Skip to main content

Posts

बाप- नियम

बापाच महत्व वाढवताना येथे मला आईच महत्व कमी नाही   करायचं  पण,,,, कायम उपेक्षित ,दुर्लक्षित ,रागाच,वाईट पणाचा धनी , होणार्या   बापाच महत्व हि कमी नाही हे सांगायचा  अल्पसा प्रयत्न,,,, आई प्रत्येक बाबतीत रडून मोकळी होते  पण बापाने ,,,नाही,, नियमच असतो तो ,,, ज्योती पेक्षा समईने च तापायच असत ,,नियमच,,, जेवण करणारी आई लक्षात   राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणाऱ्या बापाला  विसरतो आपण ,,नियमच,,, स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही ,,नियमच,,,, बहिणींसाठी भावांसाठी आधार व्हायचा असत ,,नियमच,,, देवकी यशोदेच कौतुक करतो सहज पण ,,, कंसाच्या कराल दाढेतून वाचवणारा बापच असतो,,नियमच,,, कौसल्येचा राम असेल हि पण,,, पुत्र वियोगाने जातो दशरथ च ,,,नियमच,,,, मुलाबाळांना चांगल चुंगल देताना जो फाटका राहतो  तो बापच,,, नियमच,,, आमच्या नशिबाची भोक कायम त्याच्या  बनियानवर ,,,नियमच,,, आम्ही १०\१५० सहज खरचतो सलून   मध्ये, तो मात्र अंगाचा साबण दाढीला लावतो,,,नियमच,,, आमच्या आजारपणात धावणारा बाप  स्वतःमात्र ताप अंगावर काढतो,,,नियमच  ,,, आजाराला ना...

प्रश्‍नांची उत्तरं ???????????????????

जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू. २ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत ? ३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील ? ४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का ? हं! काहितरीच काय विचारताय ? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला ? पण , असं वाटलं नसलं तरी , या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच , नाही का ? टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो. पदकं आणि चषक धूळ खात पडतात. जेत्यांचाही लवकरच विसर पडतो. आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू - १ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं. २ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील ? ३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत , असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद- दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला ?   ४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं. क्षणभर विचार करा. आयुष्य अगदी छोटं आहे....

एक गोष्ट सिएटलच्या ऑलिम्पिकची.

ही एक गोष्ट आहे काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले  नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात  जय्यत तयार उभे होते.  ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती. पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली.  साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण , प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं. धावता धावता एकाचा तोल गेला. काही कोलांट्या खाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... डाउन्स सिन्ड्रोम ' ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं , " आता बरं वाटतंय ?'' मग सार्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले. ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले.  उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता......... त्यावेळी त...

दमलेल्या बाबाची कहाणी ,,,

आज आपल्याला अमिताभ किंवा सन्नी देओल ,सचिन का आवडतात ? तर एका शब्दात सांगायच तर आपल्याया जे करू वाटत ते ते करून दाखवतात ,  अशक्य ते शक्य करून दाखवतात ,,,, मग डॉ.सलिल कुलकर्णी,आणि संदीप खरे का आवडतात ? त्यासाठी त्यांच गाण ऐकल पाहिजे , त्यांच संगीत ऐकल पाहिजे, त्यांच्या तालावर नाचणारे शब्द पाहिले(अनुभव) पाहिजेत, आणि मग लक्षात येत अरे मलाही हेच म्हणायच होत की ,,,, आणि त्यात ही दमलेला बाबा ऐकला की आपलाच आपण जोपासलेला अहमपना गलुन पडतो ,,, आणि लक्षात येत अरे मी ही आज बाबा आहे खरा पण,,, मी कुठे प्रयत्न केला माझ्या बाबांना शोधायचा ? मी कुठे प्रयत्न केला त्याना समजुन घेण्याचा? मी कुठे प्रयत्न केला त्यांच्यातल्या वास्सल्याला समजुन घेण्याचा ? मी कुठे त्यांच्या कड़क आवरनाखाली त्यांची माया शोधली? एखायाला जसे काही अघटित घडल की त्याला आईच दूध आठवत  अगदी तसाच ,,, दमलेला बाबा ऐकला की आपला बाप आठवतो,,,,,,,,,,,,, आणि नकळत आपल्या ही पापण्या ओलावातात जुन्या आणि नव्या बाबाच्या ही,,, ही त्याचीच कहाणी,  कोमेजुन  निजलेली एक परी रानी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी ...

