Skip to main content

Posts

आंधी

 आंधी,,,, काल मित्राने गाणं पाठवलं  *तुम आ गये हो नूर आ गया है*,,,,,, आणि झापटल्या सारखा सिनेमा डाऊनलोड केला आणि हरवून गेलो सुचित्रा सेन आणि संजीव कुमार,,,, 💕💞💞👌 संजीवकुमार,, त्याच्याकडे अमिताभची उंची धर्मेंद्रची शरीरयष्टी शम्मीचा धसमुसळेपणा राजेशखन्नाच मार्केटिंग काही काही नव्हतं एक गोलमटोल हिरो खात्यापित्या घरचा,,,,, पण त्याच्याकडे होत ते अभिनयाच खणखणीत नाणं होत,,,, आणि स्वतः मी शम्मी राजेश खन्ना धर्मेंद्र अमिताभ यांचा फॅन असलो तरीही *शोले आजही पाहतो ते केवळ हात नसलेला संजीव कुमार डोळ्यातून आग ओकत गब्बरसिंग ला केवळ पायांनी चिरडून मारणारा म्हणूनच संजीव कुमारचा म्हणूनच धर्मेंद्र अमिताभ आणि गब्बर यांना पुरुन उरतो तो* असो,,,, कथा तशी नेहमीचीच श्रीमंत बापाची स्वतःची तत्व जपत स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे येऊ पाहणारी ती,,, आणि आपल सरळ साधं कुठलेही छक्केपंजे नसलेल आयुष्य जगत आपली नोकरी आणि आपली कविता या पलीकडे कुठलीही अपेक्षा नसणारा तो,,,, सिनेमा सुरू होतो ती एक मोठ्ठी नेता झालेली असते आणि तो अजूनही एका हॉटेलचा मॅनेजर,,,, तब्बल 9 वर्षांनी भेट होते आणि मग,,,,, *तो;-ये जो चांद है ना...

*तानसेन गुरुपौर्णिमा आणि बाळासाहेब*

 *||श्री गुरुवे नमः ||* अकबराच्या दरबारी जी नवरत्न होती त्यात एक *संगीत सम्राट तानसेन* देखील होते मात्र हे तानसेन कुठे घडले कि आभाळातून डायरेक्ट अकबराच्या दरबारात गेलं काय नाही तर त्यांना हि गुरु होते,, तर अशा या संगीत सम्राट तानसेनचे गुरु होते *स्वामी हरिदास,,,* एकदम व्रतस्थ साधक जणू साधुचं,, निःस्पृह असे ऋषितुल्य *स्वामी हरिदास* सर्वांना च आदरणीय वंदनीय आणि अशा गुरूंचे शिष्य होते संगीत सम्राट तानसेन,, या शिष्याला त्यांनी भरभरून दिले आणि तानसेनाने अपार मेहनत घेत त्यावर चार चांद लावले कीर्ती सर्वदूर पसरली आणि अकबराच्या दरबारात नवरत्न म्हणून ओळखले जाऊ लागले एकदिवस अकबराने तानसेन आणि त्यांचे गुरु स्वामी हरिदास यांना आमंत्रित केले  सगळ्यात उच्च आसनावर गुरु स्वामी हरिदास विराजमामान झाले होते खालोखाल तानसेन दरबार खचाखच भरला होता, आता दोघे हि गुरुशिष्य गाणार होते त्यामुळे एक अत्यंनदाची लहर पसरली होती आणि श्रीस्वामी हरिदास यांचं गायन सुरु झालं सारा दरबार मंत्रमुग्ध होऊन गाणं श्रवण करत होता खूप मोठया टाळ्यांच्या कडकडाटात गाणं त्यांचं समाप्त झालं सारेजण त्यांचा जयजयकार करत होते आता वेळ...

