चषक धूळ खात पडतात. जेत्यांचाही लवकरच विसर पडतो. आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं. २ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील ? ३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत , असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद- दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला ?   ४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं. क्षणभर विचार करा. आयुष्य अगदी छोटं आहे....