Skip to main content

Posts

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

क्रांतिकारक अनंत लक्ष्मन कान्हेरे

क्रांतिकारक अनंत लक्ष्मन कान्हेरे यांनी ज्याकसन चा वध केला. सुरवातीचे शिक्षण इंदूर नंतर संभाजीनगर येथे झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे स्थापन केलेल्या अभिनव भारत या क्रांतीकारकाच्या संघटनेचे ते सदस्य झाले. त्यांच्या बरोबर त्याकाळात अण्णा कर्वे तसेच विनायक देशपांडे जे त्याकाळी नाशिक पंचवटीत शिक्षक होतेव पुढे त्यांच्या बरोबर जाक्सन खटल्यात आरोपी देखील होते. एका भारतीयाने एका इंग्रजाच्या गोल्फ च्या बॉल ला हाथ लावला म्हणून त्याला मरेस्तोवर मारण्यात आले,,,, दुसऱ्या एका घटनेत एक युवक कालिका मंदिरा कडून येणाऱ्या रस्त्यात " वंदे मातरम " चा मंत्रघोष करीत होता. म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला लादण्यात आला,,, त्याचे वकील पत्र घेणाऱ्या बाबासाहेब खरे यांच्या घरावर त्यांनी वकील पत्र घेतल्यामुळे जप्ती आणली,,, तर त्यांना वकिली करण्यापासून आजन्म बंदी घातली,,, बाबाराव सावरकरांनी १६ पानी कवितेचे पुस्तक "कवी गोविंद" प्रकाशित केले म्हणून त्यांच्यावर खटला भरून त्यांना अटक केली,, ज्याक्सन ची नाशिक ची कारकीर्द हि अशी वा...

सचिन,क्रिकेट आणि बागी पानसिंग तोमर

का कुणास ठावूक पण पानसिंग तोमारचा सिनेमा आणि सचिनचे शतक दोन्ही एकदम आले, आणि पानसिंगच्या कार्तुत्वापुढे सचिन आणि क्रिकेट खुज वाटू लागल हे नक्की,, घरची प्रचंड गरिबी धावता येत हेच भांडवल प्राथमिक शिक्षण घेतलेल्या पानसिंग तोमरने मग "मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट"अस म्हणत लष्कराचा रस्ता धरला.वडील,आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत,भांवडांनाही कामाला जावं लागायचं. अशा परीस्थित हा लष्करात सामील झाला त्यातही मोठ्ह कारण त्याला खायला भरपूर लागत असे आणि खेळाडू म्हणू ते त्याला लष्करात मिळत होते,, पण दुर्दैव पहा त्याला डाकू म्हणून जितकी प्रसिद्धी त्याला मिळाली तितकी खेळाडू म्हणून नाही मिळाली  आणि सिनेमात तसा एक डायलॉग देखील आहे ,एकेठिकाणी तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा देवून तो एक यशस्वी अपहरण करतो लगेच टीव्हीवर आणि रेडीओवर बातमी झळकते डाकू पानसिंग ने अस केल त्यावेळी पानसिंग उद्वेगाने म्हणतो, "देशासाठी सुवर्ण पदक जिंकत होतो त्यावेळी काल कुत्र विचारात नव्हत आणि तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा काय दिला सगळीकडे नाव झाल,,,?" पायात घालायला नीट बूट नसताना पानसिंग तोमरने ...

सुभेदार "डाकू" पानसिंग तोमर ,,एक चपराक

आज सकाळीच "स्क्र्याच " नावाची गोष्ट वाचली त्यात एक नव्याने श्रीमंत झालेला माणूस आपली नवी कोरी गाडी घेवून रस्त्याने जात असतो स्वतःच्याच कौतुकास पात्र असा तो मेहनतीने हे सार मिळवलेल असत आणि त्या खुशीत तो चाललेला असतो आणि अचानक एक मोठ्ठी वीट त्याच्या गाडीवर येवून आदळते अर्थातच त्याला खूप राग येतो आणि स्व कष्टाच्या कमाईचा कुणी असा खेळ खंडोबा करत असेल तर कसे चालेल ? आणि रागात तो खाली उतरतो पाहतो तर , एक लहान मुलगा हातात दगड घेवून पुन्हा मारायला तयार ,,, हा माणूस त्याच्या कानाखाली मारणार तोच तो मुलगा विनवतो साहेब मारू नका मी मगच पासून बर्याच गाड्यांना थांबवायचा प्रयत्न करतोय माझा भाऊ अपंग आहे त्याला बराच लागल देखील आहे आता तो माझ्याच्याने तो उचलवला  जात नाही ,म्हणून खूप गाडीवाल्यांना मी विनंत्या केल्या कि मला मदत करा पण kunihi माझ ऐकल नाही नीजालास्त्व मग मला दगड उचलून तुमच्या गाडीवर मारावा लागला जेणे करून निदान त्या निमित्ताने खाली उतरला माझी अडचण ऐकल्यावर मदत कराल ,,,, गोष्टीतला तो अर्थातच त्याची मदत करतो वैगेरे वैगेरे,,,, पण खरच विचार करा आपण सारे असे कुणावर ...