नर्मदेतला प्रत्येक दगड हा शाळीग्राम नसतो

 #बंडातात्या,,,, काल ,,, उद्धवजींना सांगितलं पांडुरंगाच्या पूजेला तुम्ही येऊ नका तो पांडुरंग तुमची पूजा स्वीकारणार नाही,,,, (खरतर माझा गैरसमज असेल पण माझं मराठी खूप चांगलं आहे आणि त्या माझ्या मराठीत खूप चांगलं उत्तर देऊ शकलो असतो पण ते टाळतो असो,,,) पण पांडुरंग तुमची पूजा स्वीकारणार नाही हे तुमचं विधान ऐकल्यावर एक लक्षात आलं की तुम्हला #वारी कळलीच नाही,,, आता वारीला का जावं हे ही सविस्तर सांगत नाही पण साधारण 25 वर्षापूर्वीचा माझ्या समोर घडलेला प्रसंग सांगतो (आपल्याकडे #दृष्टांत म्हणतात त्याला,,) माझे तात्या विणेकरी त्यामुळे मला दर्शनाला कधी अडचण आलीच नाही पण एकदा मात्र चुकामूक झाली आणि तात्या पुढे निघून गेले आता काय करायचं दर्शन कस घ्यायचं,,,? मग ओळख पाळख काढत मी कसा बसा दर्शन बारीत घुसलो तास दोन तासात तिथे आजूबाजूचे वारकरी यांच्याशी गप्पा ही मारायला लागलो साधारण नन्तर लक्षात आलं की एक माझ्या 10/12 मागे एक वारकरी उभा होता जो आंधळा होता तो पर्यंत मी माहिती काढली होती वारकरी किती दिवस झाले रांगेत उभे आहेत मग मात्र माझं कुतूहल जाग झालं ,, राहवलं नाही मला कारण लोक सारी 2/3दिवस झाली होत...

ड्रीम गर्ल

 भडक वेबसिरीजच्या काळात एक हलका फुलका मन प्रसन्न थोडा अमोल पालेकरच्या गोलमाल सारखा निखळ करमणूक करणाऱ्या एका बेरोजगार तरुणाची #आयुष्यमानखुराणा ची कथा नोकरी मिळवण्यासाठी खटपतीतून सहज म्हणून केलेली गम्मत त्याला सोन्याचे दिवस दाखवते आणि मग त्यातून पुढे जो गोंधळ उडतो ते सारं पाहण्यासारखं त्यातही #अन्नूकपूर सारखा बाप असेल तर😆👌👌👌👌 या बाप नटाचा गोंधळ तर अप्रतिम त्यातून तो लग्नासाठी मुसलमान होतो ते का तो सारा गोंधळ पाहणं म्हणजे  गोंधळात गोंधळ😆😆👍👍😆😆👌

हसीन दिलरुबा

 *तापसी पन्नू* *#हसीन_दिलरुबा* ज्यांनी कुणी तरुणपणी रहस्य कथा किंवा इतर कथा वाचल्या असतील त्यांना सिनेमा त्या विश्वात घेऊन जाईल,,, या चित्रपटात देखील दिनेश पंडित यांच्या रहस्य कथेचा आधार घेत चित्रपट बेतला आहे आणि ज्यांना हा थरार अनुभव असेल त्यांनीही जरूर पहावा असा चित्रपट,,, एका सुंदर पण थोडं वय झालेल्या आणि जोडीदारा बाबत खूप अपेक्षा असलेल्या एका सुंदर मुलीची कथा,,,,, अनेक मुल अनेक खोट काढून झाल्यावर एक सर्वसामान्य मुलाशी तीच लग्न होत तिच्या स्वप्नातला तो राजकुमार नसतो अर्थातच पुढे खटके भांडण होतात ती विकोपाला जातात त्यातच घरी दिराच,,,, एका डॅशिंग दिराच,,  तिच्या *स्वप्नातल्या राजकुमारच* आगमन होत आणि  *वसंताच आगमन व्हावं आणि पाना फुलांना बहर यावा तसं तीच आयुष्य सुंदर होत,,,* साधा चहा देखील न बनवता येणारी ती त्या राजकुमारासाठी मटण ही बनवते त्याच्या प्रेमात आकंठ बुडते,,,  आणि,,,,, *पागलपन की हद की से जो ना गुजरे वो प्यार कैसा होश मे रिशते निभाये जाते है,,,,.* अशी टॅग लाईन घेत सिनेमा बनवला आहे आता *पागलपन काय किती कस त्याचा अनुभव जरूर घ्या आहाहा,,, भारी👌👌* अवश्य बघावा...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...

