Skip to main content

Posts

हरीण आणि कोल्हा

काल सकाळीच बातमी वाचली आमदारांना घसघशीत पगार वाढ ,,,,,,,, आणि त्या आधी ३ रु. ने पेट्रोल महाग झाल्याची बातमी आली होती मग अचानक वाघ,उंदीर,मुंगुस,हरीण आणि कोल्हा यांची गोष्टआठवली . या सार्यांची बर्या पैकी मैत्री होती. एक दिवस मात्र कोल्हा अचानक वाघाकडे जावून त्याला म्हणाला , "हे हरीण कित्ती सुंदर आहे ना?" याच मांस खायला मिळाल तर कित्ती बर ना? तास बरेच दिवस वाघाच्या हि मनात होताच पण जनक्षोभाला घाबरून तो गप्प होता आणि आता हि कोल्हा तस म्हणाल्यावर त्याने लगेच प्रतिक्रिया नाही दिली . पण कोल्हा बदमाश त्याने परत सांगितलं तसा वाघ म्हणाला , मी त्याला मरेन रे पण लोक काय म्हणतील? मित्राला मारलं...... त्यापेक्षा मी सांगतो तस कर,, तू उंदराकडे जा,.आणि त्याला हरिणाची खुर कुरतडायला संग, हरीण लंगड झाल कि मी मारतो आणि कुणी काही बोलला तर सांगू बिचार लंगड झाल होत त्याचे पुढे हाल होवू नयेत म्हणून मी त्याला मारलं,,,,, झाल प्ल्यान ठरला आणि उंदराने हरिणाचे पाय कुरतडले . आणि वाघाने त्याला मारलं.... आता त्या हरणाला खायला सारेच आतुर झाले ,पण..... कोल्हा म्हणाला तुम्ही सारे नदीवरू...

असच असत का प्रेम...?

||प्रेमाय तस्मै नमः|| एका डॉ.कड़े ८०\८५ वर्षाचे गृहस्थ आपल्या जख्मेचे   टाके काढून घ्यायला गेले . सकाळी ८.३० चा सुमार..  ते डॉ, ना म्हणाले, थोड़े लवकर होइल का काम? मला ९ वाजता जायचे आहें एकी कड़े माझी बायको दुसर्या हॉस्पिटल मध्ये एडमिट आहें. तिच्या बरोबर नाश्ता करायचा आहें. डॉ,,खुप आजारी आहेत का त्या? हो गेली पाच वर्षे ती हॉस्पिटल मधेच आहें, तिला "अल्झायमर्स"झालाय.. ती ओळख़त ही नाही आता कुणाला डॉ,,अहो ती ओळख़त ही नाही ना? तरी तिच्या बरोबर नाश्ता करायला रोज वेळेवर जाता ? त्यावर ते गृहस्थ म्हणाले.... "डॉ. ती मला ओळख़त नसली तरी,,  मी तिला ओळखतो ना?  गेली कित्येक वर्षे बायको आहें माझी ती .. आज माझी तिला गरज आहें आणि  मी पाठ दाखवावी का? अहो जिवापाड प्रेम आहें तिच्यावर ..."  ऐकता ऐकता डॉ.च्या अंगावर रोमांच उभे राहिले . गला दाटून आला त्यांच्या मनात आल ...   तात्पर्य -   हेच खर प्रेम ... प्रेम म्हणजे फक्त घेन देन नह्वे.. तर नीरपेक्ष पणे स्वतः कडचा आनंद  लुटवून, उधळवून घेणे.... त्या गृहस्था  सारख.   सकाळ...

लेकास निरोप

जागतिक पुस्तक दिनानिर्मित्ताने.... शेक्सपीयरचा जन्मदिन   –   २२ एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन म्हणून मानला जातो. त्या निर्मित्ताने, तळेगावच्या इंग्रजीच्या प्राध्यापक अपर्णा महाजन यांनी शेक्सपीयरच्या एका उता-याचा अनुवाद सादर केला आहे. तो आहे   ‘ लेकास निरोप ’   या स्वरुपाचा त्याचे महत्त्व आजच्या काळात प्रत्येक आईला व तिच्या लेकाला वा लेकांना स्वाभाविकपणेच कळून येईल.. लेकास निरोप अरे, लिऍंटर्स, अजून इथेच तू? आवर, आवर, प्रवासाची वेळ झालीय... बोटीत बसायची वेळ झालीय... बघ, तुझ्या बोटींच्या शिडांवर... वारं आरूढ झालंय... तू निघालायस, ...आशीर्वाद आहेतच माझे... पण थांब... बाहेर देशी जातोयस... वागण्याच्या काही रीतीभाती सांगतो तुला... स्मृतीमध्ये कोरून ठेव त्या तुझ्या... ऐक... तुझ्या विचारांना शब्दरूप देण्याच्या फंदात कधीसुध्दा पडू नकोस... आणि अस्थिर, वेडयावाकडया विचारांना कृतीत कधीच आणू नकोस... सगळयांशी समरसून वाग... पण वागताना, हीनतेकडे झुकू नकोस... तुला नवनवे मित्र मिळतील... त्यांची मैत्री पारखून घे... अशा मित्रत्वाला बांधून ठेव पोलादी कणखर साखळी... सारख्या ...