प्रिय गुरूजी,

आजच्या आई वडिलांना शिवाजी महारज माहित नसतील त्यानी निदान हे लिंकन च पत्र वाचून दाखवाव आपल्या मुलांना गांधींपेक्षा लिंकनचा आदर्श केव्हाही चांगला ,,,,,,,,, त्यांच्या लक्षात येईल   आपल्या देशाला खरी गरज कुणाची आहे , अब्राहम लिंकन सारख्या बापाची की देशाला नपुंसक बनवनार्या तथाकथित महात्म्याची ? ,,,     सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात; नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा - जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात , तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहीत आहे; सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत… तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा , घाम गळून कमावलेला एकाच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नम...

गिरगाव व्हाया दादर

काही दिवसां पूर्वी आचार्य आत्रे रंगमदिरात गिरगाव व्हाया दादर नाटकाचा प्रयोग पाहिला होता ,  तसा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचलाच आहे, आणि न कळत्यावेळी अनुभव हि घेतला आहे . पण वेळ होता अन् योगायोगानेच या नाटकाचा  प्रयोग हि त्या मुळे हे शक्य झाल,  एका सत्य घटनेवर आधारीत आणि वास्तवाशी संबध आसलेल्या या नाटकाला तशी तुरळकच गर्दी होती,  आणि कोणताही धांगडधिंगा न करता शांततेत नाटक पाहत होती.. या नाटकाची संहिता तशी साधीच पण खुप काही सांगुन जाणारी काल परवाच हि घटना घडुन गेली की, काय ? आशी जाणीव करुन देणारी ..  अर्थात आज पन्नास वर्ष उलटली तरी जखम ही  आजुन ओलीच आहे फक्त थोडी खपली धरली आहे. १०५ हुत्म्याच्या बलिदाना नंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, आचार्य आत्रे, एस् एम जोशी काँ डांगे आणि अनेकाच्या नेतृत्वाने सतत पाच वर्ष मोरारजी देसाई आणि नेहरु सारख्या लोकांशी संघर्ष करुन मिळवली आहे हि मुंबई... महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल. ...

"गावात नाही विचारात काळ कुत्र आणि फेसबुकवर हजारो मित्र"

काही गोष्टी योगायोगाने समोर येतात २\४ दिवसंपुर्विया  एका मित्राने एक कविता पाठवली त्यात आपण सारे कसे एकमेकांपासून दूर जावू  लगलो आहोत आधी पत्र मग फोन आणि मोबाईल आणि आता फेसबुक वर भेटताना ही आपली कशी दमछाक होते आहे ह्याच सुंदर वर्णन त्यात होत आणि काल परवा आमच्या भगिनी "माता मृदुलांमयी" यांनी त्यांच्या अमर वाणीतून या सार्या प्रकारचा एका वाक्यात विश्लेषण केल ते अस "गावा त नाही विचारात काळ कुत्र आणि फेसबुकवर हजारो मित्र" आणि मी सहजच विचार करू लागलो जेव्हा माझ्या कडे मोबाईल नव्हता ,,, आणि ईतरान कडे  तो होता साहजिक सारे विचारात अरे तुझा  नं. दे  मी सहज घरातील किंवा दुकानातील नं देत असे आणि त्यांनी फोन केला कि मी कदाचित दुकानात किंवा दुकानात केला तर घरी मग ते रागवायचे अरे मोबाईल ghena आणि एकदाचा होय नाही करता करता मी मोबाईल घेतला आजच्या घडीला ७००\८०० नं असतील पण खूप कमी मित्र आहेत जे आजही मैत्री टिकवून आहेत,,, असो तर सांगायचं ईतकच मी विचार करू लागलो ,,, आज माझे हि नाही नाही म्हणता म्हणता फेसबुक वर १००० मित्र होतील,,, "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र...

