Skip to main content

क्रांतिकारक अनंत लक्ष्मन कान्हेरे


क्रांतिकारक अनंत लक्ष्मन कान्हेरे यांनी ज्याकसन चा वध केला.
सुरवातीचे शिक्षण इंदूर नंतर संभाजीनगर येथे झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या
विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे स्थापन केलेल्या
अभिनव भारत या क्रांतीकारकाच्या संघटनेचे ते सदस्य झाले.
त्यांच्या बरोबर त्याकाळात अण्णा कर्वे तसेच विनायक देशपांडे जे त्याकाळी नाशिक पंचवटीत शिक्षक होतेव पुढे त्यांच्या बरोबर जाक्सन खटल्यात आरोपी देखील होते.
एका भारतीयाने एका इंग्रजाच्या गोल्फ च्या बॉल ला हाथ लावला म्हणून त्याला मरेस्तोवर मारण्यात आले,,,,
दुसऱ्या एका घटनेत एक युवक कालिका मंदिरा कडून येणाऱ्या रस्त्यात " वंदे मातरम " चा मंत्रघोष करीत होता.
म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला लादण्यात आला,,,
त्याचे वकील पत्र घेणाऱ्या बाबासाहेब खरे यांच्या घरावर त्यांनी वकील पत्र घेतल्यामुळे जप्ती आणली,,,
तर त्यांना वकिली करण्यापासून आजन्म बंदी घातली,,,
बाबाराव सावरकरांनी १६ पानी कवितेचे पुस्तक "कवी गोविंद"
प्रकाशित केले म्हणून त्यांच्यावर खटला भरून त्यांना अटक केली,,
ज्याक्सन ची नाशिक ची कारकीर्द हि अशी वादग्रस्त ठरत होती.
आणि ज्याक्सनची अशी मनोधारणा असे की येथील माणसे गुलामीत देखील सुरक्षित आहेत.
तो स्वतःला पूर्वजन्मीचा वैदिक ब्राह्मण समजत असे.
या सगळ्याचा बदला घ्यायचा हे कान्हेरे व त्यांच्या सहकार्यांनी ठरवले.व त्याला निमित्त ही मिळाले .
ज्याक्सनला बढती मिळून ज्याक्सन मुंबई येथे कमिशनर म्हणून नियुक्त झाला .
त्याच्या सन्मानार्थ विजयानंद नाट्यगृहात "शारदा"या नाटकाचा खेळ आयोजित केला गेला.
ठरल्याप्रमाणे ज्याक्सन आला तसे अनंत कान्हेरे यांनी त्याच्यावर एकापाठोपाठ एक चार गोळ्या झाडल्या.
आणि ज्याक्सन कोसळला.
आधी ठरल्याप्रमाणे अनंत कान्हेरे कुठलाही पुरावे राहू नये म्हणून स्वतःवर नंतर गोळ्या झाडून घेणार होते पण हे साध्य झाले नाही .
दुर्दैव त्यांना तिथें जमलेल्या लोकांनी पकडून दिले !!
त्यांच्या बरोबर अनंत कर्वे व विनायक देशपांडे यांना सुद्धा अटक झाली.खटला चालला.व यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली.
फाशी ची अंमलबजावणी ठाणे कारागृहात १९ एप्रिल १९१० रोजी करण्यात आली
त्यावेळी त्यांच्या कुठल्याही नातेवाईकास भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली,,
तसेच फाशी नंतर त्यांची पार्थिवे सुद्धा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली नाही,,,
त्यांच्या अस्थी देखील ब्रिटीश अधिकार्यांनी मुंबई जवळ समुद्रात टाकून दिल्या,,,
कोटी कोटी प्रणाम ..........!
त्या अंजनीच्या सुताला
अनंत कान्हेरे यांचा जन्म १८९१ साली खेड,
रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनी या छोट्या खेड्यात ब्राह्मणवाडीत झाला.
भारत माता की जय ! वंदे मातरम !
आजही अभिनव भारत ची वास्तु व ते विजयानंद ( आता त्याचे चित्रपट गृह झाले. )
नाट्यगृह जसे च्या तसे जुन्या नाशकात आहे.
अभिनव भारत च्या त्या वास्तुत प्रवेश केल्यावर वेगळीच अनुभूती प्राप्त होते.
त्या वास्तुत तळमजल्यावर आपणास "अनंत कान्हेरे कक्ष " असा मोडी लिपीतला नामफलक दिसतो.
तर ज्या ठिकाणी अभिनव भारत च्या गुप्त बैठका होत असत तो कक्ष पहिल्या मजल्यावर आहे.

Comments

  1. कोटी कोटी प्रणाम ..........!
    त्या अंजनीच्या सुताला
    अनंत कान्हेरे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल