Skip to main content

तुटलेला दात आणि सोडून गेलेले मित्र नातेवाईक

*आपले दात आणि आपले नातेवाईक*,,,,,

काल एक मित्र अचानक भेटला भर थंडीत ही त्याला घाम आला होता बसला होता  एक बाजूला   सोसायटीच्या आवारात मला बघताच एक उसनं अवसान आणून हसायचा प्रयत्न करू लागला,, तस त्याला मी विचारलं तर खुणेनेच बोलला हा बघ दात पडला ,,,मला खर तर हसू येत होतं पण काळजीने विचारलं की कारे कुठे पडलास की काय? की केलीस मारामारी तो- पुन्हा खुणेनेच नाही म्हणाला
मी-मग हलत होता का? नीट रोज दोन वेळा दात साफ ब्रश करत नाही का? तो- सध्या हलत होता पण मी दात दोनदा काही घासत नाही जमत नाही उशिरा येतो मग जेवतो आणि लगेच झोपतो,,,
सकाळी मात्र घासतो रोज
*मी- अरे हलत होता तर डॉ कडे का नाही गेलास? आणि आता 45 वर्षाचा आहेस आता दात गेला तर येत नाही रे काळीजी घ्यावी कस आहे आपल्या जन्मासोबत नाक कान घसा जीभ सगळं आपोआप येत दात हे नंतर येतात आपल्या तोंडात जे जे काही पडेल त्याच योग्य चर्वण करून ते आपल्या मदतीसाठी आयुष्यभर स्वतःची झीज करवून घेत असतात ते ही गप्प बसून सोसत असतात आपल्यासाठी
तात्पर्य:-
*आपल्या सोबत राहणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मग ते दात असो नातेसंबन्ध,मित्र, सगेसोयरे यांची काळीज योग्य ती घेतलीच पाहिजे दात गप्प सगळं सहन करतात म्हणून त्यांना गृहीत धरायच नसत ते काळजी घेतली नाही तर पडतात सोडून जातात मग उरत ते फक्त बोळक,जपलं पाहिजे आपले मित्र नातेवाईक सगेसोयरे हे देखील अशीच आयुष्यभर न बोलता कळत नकळत आपल्याला मदतच करत असतात आपणच त्यांची करणार नाही प्रत्येक गोष्टीत त्यांना गृहीत धरलं की एक दिवस ते आपल्याला एकट सोडून निघून जाणार हे ठरलेलं*
तेव्हा नवं वर्ष मग ते इंग्रजी असो वा आपलं भारतीय त्या शुभेच्छा देताना जे जे म्हणून कुणी आपले आहेत त्यांची नीट काळजी आपण घेत आहोत ना? त्यांच्याशी आपले संबन्ध नीट चांगले ठेवत आहोत ना? हे प्रश्न आधी स्वतःला विचारा
तरच नवीन वर्षात दात शाबूत राहून नवनवीन गोष्टींचा खाद्य पदार्थांचा आपण आस्वाद घेऊ शकू
जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...