मझ्या कडे ईमैल असता तर,,,?

हि गोष्ट आहे खास मराठी माणसासाठी ,,,,, जवळ पास मी कदाचित दहावीत असेन आमच्या वर्गाला एक शिक्षक आले नव्हते तेव्हा देशपांडे नावाचे मास्तर आले होते आणि त्यांनी हि गोष्ट सांगितली ,,, त्यावेळी विशेष कळली नव्हती पण,,, खरतर कालच मी या विषयावर लिहिणार होतो. कारण आमच्या हि भागात संध्याकाळच्या वेळी मनसेने भाजीची गाडी आणि त्याच बरोबर गहू तांदूळ हि स्वस्त दारात विकायला सुरवात केली आहे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम मनसे राबवत आहे,पण नेमका HSS   वर वाद झाला आणि सरांची खूप आठवण आली त्यांची ती गोष्ट हि आठवली ,,, मझ्या कडे ईमैल असता तर,,,? सर दरवेळी अशाच गोष्टी सांगत,,हि गोष्ट त्यांनी सांगितली ईंग्लंड मध्ये घडलेली . एका गर्भ श्रीमंत माणसाची पण काळाची चक्र उलटी फिरली आणि तो कफ्फ्लक  झाला ,, वर वय हि उलटून गेलल काम धंदा शोधताना त्याच वय हि आडव येई ,,दिवसेंदिवस परस्थिती बिकट होत चालली होती, हाताला कामची सवय नाही,,, काही काम मिळण्याची शक्यता नाही ,, पैसे हि हळू हळू संपत चालले होते,, नातेवाईक तोंड लपवत होते ,,, मागणारे वाढत होते ,, कर्जाचा बोजा वाढतच चलला होता,,, काय कराव काही कळत नव...

सिनेमा डर्टी नको चांगला हवा,,

आज दोन बातम्यांनी मला अस्वस्थ केल  कुठे चाललो आहोत आपण? सकाळी वृत्तपत्रात बातमी वाचली डर्टी सिनेमात घातलेली विद्याची साडी ९० हजाराला विकली गेली ,,,आणि दुसरी बातमी ,, दुपारी बातम्या लावल्या आणि नागपुरातील आमदार डर्टी सिनेमा पाहायला कसे गेले, मग मिडीयावाले कसे आले मग त्यांच्या पासून लपण्यासाठी त्या आमदारांना काय काय उद्योग करावे लागले... ते रसभरीत वर्णन आणि त्या आमदारांचे मीडियापासून लपवलेले चेहेरे केविलवाणे दिसत होते. माझ्या लहानपणी कधी कधी ऐकायला मिळायचे कि अमुक हिरोचे कपडे,चप्पल,बुट किंवा काही हिरोईंस ची अंतर वस्त्र हि लीलावत विकली गेली पण हे सार तिकडे विदेशात घडत असे आणि मला त्यातलं विशेष काही कळत नसे पण हे लोन आता आपल्या कडे हि? माझा एक मित्र हि तो डर्टी सिनेमा पाहून आला. तसे त्याने एफबी वर टाकले हि होते त्याला डझनावारी कॉमेंटहि आल्या . मी काही अजून पहिला नाही पण ,,, चित्रपटाची कथा सांगायला लागू नये ईतकी सर्वांना परिचित आहे, त्यामुळे मी त्यावर काय बोलाव ? नावातच काही आहे, तरीही आपण तो सिनेमा पाहावा आणि त्यासाठी ईतका आटापिटा ? असो, वृत्तपत्रातील परीक्षण सांगते , सिने...

