Skip to main content

एका चुकीची अनेकदा शिक्षा भोगावीच लागणार*

*सध्या वारंवार बाळासाहेबांचे त्यांच्या जुन्या व्हिडिओचे शिवसेनेचे उमाळे येणाऱ्यांसाठी खास,,,*
ठाम मत द्विधा मनस्थिती असणारे कायम शिक्षा भोगत राहतात,,,,

एकदा एका राजाने त्याच्या राज्यातील एका माणसाला काही कारणास्तव 100 चाबकांच्या फटाक्यांची शिक्षा सुनावली,,,,
झाला शिक्षा देणारा चाबूक नाचवत आला,,
तसा चाबकाचे फटके खाल्यावर आपली परिस्थिती काय होणार याच चित्र डोळ्यासमोर नाचू लागल्या बरोबर तो माणूस ओरडला,,,
*दया करा महाराज दया करा महाराज,,*
अहो जीव जाईल हो माझा माझी ताकद नाही 100 फटके खायची,,,
तसा राजा म्हणाला बर बर अस कर 100 कांदे खा,,,
माणसाने विचार केला 100 चाबकाचे फटके खाण्या पेक्षा हे बर आहे,,,
त्याच्या समोर कांदे ठेवले,,
1,2,3,4 कसे बसे कांदे खाल्ले पण लक्षात आलं हे काही खर नाही चाबकाचे फटके कसेही ही सहन होतील,,, पण जिभेची लाही लाही सहन होत नाही,,,
तसा तो पुन्हा ओरडला महाराज हे कांदे काही सहन होत नाही तुम्ही मला फटकेच द्या,,,,
आता फटके सुरू झाले 4/5फटके कसे बसे खाल्ले पण चामडीत रुतणारा तो चाबूक सहन होईना,,
तसा तो पुन्हा ओरडला *महाराज दया करा,,,*
मला पुन्हा कांदे खायला द्या
पुन्हा नेटाने 7/8कांदे खाल्ले पण हे लक्षण काही खर नाही हे लक्षात आलं आता पर्यंत फक्त जिभेची लाही लाही होत होती पण आता हळू हळू शरीरात जाळ सुरू झाला
नाका तोंडातून धूर सुरू झाला तसा तो पुन्हा ओरडला
*महाराज दया करा महाराज,,*
*पुन्हा फटके सुरू झाले सतत नव्याने समोर येणाऱ्या शिक्षेची संपायची लक्षण काही दिसेना,,,,,,*
खर तर ही गोष्ट अशीच लांबत जाईल संपणार नाही
त्यामुळे थांबतो,,,
तात्पर्य:- *आपल्या विचारांवर ठाम नसणार्यांची अवस्था अशीच होते*
एकदा का चुकीच्या भूमिकेला तुम्ही मान्यता दिली तरी हरकत नाही परन्तु त्या भूमिकेवर ठाम रहा,,,
म्हणून तर इतिहास रामा सोबत रावणाच,, कृष्णा सोबत कंसाच,, अर्जुना सोबत दुर्योधन कर्नाच नाव घेतलं जातं
*नाही तर रोज नव्याने कांदे आणि शंभर चाबकाचे फटके खाणं नशिबी येत तिथे त्रागा करण्यात अर्थ नसतो*
*भोगा आपल्या कर्माची फळ*,,,,
*आम्ही आमचा मार्ग निवडला आहे ज्यांनी 5 गाव सुद्धा देणं प्रशस्त वाटत नव्हतं त्यांच्या नशिबी महाभारत हे ठरलेलंच*

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...