Skip to main content

शुक्राचार्य आणि मराठी माणूस,,,,


लायकी पात्रता असूनही डावलले गेलेले शुक्राचार्य दानवां च गुरुपद स्वीकारतात,, आणि दानवांची सरशी व्हावी म्हणून ते संजीवनी मंत्रविद्या मिळवण्यासाठी भगवान शंकराला शरण जातात भगवान शंकराचा भोळेपणा सारे देव जाणून असतात त्यामुळे देवलोकात एकच हलकल्लोळ माजतो,,,
आपलं पद जाईल या भीतीने देवेंद्रही शंकराला शरण जातात पण भगवान शंकर भोळे असले तरी संजीवनी मंत्र काय त्याची ताकद काय त्याचा फायदा नुकसान काय या मंत्राचा गैरवापर देव लोकांना किती भारी पडू शकतो हे ते पक्के जाणून असतात,,,
म्हणून ते अट घालतात,,,,
*पुढील एक वर्ष झाडाला स्वतःला उलट टांगून घेऊन केवळ खाली पडलेल्या पानांचा धूर सेवन करायचा बाकी काहीही अन्न वा पाणी ग्रहण करायचं नाही केवळ त्यालाच हा संजीवनी मंत्र मिळेल,,,,*
ही अट शुक्राचार्य स्वीकारतात,,,
ही अट ऐकल्यावर अर्थातच देवेंद्र या अटी पासून पळ काढतात,, आणि ह्या ह्याला काय जमणार म्हणत शुक्राचऱ्याची टिंगल ही उडवतात,,,
इकडे शुक्राचार्यांचं तपाच अनुष्ठान सुरू होत,,,
*देवेंद्र नेहमी प्रमाणे हे तप सिद्धीस जाऊ नये म्हणून* *प्रयत्न करतो पण यश येत नाही मग त्याची मुलगी पुढे येते व शुक्राचार्यांच्या विघ्न देखील आणते पण शुक्राचार्य ठाम राहतात ते पाहून भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्यांना संजीवनी विध्या प्राप्त होते*,,,,,
तात्पर्य:- मराठी भाषिक मित्रांनी यातून केवळ हाच बोध घ्यावा की आता महराष्ट्रतून अनायसे सारे मजूर कामगार वर्ग हा महाराष्ट्र् सोडून त्यांच्या त्यांच्या गावी जात आहेत *(सारेच देवेंद्र,,, )*
पण आता स्थानिक शुक्राचायची जबाबदारी वाढणार आहे त्यांना नेटाने प्रयत्न करत *मेहनतीचा संजीवनी मंत्र खेचुन आपल्या हाती आणायची संधी अनायसे चालून आली आहे आपला महाराष्ट्र् आपली मराठी भाषा आपल्याच कठोर मेहनतीने संजीवनी पाजायची वेळ आली आहे आज नाही तर कधीच नाही सारे लहान मोठे व्यवसाय आपल्या ताब्यात घ्या तुम्हीच ते चालवा पुन्हा ते भाड्याने देऊ नका हा आपला महाराष्ट्र आहे ही आपली मराठी भाषा आहे लक्षात ठेवा येणाऱ्या पुढील काळात जर पुन्हा कुणी म्हंटल " हमको मराठी नही आती हिंदी मे बोलो तर जीव देण्या पलीकडे तुमच्या कडे पर्याय नसेल*

कर्माचा सिद्धांत अस संगतो,,
*तुम्ही काल केलंत किती पराक्रम गाजवला ते महत्वाचं नसत तुम्ही आजही त्यासाठी तयार आहात हे तुम्हला सतत पटवून द्यावं लागतं*

*बाकी ह्या भारत मातेच्या पोटात एकमेव राष्ट्र आहे आणि ते महाराष्ट्र आहे हे कायम लक्षात ठेवलं तर नव्या युगाचे तुम्हीच मनु असाल यात संशय नाही*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट मराठी शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...