Skip to main content

दमलेल्या बाबाची कहाणी ,,,

आज आपल्याला अमिताभ किंवा सन्नी देओल ,सचिन का आवडतात ?
तर एका शब्दात सांगायच तर आपल्याया जे करू वाटत ते ते करून दाखवतात ,
 अशक्य ते शक्य करून दाखवतात ,,,,
मग डॉ.सलिल कुलकर्णी,आणि संदीप खरे का आवडतात ?
त्यासाठी त्यांच गाण ऐकल पाहिजे ,
त्यांच संगीत ऐकल पाहिजे,
त्यांच्या तालावर नाचणारे शब्द पाहिले(अनुभव) पाहिजेत,
आणि मग लक्षात येत अरे मलाही हेच म्हणायच होत की ,,,,
आणि त्यात ही दमलेला बाबा ऐकला की आपलाच आपण जोपासलेला
अहमपना गलुन पडतो ,,,
आणि लक्षात येत अरे मी ही आज बाबा आहे खरा पण,,,
मी कुठे प्रयत्न केला माझ्या बाबांना शोधायचा ?
मी कुठे प्रयत्न केला त्याना समजुन घेण्याचा?
मी कुठे प्रयत्न केला त्यांच्यातल्या वास्सल्याला समजुन घेण्याचा ?
मी कुठे त्यांच्या कड़क आवरनाखाली त्यांची माया शोधली?
एखायाला जसे काही अघटित घडल की त्याला आईच दूध आठवत 
अगदी तसाच ,,,
दमलेला बाबा ऐकला की आपला बाप आठवतो,,,,,,,,,,,,,
आणि नकळत आपल्या ही पापण्या ओलावातात
जुन्या आणि नव्या बाबाच्या ही,,,
ही त्याचीच कहाणी, 
कोमेजुन  निजलेली एक परी रानी
उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी 
रोजचेच आहे सारे आज काही नाही 
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही 
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत 
निजतच तरी पण येशील पण झोपेत खुशीत 
सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला 
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ,,,,  
  आटपाट नगरात गर्दी होती भारी..2
घामाघुम राजा करी लोकलची वारी,...2
रोज सकालीच राजा निघताना बोले ,
गोष्ट सांगायची काल रहुनिया गेले,
जमलेच नाही काल येणे मला जरी ,
आज परी येणार मी वेळेवर घरी 
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी,
खर्या खुर्या परी साठी गोष्टितिल परी 
बांधीन मी मग थकलेल्या हाताचा झुला 
दमलेल्या बाबांची कहाणी ही तुला ,,,,
ऑफिसात उशिरा मी असतो बसून ,...2
भंडावले डोके गेले कामात बुडून,,,,2
तास तास जातो खाल मानेन निघून 
एक एक दिवा जातो हळूच विझून,....2
अशा वेळी सांगू काय काय वाटे?...2
आठव सोबत पाणी डोळ्यातून दाटे,...2
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे
तुझा साठी मी पुन्हा लहान गे व्हावे ...2
उगाचाच रुसावे आणि भंडावे तुझाशी...2
चिमुकले खेळ काही मांडावे तुझाशी
उधळत खिदळत बोलशील काही...2
बघताना भान मला उरणार नाही...2
हासुनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरी सुध्हा दोघेजण दंगा मांडू असा 
क्षणा क्षणा वर ठेवू ...2
खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला 
दमलेला बाबाची ही.......
दमल्या पायाने जेंव्हा येईल जांभई...2
मऊ मऊ दुध भात मग भरवेल आई.
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी 
सावारीच्या उशिहून मऊ माझी कुशी
कुशी माझी संगताहे ऐक बाळा काही 
सदोदित जरी कामी तुझ्यापास नाही 
जेवू खाऊ न्हाऊ माखु घालतो ना तुला...2
आई परी वेणी फणी करतो ना तुला...2
तुझ्यासाठी आई परी बाबा ही खुळा
तो ही कधी तरी गुपचुप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ...
बोळक्या मध्ये लुकलुकलेला पहिला तुझा दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात 
आई म्हणन्या आधी सुध्हा म्हनली होतीस बाबा...२
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तु ताबा ...२
लुटू लुटू उभ राहत टाकलास पाउल पहिल....२
दुरच पाहत राहिलो जवळच फक्त जवळ पहायच  राहिल
असा गेलो आहे बाळा पूरा अडकून...2
हल्ली तुला पाहतो झोपेतच  दुरून...२
असा कसा बाबा देव लेकराला देतो 
लवकर जातो अन उशिराने येतो 
बालपण गेले तुझे तुझे निसटुन 
उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून ?
जरी येथे ओठी तुझ्या माझ्या साठी हसे 
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे    
असे म्हणत हे गाणे दमलेल्या बाबाची कहाणी लेकीला सांगते ,
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग?
सासरी जाता जाता उंबरठया मध्ये
बाबां साठी येईल का ग पाणी?
 सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला 
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला ,,,,
ही कहाणी ऐकून मला तर माझा बाबा मिळाला आणि ,,,,
तुम्हीही बघा प्रयत्न करा नक्की सापडेल प्रत्येकाचा बाबा 
 





Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...