Skip to main content

Posts

तमसो मा ज्योतिर्गमय...लाइम लाइट .

तमसो मा ज्योतिर्गमय... दिवाळी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी अंधारावर मात करणारी रात्रीच्या अंधारातच प्रकाश दडलेला असतो तुम्ही तो शोधायचा असतो हे सांगणारी दिवाळी ... प्रत्येकाला दिवाळीच अप्रुप असतच मग तो गरीब असो वा श्रीमंत .. कुणाची फटाक्यांची तर कुणाची फराळाची, नवीन कपड्यांची आणि आताशा नविन मोबाइलची पण धुंधी ही असतेच दिवाळीची , मग कुणी दिवाळीच्या शुभेच्छा पठवत कुणी मेल करत कुणी मीठाई पाठवत अनेक प्रकारे दिवाळी साजरी होते, पण,,, आनंदात सगळे भेद भाव विसरून सहभागी व्हायचे असते तेव्हाच दिवाळी साजरी होते , असा म्हणतात , सण आणि ऊसव हे जिथे साजरे होतात, तो समाज जीवंत आहें असे समजले जाते पण आजच्या या यांत्रिक युगात आम्ही खरच जिवंत आहोत ?,, जगातिकी करनाच्या जमान्यात आम्ही आगतिक झालोय अस नाही वाटत? परस्पर सीमारेषा धूसर होत आहेत आपली मानस दुरावतायतात ,परस्पर संवाद कमी होत आहेत दिवाळी हा एक आनंदोत्स्व आहें तो कोरड्या मनाने कोरड्या शुभेच्छांनी नाही साजरा होत . दोन वा अनेक जणानी, मनानी, भावनाना जोडणारे दुवे नाती याच खर्या शुभेच्छा असतात. त्यांच्या गैर हजेरित हा सण साजरा ...

भारतीय हेरगिरीच्या ईतिहासातील सर्वात मोठी घोडचूक

अति सज्जनपणा घेतो पडून पायावर धोंडा ,, एक जुन्या अमृत नामक पुस्तकात संडे वरून छापलेली गोष्ट वाचण्यात आली १९७८ मध्ये पाकिस्तानातील एका व्यक्तीने , "रॉ" कडे संधान साधून "काहूटा"येथील "अणुभट्टीचे" सर्व नकाशे देण्याची तयारी दाखवली होती, आणि त्यासाठी त्या व्यक्तीला फक्त दहा हजार डॉलर हवे होते चालून आलेल्या संधीला मान्यता मिळवण्यासाठी "रॉ"चे प्रमुख पंतप्रधान मोरारजी देसाईंकडे गेले अर्थातच गांधी विचारांचं पाणी प्यायलेले  आमचे पंतप्रधानांनी त्याला नकार दिला (साला कौतुक कराव तितक कमीच नाही का?) परंतु ईतक्यावरच आपला मुर्खपणा थांबवतील ती भारतीय गांधी वंशावळ कसली? तर या महाशयांनी , पाकिस्तानी राजप्रतिनिधींना बोलवून सांगितले, "तुमची सुरक्षा व्यवस्था ईतकी ढिसाळ आहे कि मी मनात आणल असत तर तुमच्या "काहूटा अणुभट्टीचे" गुप्त कागदपत्र मिळवू शकलो असतो," पण आम्ही असा पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न करणार नाही, अर्थातच त्यानंतर पाकिस्तानने संबंधित कागद पत्रे ज्यांना पहावयास मिळत होती त्यांच्यावर नजर ठेवून शोधून काढण् अवघड नव्हत, त्या कागद पत्र पुरव...