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

हे लग्न झालेल्यांनी , न झालेल्यांनी   आणि लग्न होणार असलेल्यांनी ...... नक्कीच वाचा : विचार करा . एका रात्री तो  घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच . जेवताना त्याने  तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला , " मला तुझ्याशी काही बोलायचं आहे ." तिच्या डोळ्यांत वेदना उमटली ;  तरीही ती शांतपणे जेवत होती ,    सगळे शब्द जुळवून त्याने तीला   सांगितलं ,  मला घटस्पोट हवाय ." तिने शांतपणे विचारल ,- " का ?" तिचा प्रश्न त्याने टाळला , ती भडकली .  समोरच ताट तिने भिरकावून दिलं .  लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे , हे तिला जाणून घ्यायचं   होत ;    पण माझं मन दुसऱ्या   स्त्रीवर आलय हे तो तिला   स्पष्टपणे सांगू   शकत नव्ह्तो . माझा बँक ब्यालन्स , कार , घर , सगळ मी तिला देऊ केलं :    पण त्याने समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले . दुसऱ्या दिवसी तिने त्याच्या समोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला . तिला ...

"ना- ताळ"

एकमेकांशी ज्यांचा नसतो "ताळ" ते साजरा करतात "ना- ताळ" आणि काही का असेना हे आमच नाही ही सभ्यता ? आमची नाही सरत्या वर्षाला निरोप  तोही मद्य धुंद अवस्थेत आम्ही देत नाही आम्ही उगवत्या सुर्याचे उपासक आहोत हेच विसरत आहोत ? देव दास मधील चुनी बाबु म्हणतो ,, "द" से दर्द ,दोस्ती, तसेच आजचे शिकले सवरलेले,, कॉलेज बाबु "ड" से डिसेंबर  तो ही 31first चा म्हणु लागलेत आणि दिमतीला आहेतच टिव्ही च्यानेल्स  ,, ह्या असल्या निरोप समारंभातुन काय सध्या होते? हे विचारायचे नाही,, आणि विचारलेच तर ,,? काय नाय यार जस्ट enjoyyyyyyyy काय नाय यार फ़क्त मजा करायची असा हा आता "मजा" करण्याचा भाग जरी हलका फुलका वाटला तरी उद्या तो डोइ जड़ ठरणार आहें हेच विसरतो आहोत  तात्पर्य- "चैत्र पाडव्याला महत्त्व देण्या ऐवजी ,, आम्ही ३१ डिसे. ची वाट पाहणार असू तर ,, तो आमच्याच "वैचारिक दीवाळ खोरिचा भाग मानावा लागेल "

"माझ्या डोळ्यांची काळजी घे."

ती जन्मताच आंधळी, त्यामुळे सगळ्यांच्याच तिरस्कारास पात्र.आई-वडील, सख्खे भाऊ, बहिणींही एक डोक्यावरचंन टाळता येणार ओझं म्हणून सहन करणारे.ह्यात एकच समाधानाची बाब म्हणजे तिचा प्रियकर.तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, तिच्या अंधपणाचा कोणताही बाऊ न करता.मग तिला वाटायचे आपण खुप नशिबवान आहोत.तिने कित्येक वेळेस त्याला म्हंटले सुद्धा, "जर मला दृष्टी लाभली असती तर तुझ्याशीच लग्न करून, शेवट पर्यंत साथ दिली असती."आणी अचानक एके दिवशी चमत्कार झाला.कोणीतरी तिला आपले डोळे देण्यास तयार झाला.शेवटी यशस्वी शस्त्रक्रिये नंतर दिला दिसू लागले.सर्व प्रथम तिने प्रियकराला पाहण्याचा हट्ट धरला.त्याला पाहताच तिला जबरदस्त धक्का बसला.तो चक्क आंधळा होता.तेवढ्यात त्याने विचारले, "करशील आता माझ्याशी लग्न?"तिने सहजतेने त्याचा प्रस्ताव नाकारला.त्याने कांहीही प्रतिक्रीया व्यक्त केली नाही.तिच्यापासुन दुर जाताना फक्त एवढेच म्हणाला, "माझ्या डोळ्यांची काळजी घे."आणि,,,,, ती उघड्या डोळ्यांनी पहातच राहिली. तात्पर्य  ....... डोळे आल्यावर स्वार्थ जागा जाला निरपेक्ष प्रेम हरल.    