नटरंग ....

अतुलजी,सप्रेम नमस्कार, आपला नटरंग पहिला,,, आणि "पिंजरा नंतर अंगावर आलेला सिनेमा म्हणजे नटरंग " अस एका वाक्यात बोलू शकतो पण मग तुम्ही साकारलेल्या नटरंगावर, नटेश्वरावर, गणा पैल्वानावर, गणा कागलकरावर, फालक्यावर, आणि ,, ब्रुहन्नडावर, किशोर कदमच्या म्यानेजरवर, गुरु ठाकुर वर, गणाच्या सर्व सवंगडयानवर,  आणि ,, अप्सरा आली वर अन्याय केल्या सारखे होइल  ज्यांच्या शिवाय फडच उभा राहू शकत नव्हता. आणि सिनेमातला गणाचा होणारा बदल  "गणा पैलवान  आक्षी ५\१० मिनिटात गणा कागलकर" यावर बोलाव तितक कमी या  पाच मिनिटाच्या बदलासाठी तुम्ही काय दीव्य केल ते तुम्हालाच माहित. अफलातुन,,,,, आक्खा सिनेमा एका बाजूला आणि  तुम्ही एका बाजूला. वाह क्या बात है असेच गुणवान आणि  अतुलनीय कामगिरी बजावनारे त्यासाठी मनात घेणारे कलाकार  जर मह्राठी चित्रपट स्रुष्टिला लाभणार असतील  आणि मनात गणा कागलकर ची  जिद्द असेल तर ,, राजकार्न्यानी कलावंतांची इजार उतरवली तरी,,, मराठीचा झेंडा फडकतच  राहिल यात तीळमात्र ही शंका नाही. अभिन्दन पुन्हा त्रिवार अभिनन्दन...

सुतलीने बांधला हत्ती,,,,

काही दिवस आगोदर एक गोष्ट वाचली होती ती अशी,, आणि मला माझ्या प्रश्नच उत्तर  मिळाल सुतलीने बांधला हत्ती,,,, एका आश्रमा समोर एक हत्ती फिरत असे , तिथे येजा करनार्याना तो रोज त्रास देइ, त्याच्या या त्रासला कंटालुन एक दिवस सारे शिष्य जमा झाले आणि त्यांच्या रुषी कड़े त्याची तक्रार करून म्हणाले  महाराज या हत्तीचा काही तरी बंदोबस्त करा  महाराज आम्ही कंटाळलो. गुरु महाराज या हत्तीला इथुन हाकलून देणे उचित ठरेल. गुरुनी एक क्षण विचार केला आणि  शिष्यांना म्हणाले सारे जन मिळून त्याचा पाय साखळ दंडाने बांधून ठेवा . त्याप्रमाणे  सार्यांनी प्रयत्न करून त्या हत्तीला एका   वृक्षाला   बांधून ठेवले. हत्तीने काही दिवस पाय सोडवन्याचा अटोकाट प्रयत्न केला . पण  हळूहळू तो शांत झाला . २\३ महिन्यानी गुरुदेव म्हणाले आता त्या हत्तीला आता एका  दोरखंडाने बांधा,, शिष्य ,म्हणाले गुरुदेव साध्या  दोरखंडाने ? अहो तो राहिल का त्यात ? मी सांगतो तस करा  विश्वास ठेवा , पुन्हा २\३ महिन्यानी गुरुदेव आले व म्हणाले आता ,, तो दोर ही काढा आता साधी...