एक दृष्टांत,,,, गाढव मालक आणि बेपारी,

एका मालक आणि गाढव यांची ही गोष्ट कुणी कशीही दृष्टांत म्हणून वापरावी,,,, एक गरीब मालक आणि त्याच गाढव रोज इमाने इतबारे कामधंदा करत जगत होते गाढव बिचारे न थकता त्याच्या मालकाला मदत करत असे त्यामुळे मालक ही त्या गाढवाला हवं नको ते बघत असे हिरवा चारा वैग्रे न चुकता दोन वेळा खायला देत असे त्याची निगा ठेवत असे रोजच्या रोज तो गाढवाला नदीवर तलावात आंघोळीला नेत असे,,, एक दिवस आंघोळ घालता घालता एक चमकणारा दगड त्या मालकाच्या हाती लागला,, त्याने तो दोरा बांधून गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि आपल्या कामावर निघाला तो चमकणारा दगड गाढवाला देखील आवडू लागला तो दुपटीने काम करू लागला मजेत दिवस चालले होते,,, एक दिवस हे दोघे रस्त्याने चालले असता एका माणसाची नजर त्या चमकणाऱ्या हिऱ्यावर पडली,, आणि तो हिरा घेण्याच्या दृष्टीने तो बेपारी त्या मालकाच्या मागे लाडीगोडी करत फिरू लागला तो गाढवाच्या गळ्यातला हिरा हवा होता मग गप्पा मारता मारता तो त्या मालकाला बोलला तो दगड मला दे मी 100 रु देतो पण मालक म्हणाला तो माझ्या गाढवाला अवडलाय शंभर रु साठी मी त्याला नाराज नाही करणार,, मग बेपारी त्याला आणखी लालूच दाखवू लागल...

शुक्राचार्य आणि मराठी माणूस,,,,

लायकी पात्रता असूनही डावलले गेलेले शुक्राचार्य दानवां च गुरुपद स्वीकारतात,, आणि दानवांची सरशी व्हावी म्हणून ते संजीवनी मंत्रविद्या मिळवण्यासाठी भगवान शंकराला शरण जातात भगवान शंकराचा भोळेपणा सारे देव जाणून असतात त्यामुळे देवलोकात एकच हलकल्लोळ माजतो,,, आपलं पद जाईल या भीतीने देवेंद्रही शंकराला शरण जातात पण भगवान शंकर भोळे असले तरी संजीवनी मंत्र काय त्याची ताकद काय त्याचा फायदा नुकसान काय या मंत्राचा गैरवापर देव लोकांना किती भारी पडू शकतो हे ते पक्के जाणून असतात,,, म्हणून ते अट घालतात,,,, *पुढील एक वर्ष झाडाला स्वतःला उलट टांगून घेऊन केवळ खाली पडलेल्या पानांचा धूर सेवन करायचा बाकी काहीही अन्न वा पाणी ग्रहण करायचं नाही केवळ त्यालाच हा संजीवनी मंत्र मिळेल,,,,* ही अट शुक्राचार्य स्वीकारतात,,, ही अट ऐकल्यावर अर्थातच देवेंद्र या अटी पासून पळ काढतात,, आणि ह्या ह्याला काय जमणार म्हणत शुक्राचऱ्याची टिंगल ही उडवतात,,, इकडे शुक्राचार्यांचं तपाच अनुष्ठान सुरू होत,,, *देवेंद्र नेहमी प्रमाणे हे तप सिद्धीस जाऊ नये म्हणून* *प्रयत्न करतो पण यश येत नाही मग त्याची मुलगी पुढे येते व शुक्राचार्यां...

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच ...