धंदा

परवा सकाळी एका दुकानात गेलो माझ्या मित्राच आहे ते  आणि दोन बाप बेट्याँचा संवाद  कानी पडला ,,, मगन शेटने गल्ल्यावर बसता बसता पोराला विचारले  "तो आयपीएल चा काय जाला रे  ,,,,? बापू ..ते सचिन चा सेंच्युरी नाय जाला अजुन पण ते करेल , कुम्बले बी चांगली बोलिंग करते , मगन शेट,,साला इतका वरस जाला  पण तुला  धंदयाची वात जमते नाय... मगन शेट थोड चिडून च बोलले , पण बापू तुमीच विचारले ना आयपीएल चा काय ते ? अरे साला गांडा मी तुला विचारले आयपीएल चा काय  म्हणजे ते ललित मोदिचा काय जाला ? इतका करोडोचा धंदा त्याने जमवला ते कसा?  ते रायला बाजूला अन साला  तु ते टीवी ला चिटकुन बसते , आणि टाईमपास करते .. साला तुला कसा सुचला नाय ते क्रिकेटचा धंदा करायला ? ते ललित मोदी बग कसला भेजा हाय तेचा , तेनी क्रिकेटचा नुसता धंदाच नाय केला , तर प्लयेअर ला बाजारात बसवाला तेचा बी मार्केट केला , पोलीटेशीयानला ते बाजारात आणला , सिनेमा वाल्यांचा पैसा लावला , आण तु स्साला नुसता टाएम वेस्ट केला ,,,,? ते साला सचिन सचिन करते ते काय तुला पैसा देणार हाय काय? हातचा ध...

हरीण आणि कोल्हा

काल सकाळीच बातमी वाचली आमदारांना घसघशीत पगार वाढ ,,,,,,,, आणि त्या आधी ३ रु. ने पेट्रोल महाग झाल्याची बातमी आली होती मग अचानक वाघ,उंदीर,मुंगुस,हरीण आणि कोल्हा यांची गोष्टआठवली . या सार्यांची बर्या पैकी मैत्री होती. एक दिवस मात्र कोल्हा अचानक वाघाकडे जावून त्याला म्हणाला , "हे हरीण कित्ती सुंदर आहे ना?" याच मांस खायला मिळाल तर कित्ती बर ना? तास बरेच दिवस वाघाच्या हि मनात होताच पण जनक्षोभाला घाबरून तो गप्प होता आणि आता हि कोल्हा तस म्हणाल्यावर त्याने लगेच प्रतिक्रिया नाही दिली . पण कोल्हा बदमाश त्याने परत सांगितलं तसा वाघ म्हणाला , मी त्याला मरेन रे पण लोक काय म्हणतील? मित्राला मारलं...... त्यापेक्षा मी सांगतो तस कर,, तू उंदराकडे जा,.आणि त्याला हरिणाची खुर कुरतडायला संग, हरीण लंगड झाल कि मी मारतो आणि कुणी काही बोलला तर सांगू बिचार लंगड झाल होत त्याचे पुढे हाल होवू नयेत म्हणून मी त्याला मारलं,,,,, झाल प्ल्यान ठरला आणि उंदराने हरिणाचे पाय कुरतडले . आणि वाघाने त्याला मारलं.... आता त्या हरणाला खायला सारेच आतुर झाले ,पण..... कोल्हा म्हणाला तुम्ही सारे नदीवरू...