मुक्ता ,,,,,

मुक्ता मी तुझ कब्बड्डी कब्बड्डी पाहिलं आणि काय सांगू त्या नाटकाची मला वाटत माझ्या ईतकी जाहिरात कुणी केली नसेल (हे माझ मत आहे) मी स्वतः कब्बडी आणि कराटेशी संबंधित असा खेळाडू आहे आणि ते नाटक तू नाही केलं प्रत्यक्षात मला मी करतोय असा भास होत होता . माझी देखील अशीच काहीशी कथा आहे मला मुलगा म्हणून हे सार ईतक जड गेल प्रत्यक्षात ते मुलींना किती जड जात असेल कल्पना न केलेली बरी अरे हे सार सागताना तुझ्या अभिनयाला दाद ,,,,,बापरे काय जगलीस ते तू नाटक आणि आता जोगवा,,,,मला यांचा देखील चांगला अनुभव आहे तू  काय आणि ईतर सारे काय तुम्हाला कस काय जमत बुवा ? या सगळ्याला खूप चांगला म्हणन कमी पडेल ईतका तो चित्रपट सुंदर होता आणि आता मुंबई पुणे मुंबई अरे यार,,,,, व्यसन लागलाय मला तुझ्या चित्रपटांच आणि हे व्यसन तुझी अग्निशिखा सिरीयल पासून आहे बरका ,,, 

७४ जणांचे तळतळाट....

मध्ये एकदा  प्रबोधनकारांची गोष्ट वाचनात आली ,   आपणा पैकी कित्येकांना माहित हि असेल कदाचित,   असो तर गोष्ट अशी ,,,   केशव सीताराम ठकारे ,म्हणजेच प्रबोधनकार ,   त्यांच्या तरुण पणी त्यांनी एकदा लॉटरीच एक तिकीट काढल.   आणि कर्मधर्म संयोगाने ते लागल हि ,,,   गावात बातमी पसरली अरे ठाकरेंना लॉटरी लागली.   जो तो ठाकरेंच अभिनंदन करत होता   कारण मिळालेली रक्कम हि खूप मोठी होती   आज कदाचित ती तुम्हाला कमी वाटेल   कारण आज आपणा सर्वांची मुल त्या लॉ ट्रीच्या   रकमे ईतका पैसा रोज खर्च करतात.   तर ती रक्कम होती.   एक रुपयाच्या बदल्यात ७५ रुपये   हसलात ना..?   पण त्याकाळी ७५ रुपयात   किमान ६ महिने एखाद्या कुटुंबाचा घराचा खर्च चाले ,,,,,,   तर असे ते ७५ रुपये कधी एकदा आईच्या पायावर ठेवून   तिची शाबासकी मिळवतो असे ,   प्रबोधनकारांना झाले होते ,आणि हि बातमी तो पर्यंत   त्यांच्या आईला हि कळली होती ,   मुलाची वाट पाहत ती दरवाजात बसली होती ,   आणि धावत धावत केशव आला ...

गुजारीश ,,,,,दया मरणाची ,

अर्थात मृत्यूच सेलिब्रेशन ह्रितिक रोशनचा आणखी एक नितांत सुंदर सिनेमा मध्यंतरी अरुणा शानभाग चा विषय पुन्हा  एकदा गाजला होता . के ई एम रुग्णालयात आहे ती आहे आजहि, दया मरणाची  ईच्छा धरून असलेली पण नाही ,,,,,, आज हि ती  तिने न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतेय आणि नराधम सोहनलाल वल्मिकि १९७३  साली याने अरुणा शानभाग वर बलात्कार केला केवळ ७ वर्षाची सजा भोगून हा पठ्या सुटलाही,,,? आज तो कुठे तरी दिल्लीत कुठल्याशा दवाखान्यात च आहे म्हणे ,, त्याच्यावरील  आरोपत बलात्काराचा उल्लेखही नव्हता या ३६ वर्षात १९७३ ते २००९ के इ एम चे ७ डीन बदलले भोइवाड्याचे पोलिस बदलले,अधिकारी बदलले, नर्सेस बदलल्यापण अरुणा ला न्याय मिळाला नाही ,,,? असाच काहीसा वेगळा विषय घेवून आला  आहे गुजारीश,,,,,सरकार दरबारी तो हि दया मरणाची इच्छा प्रदर्शित करतो . आणि ती मागणी करताना अगदी जोरका झटका हि देतो प्रतिपक्षाच्या वकिलाला केवळ ६० सेकंद जादूच्या पेटीत बसायला लावतो आणि तो वकील एक मिनिट हि बसू शकत नाही . त्यावर तो म्हणतो, "माझ्या आयुष्याची ६० सेकंद हि तुम्ही जगू शकत नाही ?"क्या बा...

