Skip to main content

मझ्या कडे ईमैल असता तर,,,?

हि गोष्ट आहे खास मराठी माणसासाठी ,,,,,
जवळ पास मी कदाचित दहावीत असेन आमच्या वर्गाला एक शिक्षक आले नव्हते तेव्हा देशपांडे नावाचे मास्तर आले होते आणि त्यांनी हि गोष्ट सांगितली ,,,
त्यावेळी विशेष कळली नव्हती पण,,,

खरतर कालच मी या विषयावर लिहिणार होतो.
कारण आमच्या हि भागात संध्याकाळच्या वेळी
मनसेने भाजीची गाडी आणि त्याच बरोबर गहू तांदूळ हि
स्वस्त दारात विकायला सुरवात केली आहे अत्यंत स्तुत्य असा उपक्रम मनसे राबवत आहे,पण नेमका HSS  वर वाद झाला
आणि सरांची खूप आठवण आली त्यांची ती गोष्ट हि आठवली ,,,
मझ्या कडे ईमैल असता तर,,,?
सर दरवेळी अशाच गोष्टी सांगत,,हि गोष्ट त्यांनी सांगितली ईंग्लंड मध्ये घडलेली .
एका गर्भ श्रीमंत माणसाची पण काळाची चक्र उलटी फिरली आणि तो कफ्फ्लक झाला ,,
वर वय हि उलटून गेलल काम धंदा शोधताना त्याच वय हि आडव येई ,,दिवसेंदिवस परस्थिती बिकट होत चालली होती,
हाताला कामची सवय नाही,,,
काही काम मिळण्याची शक्यता नाही ,,
पैसे हि हळू हळू संपत चालले होते,,
नातेवाईक तोंड लपवत होते ,,,
मागणारे वाढत होते ,,
कर्जाचा बोजा वाढतच चलला होता,,,
काय कराव काही कळत नव्हत आणि एक दिवस ,,,
वृत्तपत्रात एका नोकरीची जाहिरात आली आणि सुदैवाने तो त्या नोकरीला लायक होता मनाचा हिय्या करून तो अर्ज घेवून तिथे गेला आणि चमत्कार त्याला नोकरीही मिळाली आता मालक म्हणाला,तुमचा ईमैल जरा कळवा कारण,,
"जी काही जबादारी तुमच्यावर सोपवणार ती आणि तुमचा पगार,
बाकीच्या नियम आणि अटी तुम्हाला सविस्तर कळवता येतील" ,,,
तेव्हा जाता जाता बाहेरच्या टेबलावर अर्ज आहे त्यात तुमचा ईमैल नोंदवा आणि उद्या पासून कामावर हजार राहा,,,
ईथेच नेमकी गडबड होते या महाश्यायांकडे ईमैलच नव्हता,
त्याने प्रांजळपणे तस सांगितलं तसा कंपनीचा मालक चिडला ,,
"तुमच्या कडे ईमल आयडी नाही"
आणि माझ्या कडे नोकरी मागायल आलात लाज नाही वाटत?
ईतके कसे मागासलेले तुम्ही चला चालते व्हा,,,,
आता करायचं या विचारात समोरचा बगीच्यात येवून बसला
खिशात हात घातला तर फक्त ३०\३५ रुपये आता कस करायचं?
या विवंचनेत बसला असता काही मुल खेळताना दिसली सोबत त्यांचे आई वडील हि बरोबर होते.
भूक तर लागलेली काय करूया ? विचार मनात यायला आणि त्याला समोरच बेकरी दिसली .
तिथून काही केक विकत घेतले आणि सहजच म्हणून नाममात्र फायद्यावर ते त्याने सहज विकले ,,
झाल ३५चे ४० रुपये व्हायला वेळ लागला नाही आणि त्याला
यशाची किल्ली सापडली ,,,
करता करता तो मोठा व्यापारी झाला आता तो लोकांना नोकरीवर ठेवू लागला ,,
आणि काही दिवसांनी त्याचा धंदा ईतका वाढला कि त्याला जाब विचारण्यात आला.
तुम्ही ईतका मोतः धंदा करत त्यावर इंकम ट्याक्स का भरत नाही?
त्याला त्यातलं काहीच कळत नव्हत मग एक सीए बोलावण्यात आला
त्याने त्याला मग सगळ समजावून सांगितलं तुमचा धंदा किती? फायदा किती?
तुम्ही किती इंकम ट्याक्स भरला पाहिजे? ते सगळ सागितल आणि आता मला तुमचा
ईमैल आयडी द्या म्हणजे मी परस्पर तुमच काम करेण त्याची पूर्ण माहिती तुम्हाला
मैल द्वारे मिळेल आणि परत परत मलाही तुमच्या कडे येवून हे सर काम कराव लागणार नाही .
आपण एकमेकाला ईमैल पाठवत जावू जेणे करून मला हे काम करणे सोप्प जाईल,
काहीही अडचण आली तर मला मैल करा ,,
पण आधी ह्या फॉर्म वर तुमचा ईमैल द्या म्हणजे माझ काम सोप्प होईल,,
आता आली पुन्हा पंचाईत पहिले पाढे पंचावन्न,,,,
त्याने परत सांगितले,"माझ्या कडे ईमल आयडी नाही",,
आता मात्र तो सीए गडबडला म्हणाला काय साहेब चेष्टा करता काय?
तुमच्याकडे ईमेल नाही?
अहो खरच नाही माझ्या कडे ईमैल नाही,,
त्यावर तो सीए म्हणाला काय साहेब तुमच्या कडे
"ईमैल नाही तरी तुम्ही ईतका मोठा धंदा करताय जर ईमैल असता तर कुठल्या कुठे गेला असता तुमचा धंदा."
हे ऐकल मात्र त्याला अर्ध्यावरच थांबवत तो म्हणाला
"सीए महाशय माझ्याकडे ईमले असता तर माझा धंदा काय माहित किती झाला असता? पण मी हे नक्कीच सांगू शकेन जर माझ्या कडे ईमल आयडी असता तर ,,,
"एका मोठ्या कंपनीत कामाला जरूर असतो",,,
तात्पर्य - मराठी माणसाची अवस्था सध्या तशीच त्या गर्भ श्रीमंत माणसा सारखी झाली आहे.
माणसाने जे ठरवल ते करता येते पण ते ठरवण गरजेचे आहे .
सामर्थ्य आहे चळवळीचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ,,
मराठी माणसा कामालाच भगवंत मान मग बघ काय चमत्कार होतो ते
अरे भैया बिहारी ईथे औशधालाही उरणार नाही,,,
परत सारी मुंबई आपलीच असेल...



Comments

  1. Vikas Joshi
    10:38am Dec 19
    Suniil - Thanks for sharing such motivational and inspirational story.

    Keep it up.

    ReplyDelete
  2. Khup chhan

    Jayandra Wasnik
    8:18am Dec 19
    Khup chhan

    ReplyDelete
  3. धंदा करायला काय लागते.फक्त इच्छा?

    Dhananjay Kelkar
    3:14am Dec 19
    धंदा करायला काय लागते.फक्त इच्छा?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल