Skip to main content

दिल्ली ,नादीरशहा आणि कुत्रा-१

गेल्यावर्षी पानिपतच्या २५० वर्षांच्या निमित्ताने तिथे गेलो होतो,
मग फिरता फिरता दिल्लीला पोहचलो तिथे फतेपुरी येथील धर्मशाळेत राहिलो होतो .
तिथल्या मालकांशी मग बोलता बोलता चांगली ओळख झाली
दिल्लीच्या अनेक ओळखी सांगितल्या त्यापैकी हि एक ,,,
नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण केल्यावर ३ दिवस दिल्ली लुटली जात होती ,
जे मिळेल
ते हडप केल जात होत पण अनुभवी आणि वयोवृध्द सल्लागाराने
नादिरशहाला विनंती केली आता महाराज आता काही राजपाटच्या गोष्टी करा,,,,
त्यावेळी नादिरशहाने जे उत्तर दिले ते असे ,,,
"हम यहाँ राजपाट के लिये नाही लुट-पाट के लिये आये हैं"
ते मालक म्हणाले हि आमच्या दिल्लीची ओळख ?

सुनील ईथे येणारा कुणी नादिरशहा असो वा आजचा राजकारणी
त्यांचा धंदा एकच लुट-पाट,,,,,,,,,,,,,,,?

हो पण लक्षात ठेव हि दिल्ली दिसते तशी नाही बर,
वाऱ्याबरोबर पलटी मारन हे राजकारणी तिच्याकडूनच शिकले आहेत,
एक गम्मत-किस्सा सांगतो, पुढे म्हणाले,,
दिल्लीचा एक नवाब होता तो दरबारात असताना त्याच्या शेजारी त्याचा लाडका
कुत्राही बसत असे.नावाबाला कुर्निसात करताना लोक त्याच्या कुत्र्यालाही सलाम करत .
एक दिवस हा कुत्रा मृत्युमुखी पडला. त्याची मिरवणूक काढण्यात आली .
त्याच्या अंत्ययात्रेला हि तोबा गर्दी झाली, नावाबाचा
कुत्रा तो आख्खी दिल्ली त्यात सामील झाली .
आणि एक दिवस परंपरेनुसार नवाबाच्या मुलाने बंद करून ,
नावाबाला कैदेत टाकले व राजगादी बळकावली त्याच कैदेत एक दिवस
नवाबाचा मृत्यू झाला पण गम्मत बघ त्या नवाबाच्या अंत्ययात्रेला काळ कुत्र हि हजर नाही राहील,,,,,,,,

तरही दिल्लीमध्ये एक रग आहे एक मस्ती आहे,
पण हे शहर ईथली संस्कृती दिखावू आहे राजकारण्यांप्रमाणेच ,,,
हे प्रदर्शनाची प्रचंड हौस असलेले शहर आहे.खिशात एकही छदाम नसताना
मिशांना तूप लावायला नाही विसरत ,,,,
ईंग्रजीत ज्याला "स्टेटस कॉन्शस"
 म्हणतात त्या मनोवृत्तीचे हे शहर.,,
तुम्ही कुठे राहता ? कोणते कपडे घालता? यावरून तुमची परीक्षा केली जाते,
साधी राणी आणि उच्च विचारसरणीला ईथे कवडीची किंमत नाही.
पैसा सत्ता ज्यांच्या कडे दिल्ली त्यांनाच आपलेसे करते,
अशी हि दिल्ली आपल्याच मस्तीत नेहमी मश्गुल असते ,,,

तात्पर्य--आजही आपण नजर उचलून पाहिलं तर ,
दिल्लीवर एक विदेशी नवाब राज्य करत आहे आणि त्याची ताकद ईतकी कि
एका सिंहाला दारातल काळ कुत्र बनवून ठेवलं आहे ,,,,,,
आणि महाराष्ट्राचा जाणताराजा त्या नावाबाचे तळवे चाटण्यात धन्यता मनात आहे.
विदेशी विदेशी करत फक्त भुई धोपटली,,,
आधी ईन्दिरा गांधी, राजीवगांधी, आता सोनिया मग राहुल हे सारे नवाब होतील
पण हे दरातील कुत्रेच राहतील आणि ज्या नावाबांच्या जीवावर मोठे होत आहेत
ते गेले कि यांना कुणीही विचारणार नाही.




Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...