Skip to main content

दारू तीच बाटली बदललेली ,,,,,,

मी गेली काही वर्ष कच्छाला जातो,,,       
येथील मां आशा पुराच्या निमित्ताने साधारण दोन वर्षांपूर्वींची
गोष्ट आहे सहज एका माणसाबरोबर ओळख झाली
आणि गाडीत गप्पा सुरु झाल्या आणि थोड्याच वेळात त्याला एक sms
आला त्यात अस लिहील होत
"हा sms १० जणांना पाठवा तुमच भल होईल वैगेरे वैगेरे
आणि ज्यानी ह्या sms कडे दुर्लक्ष केल त्याचं कस वाटोळ झाल"
 हा sms त्याने मला आवर्जून वाचून दाखवला कारण
हा sms त्याला एका राजकीय पुढार्याच्या मोठ्या मुलाने पाठवला होता ,
मग आमच मग हे कस चुकीच आहे वैगेरे गप्पा सुरु झाल्या ,,,,,,,
झाल त्यानानातर हा विषय मी पूर्णतः विसरून गेलो
पण आज शनिवार सक्काळी सक्काळी मला पुन्हा
असाच sms आला  आणि त्यात सार वरील प्रमाणेच लिहील होत ,
माझ्या स्वभावाला अनुसरून मी त्याल दम वैगेरे दिला रागावलो  हि ,,,,,
आणि अचानक मला माझ्या लहान पणाचे दिवस आठवले
मी लहान असताना संतोषी मत नावाचा सिनेमा खूप प्रसिद्ध झाला होता .
ज्याच्या त्याच्या घरी दरी शुक्रवार पाळण्यात येत होता
मग त्या दिवसाची नवलाई आंबट चिंबट खावू नये वैगेरे वैगेरे,,,,,
लहान होतो त्यातलं गांभीर्य कळत नव्हत 
पण जे काही चालल होत ते खरच खूप चांगल चित्र होत
लोक देवभोळे झाले होते वाईट वागत नव्हते मला तरी ईतकच
कळत होत
आणि एक दिवस आमच्या दारात एक पोस्ट कार्ड आल
उत्सुकतेने उचललं तर त्यावर हि असच लिहील होत
"हे पत्र कमीत कमी दहा जणांना पाठवा तुमच काम होईल
ज्यांनी या पत्राचा अनादर केला त्याचं वाटोळ झाल "
सगळे घरातले घाबरले
घाबरले नाहीत ते माझे वडील,,,,,
त्यांनी ठाम पणे सांगितलं ह्या असल्या खुळचट कल्पनांना
मी बळी पडणार नाही तुम्हालाही पडू देणार नाही
आज ह्या गोष्टीला साधारण तीसेक वर्ष तरी झाली
आमच काही बर वाईट  झाल नाही .
आज नेमका तो sms आला आणि सार चित्र डोळ्या समोरून धावल .
लक्षात ठेवा दहा जणांना sms पाठवून तुमची दुखः कशी कमी होणार?
तुमची बायको जर  घटस्पोट  घेणार असेल तर ती थांबेल कशी?
कुणाच्या मुलाला पोलिओ कसा होईल?
आणि कुणी केलाच sms हा फोरवर्ड तर त्याला गाडी कशी मिळेल?
कुणाला फॉरीन ची  टूर कशी काय घडेल?
पूर्वी हा सारा खेळ मला वाटत पोस्ट कंपनी खेळत असेल
आज मोबाईल वाले हा खेळ खेळत .स्वतःचा धंदा वाढवताना
लोकांना नाहक अंधश्रध बनवत आहेत,
लोकांच्या भावनांशी अस खेळायचा अधिकार कुणी दिला?
एखादा गरीब ज्याच्याकडे हि ऐपत नसेल त्याने काय कराव?
थोडा विचार करूया,
आता आपल्या श्रद्धा आणि भावनांचं हि कुणी तरी मार्केटिंग करतंय
आणि आपण भाबडे पणाने त्याला बळी पडतोय.
पूर्वी पोस्टा मार्फत आता मोबाईल मार्फत .

दारू तीच बाटली बदललेली ,,,,,,
बघा गंमत कशी आहे
१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा *गरिबाला द्यायची असेल**?,** *
पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात .....
३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,
पण ३ तासाचा बकवास सिनेमाबघायला सोपे जाते.....
पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही ...
पण आपल्याआईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ......
Valentine Day  ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊ शकतो पण Mothers Day ला,,?
१ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊ शकत.
हे आणि ते सार sms प्रकरण का होत माहित आहे मित्रानो?
कारण आपण रोज जणून बुजून कुठनं कुठ तरी मुद्दाम चुका करत असतो

त्या चुकांचं परिमार्जन म्हणून ह्या असल्या गोष्टींना बळी पडतो
आणि श्रद्धेला वेठीस धरतो आणि यात बदनाम होतात
आपलेच देव धर्म आणि संस्कृती आपले विचार  
यावर मला एकच सांगावस वाटतंय मित्रांनो तुम्ही फसू नका
आणि कुणाला फसुही देवू नका .



Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...