एका चुकीची अनेकदा शिक्षा भोगावीच लागणार*

*सध्या वारंवार बाळासाहेबांचे त्यांच्या जुन्या व्हिडिओचे शिवसेनेचे उमाळे येणाऱ्यांसाठी खास,,,* ठाम मत द्विधा मनस्थिती असणारे कायम शिक्षा भोगत राहतात,,,, एकदा एका राजाने त्याच्या राज्यातील एका माणसाला काही कारणास्तव 100 चाबकांच्या फटाक्यांची शिक्षा सुनावली,,,, झाला शिक्षा देणारा चाबूक नाचवत आला,, तसा चाबकाचे फटके खाल्यावर आपली परिस्थिती काय होणार याच चित्र डोळ्यासमोर नाचू लागल्या बरोबर तो माणूस ओरडला,,, *दया करा महाराज दया करा महाराज,,* अहो जीव जाईल हो माझा माझी ताकद नाही 100 फटके खायची,,, तसा राजा म्हणाला बर बर अस कर 100 कांदे खा,,, माणसाने विचार केला 100 चाबकाचे फटके खाण्या पेक्षा हे बर आहे,,, त्याच्या समोर कांदे ठेवले,, 1,2,3,4 कसे बसे कांदे खाल्ले पण लक्षात आलं हे काही खर नाही चाबकाचे फटके कसेही ही सहन होतील,,, पण जिभेची लाही लाही सहन होत नाही,,, तसा तो पुन्हा ओरडला महाराज हे कांदे काही सहन होत नाही तुम्ही मला फटकेच द्या,,,, आता फटके सुरू झाले 4/5फटके कसे बसे खाल्ले पण चामडीत रुतणारा तो चाबूक सहन होईना,, तसा तो पुन्हा ओरडला *महाराज दया करा,,,* मला पुन्हा कांदे खायला द...

घड्याळ, अभिमन्यू आणि लॉक डाऊन,,,,,

 सध्या महाभारत आणि लॉक डाऊन सुरू आहे,,, महाभारत युद्धात अभिमन्यू चक्रव्यूह भेदताना दिसणार आहे,, हे सगळं आठवायचं कारण आमच्या घरातलं *जुन घड्याळ,,,*  मी साधारण 11 वीत होतो त्यावेळी ते घड्याळ थोडं बिघडलं होत किती ही चावी दिली काटे उलट सुलट फिरवलं तरी ते कधी मागे कधी पुढे पळत असे योग्य वेळच दाखवत नसत एक दोन जणांना ते दाखवलं पण त्यांनी सांगितलं आम्ही बनवत नाही ,,, एक दिवस मात्र घरात कुणी नाही हे बघत माझ्यातला मॅकेनिक जागा झाला ,,म्हंटल बघू तरी काय ते खोलून,,, पण ते खोल्ल मात्र नेमका काय बिघाड तो लक्षात येईना,, शेवटी नाद सोडला ,, पण खरी अडचण तर पुढे होती ,, ते घड्याळ उघडायला तर उघडलं पण आता ते पुन्हा फिटिंग करणं अवघड होतं त्यात बापाचे फटके बसणार ते वेगळंच होत,,,, घाबरत घाबरत मी ते कसबस फिट करत होत तस भिंतीवर लटकवल,, थोड्या वेळाने वडील आले त्यांनी ते घड्याळ एका चांगल्या हुशार घड्याळवाल्याकडे नेलं त्याला सांगितलं की चालताय पण सारख पुढे मागे होतय,, अर्थातच ते घड्याळ त्याने उघडलं आणि वडिलांना सांगितलं अहो तुम्ही म्हणताय की घड्याळ चालू आहे पुढे मागे होतंय,, वडील म्हणाले हो,, त्या...

कारण सीतेकडून घेतलेले वचन,,,,,आणि तिने दिलेली कबुली

कारण सीतेकडून घेतलेले वचन,,,,, श्रीराम कस्तुरी मृगा मागे गेल्या नन्तर मायावी मारीच रामाच्या आवाजात लक्ष्मणा धाव सीते सीते असे आवाज देतो तेव्हा सीता लक्ष्मणाला खूप आग्रह करत अगदी कामातुर ठरवत रामाला शोधायला पाठवते,,, शेवटी लक्ष्मण लक्ष्मण रेषा आखतो आणि सीते कडून वचन घेतो की काहीही झालं तरी ही लक्ष्मण रेषा ओलांडून तू पलीकडे जाणार नाही आणि ही ओलांडून गेलीस आणि न जाणो तुझं बर वाईट झालं तर जबाबदार मी असणार नाही,,,,,, लक्षात घ्या आपण सारे हे रामायण घडलं त्याला कधी दशरथ, कैकयी, मंथरा, रावण विभीषण ह्या साऱ्यांना दोषी मानतो पण आज पर्यन्त कुणीही लक्ष्मणाला दोषी मानलं नाही,,,, कारण सीतेकडून घेतलेले वचन,,, उलट हनुमंताची लंकेत भेट झाल्यावर रामाला खुण पटावी म्हणून चुडामनी देत असताना तिने हनुमंता कडे लक्ष्मणाची माफी ही मागितली लक्षात घ्या हे कुठे ही लिखित वचन नव्हतं #न_की_जाहीर_मीडिया_समोर_दिलेली_कबुली तरीही सीतेने कबुलीनामा हनुमंता कडे पाठवला  आणि माझी चूक झाली मी लक्ष्मणाच ऐकलं नाही अशी कबुली दिली ज्या बद्दल ना रामाला माहिती होती न की हनुमंताला*,, प्राण जाये पर वचन ना जाये हे शिकवत...

आज इतिहासाच पान उलटताना,,, घोरी आणि भाजप

महा क्रूर गोष्टींनी भरलेला 711 नन्तरचा इतिहास सांगतो,,,, पण या आक्रमांनी ही आम्ही हिंदूं त्यातून काही बोध घेऊ काही शिकू अस आजवर घडलेलं नाही अलेक्झांडर आला परंतु त्याने काही कुणाला ग्रीक करायच्या भानगडीत पडला नाही शक आले हुन आले परंतु त्यांनी कुणी कुणाला कुशाण बनवलं नाही उलट तेच या मातीत बौद्ध किंवा जैन बनून मिसळून गेले परन्तु नन्तर 711 ला महंमद बिन कासीमची सिंध च्या बाजूनं स्वारी झाली त्या नंतर मात्र जो बटवा बाटवी चा हैदोस सुरू झाला त्याला तोड नव्हती परन्तु तेव्हाही हिंदू राजे या साऱ्या आक्रमणाला प्रतित्युत्तर द्यायला कमी नाही पडले नव्हे ते शौर्यात कमी नव्हतेच,, या देशाला पहिली किळस आली ती क्रौर्याची,,, हे युद्ध फक्त राजे रजवड्यां पुरत नव्हतं तर समोर जे जे दिसेल ते ते लुटालूट करावं जाळपोळ करावी बटवा बाटवी करावी लेकी सुना पळवाव्यात त्यांची अब्रु वेशीवर टांगवी धिंड काढावी देव देवळं बेचिराख करावी मूर्ती भंजन करावं मालमत्ता लुटून घ्यावी *या सगळ्यात आपलीची लोक बळजबरीने धर्मांतरित केली जावी आणि आपल्यातील धर्ममार्तंडांनी राजाने दुर्लक्ष करावं त्यांना पुन्हा हिंदू करवून घ्यावं अशी...

तुटलेला दात आणि सोडून गेलेले मित्र नातेवाईक

*आपले दात आणि आपले नातेवाईक*,,,,, काल एक मित्र अचानक भेटला भर थंडीत ही त्याला घाम आला होता बसला होता  एक बाजूला   सोसायटीच्या आवारात मला बघताच एक उसनं अवसान आणून हसायचा प्रयत्न करू लागला,, तस त्याला मी विचारलं तर खुणेनेच बोलला हा बघ दात पडला ,,,मला खर तर हसू येत होतं पण काळजीने विचारलं की कारे कुठे पडलास की काय? की केलीस मारामारी तो- पुन्हा खुणेनेच नाही म्हणाला मी-मग हलत होता का? नीट रोज दोन वेळा दात साफ ब्रश करत नाही का? तो- सध्या हलत होता पण मी दात दोनदा काही घासत नाही जमत नाही उशिरा येतो मग जेवतो आणि लगेच झोपतो,,, सकाळी मात्र घासतो रोज *मी- अरे हलत होता तर डॉ कडे का नाही गेलास? आणि आता 45 वर्षाचा आहेस आता दात गेला तर येत नाही रे काळीजी घ्यावी कस आहे आपल्या जन्मासोबत नाक कान घसा जीभ सगळं आपोआप येत दात हे नंतर येतात आपल्या तोंडात जे जे काही पडेल त्याच योग्य चर्वण करून ते आपल्या मदतीसाठी आयुष्यभर स्वतःची झीज करवून घेत असतात ते ही गप्प बसून सोसत असतात आपल्यासाठी तात्पर्य:- *आपल्या सोबत राहणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मग ते दात असो नातेसंबन्ध,मित्र, सगेसोयरे यांची काळ...

*"जीभेने दाता ला दिलेले उत्तर,,"*

*"जीभेने दाता ला दिलेले उत्तर,,"* सकाळीच श्री कबिरांचा दोहा वाचनात आला,,,,, आणि सरकार स्थापून सुरू ही झालय तरीही हातातून गेलेली सत्ता समोरच्याला बोचतच राहते आणि माझ्या सारखा समोर आला की आपसूकच त्यांचे #मगरीचे_अश्रू बाहेर येतात पण माझ्या समोर मात्रा चालत नाही तरीही आपलं मत मांडायचं म्हणून मग,,,,, अत्यंत साळसूद पणाचा आव आणत समोरचा विचारतो ,,,, नाही पण ते कुठे 53 कुठे 105 थोडा तरी ताळमेळ ,,नाही म्हणजे तुम्हला तरी पटत का,? अस म्हणत आपल्याला शब्दात फसवायचा अडकवायचा केविलवाणा प्रयत्न करतात मी तो ही उडवून लावतो,,, पण सकाळीच कबिरांचा हा दोहा वाचनात आला,,,,, *" दात दम देतात;-हम बत्तीस तू अकेली, जरासी कतर खाऊ, चाबाऊ तो फिर्याद कहा ले जाये जीभ उत्तरते;-एक बात टेडी बोलू तो अरे बत्तीस निकल जाये"* हा कबिरांचा दोहा बरच काही सांगून जातो मुळात कबिरांचा जन्मच मला वाटत चुकलेल्या लोकांच्या कानाखाली मारण्यासाठी झाला असावा,,, *"जीभेंला जेव्हा 32 दात दरडावतात की तू एकटी आहेस आम्ही बत्तीस आहोत जास्त नाटक करशील ना तर खैर नाही तुझी हा हे लक्षात ठेव दुसऱ्याच क्षणी दणकन तुकडाच...

आई साधू आणि राजा

लहानपणी आई बरेचदा वशिष्ठऋषींनी रामाला राक्षसांना मारायला घेऊन गेल्याची गोष्ट सांगत असे,,, आणि माझा नेहमी गोंधळ उडत असे की वसिष्ठ ऋषी च जर यज्ञ करवून राम ला जन्माला घालू शकत होते त्याला शिक्षण देऊन लढाई करण्या योग्य बनवत होते आणि ते शिक्षण घेऊन जर राम राक्षसांचा निःपात करू शकत होता तर ,,,,🤔 मुळात वसिष्ठ स्वतःच हे काम करू शकत होते च की त्यासाठी राम जन्माला येण्याची तो मोठा होण्याची वाट का पहात होते ते स्वतः राक्षसांचा निःपात करू शकत नव्हते का❓,,,, आणि आईच उत्तर ठरलेलं असे *बाळा ते साधू होते* साधू ने साधुचं काम साधूने कराव राजाने राजाचं,,,, मी मात्र पटवून घ्यायला तयार नसे ,,,,, मात्र काल दुपारी घरी गेलो तर tv वर नातू कार्टून पहात होता त्यावर देखील एका म्हाताऱ्या आजारी राजाची गोष्ट चालू होती मी ही पाहू लागलो,,, सारे मंत्री संत्री प्रधान राजाच्या पायाशी चिंताक्रांत बसलेले असतात राजा निपुत्रिक असल्यामुळे आता राजाच्या पश्चात कोण❓ असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता,, सगळ्यांनी शेवटच्या दिवशी विचारलं काय मग राजा तुमच्या मनात तरी कसं काय काय करावं आम्ही कुणाला राजा बनवू? ,,, तेव्हा राजा म...