दिल्ली ,नादीरशहा आणि कुत्रा-१

गेल्यावर्षी पानिपतच्या २५० वर्षांच्या निमित्ताने तिथे गेलो होतो, मग फिरता फिरता दिल्लीला पोहचलो तिथे फतेपुरी येथील धर्मशाळेत राहिलो होतो . तिथल्या मालकांशी मग बोलता बोलता चांगली ओळख झाली दिल्लीच्या अनेक ओळखी सांगितल्या त्यापैकी हि एक ,,, नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केल्यावर ३ दिवस दिल्ली लुटली जात होती , जे मिळेल ते हडप केल जात होत पण अनुभवी आणि वयोवृध्द सल्लागाराने नादिरशहाला विनंती केली आता महाराज आता काही राजपाटच्या गोष्टी करा,,,, त्यावेळी नादिरशहाने जे उत्तर दिले ते असे ,,, "हम यहाँ राजपाट के लिये नाही लुट-पाट के लिये आये हैं" ते मालक म्हणाले हि आमच्या दिल्लीची ओळख ? सुनील ईथे येणारा कुणी नादिरशहा असो वा आजचा राजकारणी त्यांचा धंदा एकच लुट-पाट,,,,,,,,,,,,,,,? हो पण लक्षात ठेव हि दिल्ली दिसते तशी नाही बर, वाऱ्याबरोबर पलटी मारन हे राजकारणी तिच्याकडूनच शिकले आहेत, एक गम्मत-किस्सा सांगतो, पुढे म्हणाले,, दिल्लीचा एक नवाब होता तो दरबारात असताना त्याच्या शेजारी त्याचा लाडका कुत्राही बसत असे.नावाबाला कुर्निसात करताना लोक त्याच्या कुत्र्यालाही सलाम करत . एक दिवस हा ...

कौल मनाचा अर्थात छापा कि काटा

दुपारी टीव्ही लावला आणि नेमक गाण लागल रामपूर का लक्षुमण मधल "प्यार का समय कम है जहां लडते है लोग कसे वहां ? क्यू मेरे यार हा मेरे यार क्या बात काही दे ताली,,,,"आणि ,, मघाशी मला एक मेल आला माझ्या मित्राचा कि त्याला नोकरीची गरज आहे कुणी काही मदत करू शकेल का? पण आयटीत नको इंजीनियर आहे मुंबईतच हवी वैगेरे अस बराच काही लिहाल होत,,,, आणि मलाच माझ्या लहान पणाची मला एक अडचण आठवली आणि आठवले ते आमचे काळेमास्तर ,,,, त्यांनी जे सांगितले ते आज तागायत विसरलो नाही. मी आणि माझा मित्र संदेश दोघे जिवलग ( सध्या त्याचा पत्ता नाही) आम्हा दोघात अगदी शुल्लक कारणावरून मारामारी झाली का तर म्हणे त्याने मला न विचारात माझा डब्बा खाल्ला,,,, आमचे काळे मास्तर तसे खूप कडक पण मुलांवर त्याचं बारीक लक्ष असे, काय करतात काय बोलतात आणि तो दिवस जवळ आला जेव्हा मला ग्यादारिंग मध्ये सहभाग घायचा होता मी एक चांगला गायक होतो ( हा आता भूतकाळ आहे) असो,, आणि संदेश एक चांगला पेटीवादक होता त्या बाबतीत त्याचा हात धरणार कुणी नव्हत, आता काय करायचं ? मला गाण गायचं तर संदेशची मदत लागणार आणि आमच तर भांडण,,,,? बर मदत म...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

दीपावलीच्या शुभेच्छा देताना ,,,,2

कारगीलच्या युद्धात शहिद झालेल्यांच्या घरीही  आज दीपावली साजरी होत असेल. आणि का नाही...  त्यांचा हक्क सर्वात प्रथम आहे. पण,,,,  कंदिलाच्या जागी त्यांच्या दारात शौर्यपदक, तर,,, पणत्यांच्या जागी मुलाची शौर्यगाथा असेल, हाच काय तो एक फरक ,  त्यांच्या आणि आपल्या घरातला.  नसेल आज सोबत त्यांचा मुलगा...  जो दरवर्षी मोठया आनंदाने त्यांच्याबरोबर दीपावली साजरी करायचा.  पण म्हणून काय झाले! त्याच्या लहानसहान आठवणीच पुरेशा आहेत,  वृद्ध आईवडिलांच्या कोमेजलेल्या ओठांवर हसू आणायला. त्यांना अभिमान असेल की, आज संपूर्ण हिंदुस्थानात जी मोठया आनंदाने ही दीपावली साजरी होत आहे.  याला एकचं गोष्ट कारणीभूत आहे.  आणि ती म्हणजे त्यांच्या शूरवीर मुलाने, आपल्या देशाच्या रक्षणांसाठी, शांतीसाठी हसतमुखाने दिलेली आपल्या प्राणांची आहुती ! हिच गोष्ट पुरेशी आहे त्यांच्या कुटुंबियांस हि दीपावली साजरी करण्यास. ठाऊक आहे मला लिहीणं आणि बोलणं खूप सोपं असतं. ज्याचं जळत ... त्यालाच त्याच दु:ख कळत. म्हणूनच...

