Skip to main content

कौल मनाचा अर्थात छापा कि काटा

दुपारी टीव्ही लावला आणि नेमक गाण लागल रामपूर का लक्षुमण मधल
"प्यार का समय कम है जहां लडते है लोग कसे वहां ?
क्यू मेरे यार हा मेरे यार क्या बात काही दे ताली,,,,"आणि ,,
मघाशी मला एक मेल आला माझ्या मित्राचा कि त्याला नोकरीची गरज आहे कुणी काही मदत करू शकेल का?
पण आयटीत नको इंजीनियर आहे मुंबईतच हवी वैगेरे अस बराच काही लिहाल होत,,,,
आणि मलाच माझ्या लहान पणाची मला एक अडचण आठवली आणि आठवले ते आमचे काळेमास्तर ,,,,
त्यांनी जे सांगितले ते आज तागायत विसरलो नाही.
मी आणि माझा मित्र संदेश दोघे जिवलग ( सध्या त्याचा पत्ता नाही)
आम्हा दोघात अगदी शुल्लक कारणावरून मारामारी झाली का तर म्हणे त्याने मला न विचारात माझा डब्बा खाल्ला,,,,
आमचे काळे मास्तर तसे खूप कडक पण मुलांवर त्याचं बारीक लक्ष असे,
काय करतात काय बोलतात आणि तो दिवस जवळ आला जेव्हा मला ग्यादारिंग मध्ये सहभाग घायचा होता
मी एक चांगला गायक होतो ( हा आता भूतकाळ आहे) असो,,
आणि संदेश एक चांगला पेटीवादक होता त्या बाबतीत त्याचा हात धरणार कुणी नव्हत,
आता काय करायचं ? मला गाण गायचं तर संदेशची मदत लागणार आणि आमच तर भांडण,,,,?
बर मदत मागायची म्हणजे ते सार अपमानास्पद वाटत होत ,,
बर दुसरा काही उपायही नाही ,,,
निर्णय घेण अवघड झाल ,,,
ईतर बऱ्याच मित्रांनी काहीबाही सल्ले दिले पण ते पटले नाही.
गाण तर गायचं पण कस काही कळत नव्हत डोक चालत नव्हत.,,,
आणि काळे मास्तर देवा सारखे धावून आले मदतीला ,,,,
मला बाजूला घेतलं आणि विचारलं काय भूमकर गाण गाणार म्हणे ?
मी- हो
मास्तर- पण पेटीच काय? ती कोण वाजवणार संदेशला भेटलास का?
मी-नाही,,,
मास्तर -मग आता काय करणार?
मी- काय करू? तुम्हीच सांगा ?माझ काही डोक चालत नाही...
मास्तर-छापा काटा कर,,
मी- काय सर छापा काटा काय सांगताय? हा काय नवा जादूचा प्रकार आहे का?(मनात म्हणालो)
पण सर पक्के त्यांनी माझ्या मनातल बरोबर ओळखल,,
मास्तर-अरे तू कर छापा काटा हे नाण जादुच आहे,,,,,
माझी आजी नेहमी म्हणायची काही अडचण आली कि छापा काटा करावा हे नाण तिनेच दिल आहे .
हे नाण तुला योग्य निर्णय देईल ,,,
ह हे नाण घे आणि ठराव छापा म्हणजे काय आणि काटा म्हणजे काय?
मी- (मनात चला हे हि करून पाहू) नाण घेतलं. उत्तर ठरवली आणि केला छापा काटा.
छापापपापा ,,,,,,,करत मोठ्याने ओरडलो  माझ्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता .
मास्तर मात्र गालातल्या गालात हसत होते. मला नेमक कळेना हे कस झाल ?
मला काय हव होत हे नेमक या नाण्याला कस कळल?
मास्तर म्हणाले मिळाल ना तुझ उत्तर ?
माझ्या मनात गोंधळ वाढला होता हे कस शक्य आहे ?
माझ्या मनात संदेशची माफी मागून दिलजमाई करावी असेच होते कारण त्याच्या शिवाय
गाण्याला मजाही येणार नव्हती आणि का ईतकी जुनी मैत्री एका शुल्लक कारणावरून तोडावी?
पण पाय उचलवत नव्हता ,,,,,,
मास्तर म्हणाले भूमकर अरे साध आहे उत्तर तूच आधी ठरवल होतस आणि तसाच घडल म्हणून तुला आनंद झाला
बस बाकी विशेष काही नाही हे काही जादुच नाण नाही मी आपल असाच बोलल होतो
तूच ठरवलास छापा आला तर हो आणि काटा आला तर नाही म्हणजेच छापा आला तर
संदेशची माफी मागायची आणि काटा आला तर नाही चालणार नाही माफी हि मागवीच लागेल
चित् भी मेरी पट भी मेरा असच तू ठरवलं होतास आणि तसच झाल,,,,,,
काय झाल तर आनंद होईल ते तू आधीच ठरवलं होतस
तुला तुझ उत्तर मिळाल आहे आता तुला तुझा राग रुसवा गिळून संदेश कडे जावे लागेल,
ईतर वेळी मनात काहीही गोंधळ असेल पण छापा काटा करताना तुम्ही नेहमी मनाच ऐकता
म्हणून आता उरली फक्त अंमलबजावणी उत्तर तर तयार आहेच आता मात्र मागे फिरू नकोस
तुला कौल मिळाला आहे तोही तुझ्याच मनाचा.
तात्पर्य--त्या माझ्या मित्राला आता मी ईतकच सांगेन छापा काटा कर
मनाचा कौल घे. कारण ईतर वेळी मनात काहीही गोंधळ असेल पण छापा काटा करताना तुम्ही नेहमी मनाच ऐकता.
आणि तुमच्या मनाचा थांग तुम्हाला लागतो. बघा असाच छापा काटा तुम्हीही करून बघा
अवघड वाटणारे प्रश्न आपणच कसे चुटकी सरशी सोडवतो

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...