रामाचं राजकारण आणि आमचं पुणे पुण्यातले आम्ही,,,2

*कुठल्याही विधायक कामासाठी कस एकत्र येऊ नये उलट जागृत समाजाची ताकद कशी फुग्याला टाचणी लावल्या सारखी काढून टाकावी त्याच उत्तम उदाहरण* काल वाचलं होतं रामाने वालीला मारल्या नन्तर सुग्रीवला राजा आणि वाली पुत्र अंगदाला युवराज घोषित करून सुग्रीव आणि वाली गटाला एकत्र बांधून ठेवलं कारण देव कार्य करायचं असेल तर हेवेदावे रुसवे फुगवे मान अभिमान हे दूर ठेवून एकत्र यायचं असत,, हे दोन्ही गट एकत्र आले नसते लंका दहन झालं असत का?? पण नाही मीच काय तो शहा-णा ही भूमिका आडवी आली की माणूस आणि त्याच्या इच्छा आडव्या झाल्या शिवाय रहात नाहीत त्याची ही आठवण,,,,, *संघटणाला झालेला विरोध हा इतिहास कधीही विसरत नाही*,,, सन 1993 मुंबईत दिवाळीत फटाके फुटावेत तसे एका मागोमाग एक बॉम्बस्फोट झाले,, ते दुबई मार्गे झाले ते बाहेरून आलेल्या अतिरेक्यांनी केले हे उघड झालं,,, पण बाहेरून आलेले हे त्यांना इथे संभाळले कुणी ? इथे त्यांची जेवायची रहायची व्यवस्था कुणी केली?,,हे काम झाल्यावर ते सही सलामत त्यांच्या मुक्कामी कसे पोचवले गेले?? इथे येऊन ते राहिले कुठे याचा शोध घेताना सरकारच्या अस लक्षात आलं ,,,, धार्मिक कार्यसाठी...

वाली वधा नन्तर श्री रामांनी काय राजकारण केलं??

समसमान वाटणी करायची वेळ आली तेव्हा श्रीरामांनी काय केलं,,,???? जेव्हा *राम हनुमंत यांचं ठरलं होतं सुग्रीव मित्र झाला होता वालीला मारायचं ठरलं* आणि सीता शोधार्थ ही सारी वानरसेना घेऊन लंकेवर स्वारी करायची आणि सीता सोडवून आणायची त्या नन्तर ची ही गोष्ट,,,,, तेव्हा सुग्रीवला सांगितलं की तू वालीला युद्धा साठी बोलव ते युद्ध सुरू असताना मी वालीला मारेन,,, युद्ध सुरू झालं दोघे ही वीर एकमेकांना भिडले दोघ ताकद पणाला लावून मल्लयुद्ध करत होते पण कुठे तरी लहान भाऊ मोठ्या भावावर कमी पडताना दिसत होता मग हनुमंताने शक्कल लढवली सुग्रीवा च्या गळ्यात तुळशीची माळ घातली,, तेंव्हा पासून देवाला देखील कळलं की जो माळ धारण करतो तो आपला,,, असो, आणि मग रामाने बरोबर निशाणा साधला आणि वालीला मारलं,, हे जरी इतकं सोप्प होत तरी खरा पेच पुढे होता कारण राम सुग्रीवला राजा बनवणं हे क्रमप्राप्त होत हनुमंताने तिथेच रामाला मदत केली रामा,, रामा सावध इथे वानरसेनेत दोन गट आहे कसाही होता तरीही वालीला मानणारा एक गट आहे एक गट सुग्रीवाला मानणारा आहे आणि *लंका दहणासाठी* आपल्याला संपूर्ण वानर सेनेची गरज आहे तेव्हा एकट्या सुग्...