वसुबारस-माझा गाय कापण्याला विरोध नाही ,,,,,१

आज दिवाळीचा पहिला दिवस, वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी /गोवत्सद्वादशी) वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. तीच गाय आपल्या पाडसाला पुरेल इतके दुध देवून अजूनही सात्विक दुध देवून मनुष्यावर उपकार करते. यासाठी आपण सवत्स धेनूची पूजा करतो. त्यात असे मागतो कि गाय म्हणजे जणू पृथ्वी जी विष्णुपत्नी आहे, ती जसे आपल्या पाडसाचे व जगाचे सात्विक अन्नाने भरण पोषण करते..तसे हे माते पृथ्वी, तुझ्यामुळे आम्ही उपकृत आहोत. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रि...

आम्ही १०५,,,, १

हि गोष्ट आहे माझी जन्मठेप या पुस्तकातील ,,,,,, वास्तविक महाभारत काय रामायण काय आणि हिंदूंचे ईतर धर्मग्रंथ काय हे सारेच १०५ चा मंत्र आपल्याला सतत देत असतात . पण आज हि सावरकरांची गोष्ट मुद्दाम देत आहे कारण ,,, येथे फेसबुक वर आपण सारेच एकमेकांची फाटकी उसवण्यात धन्यता मानत आहोत... त्या सार्या मराठी हिंदुत्ववादी ग्रुप साठी ,,,,,, तर ,, सावरकर सांगतात तुरुंगात आम्ही बातम्या मिळवण्यासाठी जीवाच रान करीत असू,, जेणे करून देशात काय उलथापालथ चालली आहे ते समजून आमचे कष्ट फुकट तर जात नाही हे समाधान मिळत असे,,, आणि बारी साहेबाचे अमानुष प्रकार आम्हाला सहन करायची ताकद मिळत असे,,, त्या बातम्या मिळवण्याचा एक दुवा खुद्द बारी साहेब हि असे तो हि प्रसंगी आम्हाला देशातल्या बातम्या सांगत असे परंतु सांगण्यामागे आम्हला केवळ दुखः कसे होईल ते पाहण्यासाठीचा असे,,,,,,, आणि त्या दिवशी असेच बारी साहेब आहे आणि त्यांनी सांगितले... आम्ही सारे नेमके जेवायला बसत होतो तोंडात घसा टाकणार तोच बारी म्हणाले,,, well ,you always want news ,mr . sarvarkar , here is something for you , ghokhle is dea...

जिंदगी फिर ना मिलेगी दोबारा,,,,,,,,,,,,

माझा मित्र जितेंद्र जोशी याच्या बर्याच आग्रहा वरून मी हा सिनेमा पहिला आणि,,,,,,, हा सिनेमा म्हणजे नितांत सुंदर स्वानुभव ,,,,, आधुनिक युगाच्या जीवनशैलीवर हसत खेळत बोचरी टीका करत जीवनाचं तत्वज्ञान आपल्या समोर मांडतो,,,,,,,, कि का जगाव? कस जगाव ?कुणासाठी जगाव? कधी जगाव ? आपल्या  ईतक्या धावपळीचा खरच काही उपयोग आहे का? उद्या जगण्यासाठी खरच आज मरण गरजेच आहे का ? आजच्या एकंदरीतच हरवलेपणाच्या जगण्यावर ,, भाष्य करणारा चित्रपट,,,,,' घडाळ्याच्या काट्यावर ,,आणि मोबाईलच्या तालावर जगणार्यांनी पाहावा असा चित्रपट,,, मिळवायच्या शर्यतीत आपण आपल्याच माणसांपासून कसे दूर जात आहोत हे सांगणारा चित्रपट,,, जगण्यासाठी आपल्याला नक्की काय लागत ते सांगणारा चित्रपट,,, तर हा सिनेमा आहे तीन घट्ट मित्रांचा ,,,,,,,,,,, सुरवात होते अभय देओलच्या लग्न गाठी वरून ,, आणि ठरत लग्न व्हायच्या आधी एक ब्याचालर पार्टी करावी त्यासाठी तिघांनी बाहेर पडायचं अस ठरत ,,,,,, पण, ह्रितिक साहेब  कामात गळ्यापर्यंत बुडालेले असतात माझ्या मित्राच्या भाषेत श्वास घ्यायला देखील वेळ नसतो,,,,, खूप मिनतवारी केल्यावर ह्रि...