Skip to main content

झाड ,माणूस आणि प्रेमाचे चार शब्द

आज सक्काळी सक्काळी माझ्या मित्राने मला
सुंदर sms केला ,,,,,,
diffrence between god & human
god- gives,gives,& 4gives
man-gets,gets & 4 gets
आणि हि गोष्ट आठवली ,,,,,
हि गोष्ट आहे स्वतःचाच विचार करणाऱ्या माणसाची
आणि नंतर पस्तवनार्या माणसाची
हि गोष्ट आहे प्रेमाच्या चार शब्दांची
आपुकीच्या नात्याची

एका गावात एक आंब्याच झाड होत खूप बहरलेल
त्या झाडाखाली एक अनाथ मुलगा रोज त्याच्याशी खेळायला गप्पा मारायला येत असे
तो मुलगा झाडावर चढायचा उतरयाचा आंबे तोडायचा
त्या झाडाला त्याच हे त्याचाशी एक रूप होवून खेलना बर वाटत असे,,,,
त्याला हि त्याची काळजी वाटत असे त्याला खाली पडून देत नसे
त्याची गार गार सावली देत असे,
दिवस चालले होते हळू हळू तो मुलगा मोठा झाला
तसा तसा तो झाडा पासून दुरावू लागला
त्याच्या कडे येईनसा  झाला
झाडाला त्याची खूप खूप आठवण येत असे,,,,
आणि एकेदिवशी तो मुलगा त्या झाडाकडे आला ,
झाडाने त्यला विचारलं कारे मित्रा हल्ली तू ये नाहीस माझ्याशी खेळायला,,?
तस उर्मट पणे त्याने झाडाला सांगितलं आता तुझ्याशी खेळायला मी काही
लहान राहिलो नाही समजल,,,,,,?
आता मी खेळण्यांशी खेळतो आणि ती कारेडी करण्यासाठी आज
मला पैशाची गरज आहे मी व्हरा करतोय
मला पैसे कसे मिळतील तू जा बघू
माझ डोक नको खावू,,,,,
त्यावर झाड म्हणाल मित्रा माझ्यकडे पैसे तर नाहीत पण,,,
तू माझे सारे आंबे काढून बाजारात विक तुला पैसे मिळतील,,,,
मुलाने त्या प्रमाणे केल आंबे काढले बाजारात विकले
पण परत पुन्हा झाडाकडे गेला नाही ,,,,,,,,
दिवस जात होते झाड परत खिन्न खिन्न उदास होत होत .
आणि एकदिवस तो अचानक समोर आला
आता तो तरुण बाप्या झाला होता मोठ्ठा माणूस,,,,
लगेच झाड आनंदल आणि त्याला म्हणाल काय मित्रा उदास दिसतोस ?
ये ये माझ्या सावली खाली बैस बघ कित्ती माझा वाटेल ये मित्रा ये.
तो तरुण म्हणाला आता माझ्या कडे वेळ नाही मला घर बांधायचं आहे .
मला परत पैशाची गरज आहे तू जरा शांत राहा
माझ डोक नको खावू जरा विचार करु दे,,,,,,
झाड परत म्हणाल अरे मित्रा यात विचार करण्यासारखं अस काय आहे
मझ्या फांद्या आहेत ना त्या घेवून जा आणि घर बांध.
त्या कृतघ्न मुलाने परत जराही विचर न करता ते झाड कापल
आणि आपल घर सजवलं बांधल,,,,,,,,,
पुन्हा एकवार ते झाड एकट एकट झाल 
तो मुलगा काही परत नाही आला,,,,,,,,,
दिवसा मागून दिवस जात होते,,,
आणि एकेदिवशी तो अचानक उगवला आता तो म्हातारा झाला होता ,,,,,,
उदासवाणा आणि एकटा दिसत होता ....
झाडाने त्याला विचारलं कारे मित्रा असा दिसतोस ?
पण आता मी तुला काही मदत नाही करू शकत,
आता माझ्याकडे आंबे नाहीत तुला द्यायला,,,
आणि फांद्या हि नाही तुला सावली द्यायला,,,,
मुलगा खिन्न हसत म्हणाला
मी आता थकलोय या संसाराचा गदा ओढून
कंटाळलोय या जीवनाला ,,,
आता मला फक्त तुझी सोबत हवी
मी येथे बसू का तुझ्या शेजारी,,,,,,,,?
आणि तो आणि ते झाड दोघंही आनंदले ,,,,,,,,
तात्पर्य- मग तो मुलगा खरच ईतका वाईट होता का?
लगेच हो म्हणू नका आधी विचार करा ,,,,,,,
आपण सारेच असे आपल्या आई वडिलांशी वागतो
ते झाड म्हणजे आपले आई वडीलच होत
लहान असतो तेव्हा त्यांच्या अंगा खांद्यावर खेळतो
आणि जरा मोठे होताच दूर पळतो,
आपण त्यांचा कडे तेव्हाच जातो जेव्हा आपण
अडचणीत असतो आपल्याला गरज असते
आपली गरज भागली कि त्यांची आठवणही येत नही,
वर निर्ल्लज पणे म्हणतो हे त्याचं कर्तव्यच आहे.
बर ईतका सर सहन करून त्यांना तुमच्या कडून काय हव असत तर
फक्त तुमची सोबत
तुमच प्रेम ,प्रेमाचे चार शब्द ,विचारपूस
तेव्हा मित्रानो तुम्हाला सार काही मिळेल मनोवांच्छित
पण आई वडील एकदाच मिळतील आणि त्यांना तुमच्या कडून काय अपेक्षा
तर प्रेमाचे चार शब्द ,विचारपूस ,,,,,,आणि तुमची मुल बायको,
मित्रा नातेवाईक ,सगेसोयरे यांना काही हि आणि किती हि द्या ते कमीच
बर ते देन हे तुमच कर्तव्यच असत .
आठवा वाल्या कोळी माहित आहे ना?
त्याच्या प्रमाणे कंटाळून मरा मरा म्हणता म्हणता राम
समजण्या पेक्षा आज शहाणे झालो तर तरुण पणीच राम दिसेल.
आणि ते झाड जे आपुलकीचा कट्टा बनू शकत ते अबाधित राहील
त्याची फळ वर्षानु वर्षे चाखायला मिळतील.

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...