सत्य हे ईश्वराचे दुसरे रूप

माझ्या आईने माझ्या लहान पाणी सांगितलेली गोष्ट आहे हि विश्वासा सारखा दुसरा धर्म नाही आणि सत्य हे ईश्वराचे दुसरे रूप आहे हो कळण्यासाठी मात्र ती फांदी सोडन जरुरीच आहे . एक देवा धर्माला न मानणारा माणूस असतो , एके दिवशी तो सहज जंगलात फिरायला जातो आणि, अचानक एका दगडावरून त्याचा पाय घसरतो आणि तो खोल दरीत पडतो ,,,,,, पण, नशि त्याचा चांगल म्हणून पडता पडता त्याच्या हाताला एक फांदी लागते आणि तिला धरून तो लोबंकळू लागतो, आणि आता काय करायचं या विचारात तो त्याच्या मित्रांना हाका मारतो पण ते सारे पुढे निघून गेलेले असतात मदतीला कुणीच नाही काय करायचं? फांदी तर अशी कि आता तुटेल,,,,,, आता काय करायचं ? मोठ्ठा प्रश्न पडतो ?????????????????????? आणि शेवटी झाक मारत तो देवाचा धावा करतो . आणि देव हि लगेच धाव घेतो..... बोल भक्ता काय म्हणतोस? माणूस- अरे देवा तुझे डोळे आहेत कि बटर ? मी इथे फांदीला लटकतोय आणि तू काय शिळोप्याच्या गप्पा मारायला आला आहेस का? देव- भक्त मी तुला वाचवायलाच आलो होतो पण येथे आलो आणि कळल तू देव ईश्वर काहीही मनात नाहीस मग मी कसा काय वाचवायचं? माझे भक्त लोक माझ्या तो...

साप आणि साधू

एका जंगलात विषारी साप राहत होता तो ज्या वाटेवर असे त्या वाटेने कुणीही जात नसे गेल्यास तो मारत असे चावत असे ,,, लोक त्याल घाबरत असत त्याल दूषण देत असत, एक दिवस त्या एक जंगलात साधू येतो आणि त्या सापाच्या वारुळा जवळच आश्रम बांधतो त्याच्या भजन प्रवचनाचा त्या सापावर परिणाम होतो तो त्याला भेटून सांगतो मला सर्व वाईट बोलतात मी चावतो त्यामुळे घाबरतात मला सुद्धा आता लोकांनी चांगल बोलाव असे वाटते काय करू ,,? साधू म्हणतो तू चावायचं सोडून दे ,,,,,,,,,, झाल त्याचा ऐकून साप बाहेर येतो लोकांना समजत आता साप काही चावणार नाही मग त्याची परीक्षा घेण्यासाठी लोक जवळ जात काठीने ढोसत कुणी उचलून फेके अशा प्रकारे त्याचा अगदी फुटबॉल केला एक दिवस साधू तिथु जात असता त्याची नजर सापावर पडते साप गलीत गात्र होवून  पडलेला असतो साधू विचारतो कायरे बाबा तुझी अवस्था ? साप म्हणतो तुमची आज्ञेचे फळ भोगतोय मी आधी चावत होतो तेच बर होत,,,,,,,,,? तुमच ऐकल म्हणू हि अवस्था झाली ,,,,, साधू म्हणतो मी बरोबरच सांगितलं होत तू त्याचा गैर अर्थ लावलास मी काय करू ? साप,,,म्हणजे ? साधू ,,अरे मी चावू नको सांगित...

ससा आणि कासव

अर्थात सुखी आणि शांततामय सहजीवनासाठी ससा आणि कासव पार्ट २ ससा आणि कासवाची गोष्ट तर आपण सर्वांना माहितच आहे . ससा आणि कासव मध्ये शर्यत लागते आणि ससा वनात गाजर, गवत आणि पाणी पिवून झोपतो आणि कासव मंद गतीने येते आणि पुढे निघून जाते . आणि शर्यत जिंकते ......... यातून बोध ईतकाच कि आपल ध्येय गाठताना टंगळ मंगळ करून चालत नाही संथ का होईना पण ध्येयाच्या दिशेने चालत राहा यश तुमचेच विजय तुमचाच. पण,,,,,,, १- खरतर येथे गोष्ट संपली पाहिजे कारण तात्पर्य तर समजल तरी दुर्दैवाने तसे होत नाही . या दोघांचे काही मित्र तर काही शत्रूही असतात . ते सशाला बाजूला घेतात आणि त्याचे कान भरतात आणि कुठेतरी सशालाही ते सलत असत कि साला कासव मला हरवतो? आणि त्या दोघांचे शत्रू नेमके त्याच्या या मनस्थितीचा फायदा घेतात. झाल ससा परत कासवा कडे येतो आणि परत त्याला शर्यत लावायचा आग्रह करतो. आणि यावेळी तो पूर्ण सावध राहतो , गृहपाठ पक्का करतो ठरवल्याप्रमाणे तो रानात कुठेही आराम करत नाही काहीही खात पीत नाही आणि शर्यत जिंकतो. येथेही बोध ईतकाच कि आपल ध्येय गाठताना टंगळ मंगळ करून चालत नाही तर कठोर परिश्रमाला पर्याय...