Skip to main content

देवाची लीला लाकूडतोडया,मुलगा, आणि त्याची बायको

लाकूडतोड्याची गोष्ट तुम्हाला माहितच आहे
विहिरी काठी लाकड फोडताना पाणी प्यायला गेला असता
त्याची कुर्र्हाड विहिरीत पडते गरीब बिच्रा लाकूडतोड्या
मग देवाचा धावा करतो देव येतो आणि
विहिरीत बुडी मारतो आधी सोन्याची,चांदीची अशा
५\६ कुर्र्हडी काढतो लाकूड तोड्या गरीब असला तरी प्रामाणिक असतो
तो त्या कुर्र्हडी नाकारतो आणि सांगतो देवा माझी कुर्र्हाड साधी आहे
त्यामुळे ह्या कुर्र्हडी माझ्या नाहीत .
देव त्याच्या या प्रामाणिक पणावर
खुश होवून त्या सर्व कुर्र्हडी बक्षीस देतो
गरीब लाकूड तोड्या श्रीमंत होतो,,,,,,,,,
त्याच लाकूड तोड्याचा मुलगा आपल्या बायकोला घेवून एकदा गावी येतो .
आणि मग परत ते जुने दिवस आठवले जातात
त्या मुलाच्या बायकोला हे सर्व ऐकल्यावर ती विहीर पहायची
ईच्छा होते ज्या मुळे आपल्या सासरची भरभराट झाली,,,
नवर्या कडे ती हट्ट धरते ती विहीर मला दाखवा
मुलगा ती विहीर दाखवायला घेवून जातो   
'अय्या किती खोल आहे 'असे म्हणत असतानाच 
जाउन ती विहीरीत पडते.
आता देवाचा धावा करण्याची पाळी लाकूडतोड्याच्या मुलाची असते !
देव हि लगेच भक्ताच्या हाकेला ओ देतो
देव व्हीरीत बुडी मारतो आणि ,,,,,?
बिपाशा बसूला बाहेर काढतो आणि ही का तुझी बायको ?
असे विचारतो. आणि क्षणाचा हि विलंब न लावता
हो अशा अर्थाने माना हलवत राहतो व शेवटी निर्धाराने "हो" म्हणून सांगतो !
देव अर्थातच
संतापून म्हणतो
 कलीयुग कलीयुग म्हणतात ते हेच !
कोठे तुझा बाप आणि कोठे तू, ??????
या item girl ला आपली बायको म्हणून सांगतोस ! !!
थांब तुला शापच देतो !
मुलगा धावत देवाचे पाय धरून आपले म्हणणे पूर्ण ऐकून तरी घ्या म्हणून विनवतो.
"
देवा, तुमची ही जुनीच खोड आहे,
तुम्ही आधी बिपाशा, मग करीना आणि शेवटी माझी लग्नाची बायको बाहेर काढली असतीत,
माझ्या प्रामाणिक पणाला भूलून तुम्ही या दोन फटाकड्यापण माझ्या गळ्यात बांधल्या असतात.
अहो पूर्वीचे दिवस नाही राहिले देवा, तुम्ही माझ्या गळ्यात ४\४ बायका माराल
पण 
कायद्याने याला बंदी आहे वर
या महागाईच्या काळात एक बायको सांभाळणे जड जाते तर तीन चार
सांभाळताना माझे तीन-तेराच झाले असते.".

हा खुलासा देवाला पटतो आणि बिपाशा बरोबर तो अदृष्य होतो.
बराच वेळ थांबून देव आपल्या मूळ बायकोला पण वर आणत नाही असे बघून
"
देवाची लीला अगाध आहे" असे म्हणत तो एकटाच घरी परततो

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...