आईचा मंत्र, मी आणि भाजपची सत्ता लालसा,,,

परवा नेहमी प्रमाणे fb वरची कुस्ती खेळत होतो तोच तिथे माझे मामा आले आणि म्हणाले *कुणीही आपली सत्ता आपला पक्ष वाढणारच फायदा बघणारच,,,* आणि मला नेमक्या दोन घटना नेमक्या काल आठवल्या,,, एक तर लहानपणी आईने दिलेला मंत्र आणि दुसरा हॉस्पिटल मध्ये असलेला माझा मित्र,,,, लहानपणी लक्ष सार खेळण्याकडे असे आणि मग गडबडीत जेवण खान वैगेरे चालत असे त्यात *आई जे बनवेल ते भारीच असे आणि ते मग भर भर भरायचं तोबरा भरल्या सारख, पण आवडीचं म्हणून तोबारा भरायचा नसतो तो चावता ही येत नाही आणि गिळता ही येत नाही गिळला तर ठसका लागणं उलटी होणं किवा मग हळू हळू पाणी पीत तो घास कसा बसा गिळण,,* *परन्तु असा गिळलेला घास त्याची ना चव घेता येत असे नाही तो अंगी लागत असे* त्यावेळी आईने तो आईने दिलेला मंत्र मी आजही विसरलेलो नाही *आई म्हणायची आवडलं म्हणून तोबारा भरू नकोस हळू हळू तोंड स्वीकारेल इतकंच खा तोंड म्हणजे पोट नाही जे भरून ठेवशील आणि पोटाची ताकद तेव्हडीच आहे जेव्हड तोंड स्विकार करेल या उलट वागशील तर अपचन हे ठरलेलं,,,* आजही तो जेवायचा नियम सगळीकडे लागू होतो आणि त्यामुळे*मी व्यवसाय करतो धंदा करत नाही*,, उग...

पोपट मुका झालाय (मेलाय ),,,

एकदा एक राजा नेहमी प्रमाणे शिकारीला जंगलात गेला असता नेहमी प्रमाणे सैन्याची आणि त्याची चुकामूक झाली,,, नेहमी प्रमाणे मग जंगलातील आदिवासींनी राजाला पकडून नेलं,,, पुढे त्यांच्यात देवीला राजाचा बळी द्यायचा त्यासाठी योग्य वेळ मुहूर्त पाहून दुसऱ्याच दिवशी सक्काळी सक्काळी सूर्य उगवतात देवीला बळी द्यायचं ठरलं,, त्यासाठी राजाला वधस्तंभावर दोरखंडाने बांधण्यात आल,,, परन्तु बळी चा मुहूर्त पाहणाऱ्या पेक्षा राजाचं नशीब जोरावर होत,, उद्याच्या मरणाची वाट पाहणारा राजा असहाय होत वर देवा कडे पहात होता संध्याकाळ झाली रात्र झाली आणि अचानक कुठूनसा एक पोपट उडत उडत तिथे आला त्याने राजाला त्या अवस्थेत पाहिलं आणि हळू हळू तो त्या दोरखंडाच्या गाठी सोडवू लागला, राजाला तर देवच पावला होता थोड्याच वेळात राजा त्या दोरखंडातुन मुक्त झाला राजाला खूप आंनद झाला तत्क्षणी राजाने त्या पोपटाला सोबत घेत आपल्या राज्याकडे निघाला इकडे पहाट झाली होती आदिवासी जागे होत पहातात तो काय राजा गायब झाला होता,,, इकडून आदिवासी तिकडून राजाचे सैनिक देखील तो पर्यंत शोधायला बाहेर पडले होते सुदैवाने तो पर्यंत राजा आपल्या सैनिकांसह राज्या...