असच असत का प्रेम...?

||प्रेमाय तस्मै नमः|| एका डॉ.कड़े ८०\८५ वर्षाचे गृहस्थ आपल्या जख्मेचे   टाके काढून घ्यायला गेले . सकाळी ८.३० चा सुमार..  ते डॉ, ना म्हणाले, थोड़े लवकर होइल का काम? मला ९ वाजता जायचे आहें एकी कड़े माझी बायको दुसर्या हॉस्पिटल मध्ये एडमिट आहें. तिच्या बरोबर नाश्ता करायचा आहें. डॉ,,खुप आजारी आहेत का त्या? हो गेली पाच वर्षे ती हॉस्पिटल मधेच आहें, तिला "अल्झायमर्स"झालाय.. ती ओळख़त ही नाही आता कुणाला डॉ,,अहो ती ओळख़त ही नाही ना? तरी तिच्या बरोबर नाश्ता करायला रोज वेळेवर जाता ? त्यावर ते गृहस्थ म्हणाले.... "डॉ. ती मला ओळख़त नसली तरी,,  मी तिला ओळखतो ना?  गेली कित्येक वर्षे बायको आहें माझी ती .. आज माझी तिला गरज आहें आणि  मी पाठ दाखवावी का? अहो जिवापाड प्रेम आहें तिच्यावर ..."  ऐकता ऐकता डॉ.च्या अंगावर रोमांच उभे राहिले . गला दाटून आला त्यांच्या मनात आल ...   तात्पर्य -   हेच खर प्रेम ... प्रेम म्हणजे फक्त घेन देन नह्वे.. तर नीरपेक्ष पणे स्वतः कडचा आनंद  लुटवून, उधळवून घेणे.... त्या गृहस्था  सारख.   सकाळ...

लेकास निरोप

जागतिक पुस्तक दिनानिर्मित्ताने.... शेक्सपीयरचा जन्मदिन   –   २२ एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन म्हणून मानला जातो. त्या निर्मित्ताने, तळेगावच्या इंग्रजीच्या प्राध्यापक अपर्णा महाजन यांनी शेक्सपीयरच्या एका उता-याचा अनुवाद सादर केला आहे. तो आहे   ‘ लेकास निरोप ’   या स्वरुपाचा त्याचे महत्त्व आजच्या काळात प्रत्येक आईला व तिच्या लेकाला वा लेकांना स्वाभाविकपणेच कळून येईल.. लेकास निरोप अरे, लिऍंटर्स, अजून इथेच तू? आवर, आवर, प्रवासाची वेळ झालीय... बोटीत बसायची वेळ झालीय... बघ, तुझ्या बोटींच्या शिडांवर... वारं आरूढ झालंय... तू निघालायस, ...आशीर्वाद आहेतच माझे... पण थांब... बाहेर देशी जातोयस... वागण्याच्या काही रीतीभाती सांगतो तुला... स्मृतीमध्ये कोरून ठेव त्या तुझ्या... ऐक... तुझ्या विचारांना शब्दरूप देण्याच्या फंदात कधीसुध्दा पडू नकोस... आणि अस्थिर, वेडयावाकडया विचारांना कृतीत कधीच आणू नकोस... सगळयांशी समरसून वाग... पण वागताना, हीनतेकडे झुकू नकोस... तुला नवनवे मित्र मिळतील... त्यांची मैत्री पारखून घे... अशा मित्रत्वाला बांधून ठेव पोलादी कणखर साखळी... सारख्या ...

नटरंग ....

अतुलजी,सप्रेम नमस्कार, आपला नटरंग पहिला,,, आणि "पिंजरा नंतर अंगावर आलेला सिनेमा म्हणजे नटरंग " अस एका वाक्यात बोलू शकतो पण मग तुम्ही साकारलेल्या नटरंगावर, नटेश्वरावर, गणा पैल्वानावर, गणा कागलकरावर, फालक्यावर, आणि ,, ब्रुहन्नडावर, किशोर कदमच्या म्यानेजरवर, गुरु ठाकुर वर, गणाच्या सर्व सवंगडयानवर,  आणि ,, अप्सरा आली वर अन्याय केल्या सारखे होइल  ज्यांच्या शिवाय फडच उभा राहू शकत नव्हता. आणि सिनेमातला गणाचा होणारा बदल  "गणा पैलवान  आक्षी ५\१० मिनिटात गणा कागलकर" यावर बोलाव तितक कमी या  पाच मिनिटाच्या बदलासाठी तुम्ही काय दीव्य केल ते तुम्हालाच माहित. अफलातुन,,,,, आक्खा सिनेमा एका बाजूला आणि  तुम्ही एका बाजूला. वाह क्या बात है असेच गुणवान आणि  अतुलनीय कामगिरी बजावनारे त्यासाठी मनात घेणारे कलाकार  जर मह्राठी चित्रपट स्रुष्टिला लाभणार असतील  आणि मनात गणा कागलकर ची  जिद्द असेल तर ,, राजकार्न्यानी कलावंतांची इजार उतरवली तरी,,, मराठीचा झेंडा फडकतच  राहिल यात तीळमात्र ही शंका नाही. अभिन्दन पुन्हा त्रिवार अभिनन्दन...

सुतलीने बांधला हत्ती,,,,

काही दिवस आगोदर एक गोष्ट वाचली होती ती अशी,, आणि मला माझ्या प्रश्नच उत्तर  मिळाल सुतलीने बांधला हत्ती,,,, एका आश्रमा समोर एक हत्ती फिरत असे , तिथे येजा करनार्याना तो रोज त्रास देइ, त्याच्या या त्रासला कंटालुन एक दिवस सारे शिष्य जमा झाले आणि त्यांच्या रुषी कड़े त्याची तक्रार करून म्हणाले  महाराज या हत्तीचा काही तरी बंदोबस्त करा  महाराज आम्ही कंटाळलो. गुरु महाराज या हत्तीला इथुन हाकलून देणे उचित ठरेल. गुरुनी एक क्षण विचार केला आणि  शिष्यांना म्हणाले सारे जन मिळून त्याचा पाय साखळ दंडाने बांधून ठेवा . त्याप्रमाणे  सार्यांनी प्रयत्न करून त्या हत्तीला एका   वृक्षाला   बांधून ठेवले. हत्तीने काही दिवस पाय सोडवन्याचा अटोकाट प्रयत्न केला . पण  हळूहळू तो शांत झाला . २\३ महिन्यानी गुरुदेव म्हणाले आता त्या हत्तीला आता एका  दोरखंडाने बांधा,, शिष्य ,म्हणाले गुरुदेव साध्या  दोरखंडाने ? अहो तो राहिल का त्यात ? मी सांगतो तस करा  विश्वास ठेवा , पुन्हा २\३ महिन्यानी गुरुदेव आले व म्हणाले आता ,, तो दोर ही काढा आता साधी...

मुक्ता ,,,,,

मुक्ता मी तुझ कब्बड्डी कब्बड्डी पाहिलं आणि काय सांगू त्या नाटकाची मला वाटत माझ्या ईतकी जाहिरात कुणी केली नसेल (हे माझ मत आहे) मी स्वतः कब्बडी आणि कराटेशी संबंधित असा खेळाडू आहे आणि ते नाटक तू नाही केलं प्रत्यक्षात मला मी करतोय असा भास होत होता . माझी देखील अशीच काहीशी कथा आहे मला मुलगा म्हणून हे सार ईतक जड गेल प्रत्यक्षात ते मुलींना किती जड जात असेल कल्पना न केलेली बरी अरे हे सार सागताना तुझ्या अभिनयाला दाद ,,,,,बापरे काय जगलीस ते तू नाटक आणि आता जोगवा,,,,मला यांचा देखील चांगला अनुभव आहे तू  काय आणि ईतर सारे काय तुम्हाला कस काय जमत बुवा ? या सगळ्याला खूप चांगला म्हणन कमी पडेल ईतका तो चित्रपट सुंदर होता आणि आता मुंबई पुणे मुंबई अरे यार,,,,, व्यसन लागलाय मला तुझ्या चित्रपटांच आणि हे व्यसन तुझी अग्निशिखा सिरीयल पासून आहे बरका ,,,