मी खीर खाल्ली तर,,,,

मी खीर खाल्ली तर,,,, परवाच टीव्हीवर एफडीआय चा तमाशा पाहत होतो आणि एफडीआयच्या विरोधात बोलणारे कोंग्रेसची भलामण करत होते ते पाहत होतो आणि मला त्याचा खरा अर्थ कळला "एफडीआय" म्हणजे काय? "फिक्स डीपोझीट इन ईटाली"आणि म्याडमला नाखुश करणे आजच्या घडीला कुणालाही झेपणारे नाही,,, त्यासाठीचा हा उंदराला मांजर साक्क्षचा खेळ,, आणि आठवला मला असाच एक खेळ, उंदीर मांजर आणि माकड आपल्यातल्या सदविवेक बुद्धीला साक्षीला ठेवून खेळलेला तो खेळ ,, "मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी",,, किती साधा सोप्पा न्याय होता आठवा जरा, एकदा माकड,मांजर,उंदीर एकत्र येतात आणि खीर बनवून खायचा बेत आखतात, उंदीर,रवा आणि साखर आणतो, माकड,पातेल आणतो, मांजर,दुध आणत, आणि सारे मिळून नदीच्या तीरी खीर बनवतात. त्याच्या गोड गोड वासाने सारेच खुश होतात आता खीर कधी खातो असे त्यांना होते, पण थोडा धीर धरू आंघोळ करून घेवू तोपर्यंत खरी थंड होईल ह्या विचाराने माकड आणि उंदीर आंघोळीला जातात आणि जाताना आम्ही येई पर्यंत खीर खावू नको अस मांजराला बजावायला ते विसरत नाहीत, परंतु मनात काळ असलेली मांजर वरकरणी हो बोलते , खरतर खीर कधी...

जग चाललय तर ते फक्त माझ्यामुळे ,,,,

एकदा भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यात वाद सुरु असतो लक्ष्मी मातेचं म्हणणं असं असतं, कि  " जग चाललय तर ते फक्त माझ्यामुळे (पैशामुळे) .........  ज्या माणसाकडे पैसा नाही, संपत्ती नाही....... त्याला काही किंमत नाही.  माणूस ओळखतो........ जाणतो....... आणि बोलतो ते फक्त पैशानेच. " यावर विष्णू भगवान हसून म्हणतात कि " असं काही नाहीये. " पण लक्ष्मी माता येन केन प्रकारे पटवून देण्याचा प्रयत्न करत असते कि पैशालाच जास्त महत्व आहे. तरीही विष्णू भगवान मान्य करत नाहीत म्हणून लक्ष्मी माता म्हणते,  " ठीक आहे. मी सिद्ध करून दाखवते. मग तरी मान्य कराल?  " विष्णू भगवान हसून म्हणतात, " हो चालेल." त्यावर लक्ष्मी माता पृथ्वी वरील एक दृश्य दाखवते. -  एक शोकमग्न अंत्ययात्रा चालली असते... लक्ष्मी माता आकाशातून धनाचा वर्षाव सुरु करते....  आणि लगेच अंत्ययात्रेतील सगळे लोक आपण कुठे जातोय हे विसरून पैसे गोळा करू लागतात. लक्ष्मी माता भगवान विष्णूंकडे पाहत म्हणते,  " पाहिलंत? पैश्या समोर माणूस आपण कोणाला तरी कायमचे गमावून बसलोय हे दुखः देखील विसरतो....

कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट?????????????

काल एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज  !   आणि ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत , तर ती ही खाउनच टाकतात .  शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे .   संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही , कुणालाच तेवढी उसंत नसते . स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक महाराज  स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास " उपभोग " ता येतो मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा " रोड " आता " आर्थर रोड "  पाशी येऊन थांबलाय तिथं देशद्रोह्याना मिळणार् ‍ या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या देशप्रेमी , कायदापालक सज्जनांनाही वाटू लागलाय .   तुम्ही लिहिलंत गीतारहस्य गीतेतली बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागली आहेत कौरवपांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत , तर युती करुन सत्ता भोगतात " आप्तस्वकीय...

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

क्रांतिकारक अनंत लक्ष्मन कान्हेरे

क्रांतिकारक अनंत लक्ष्मन कान्हेरे यांनी ज्याकसन चा वध केला. सुरवातीचे शिक्षण इंदूर नंतर संभाजीनगर येथे झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नाशिक येथे स्थापन केलेल्या अभिनव भारत या क्रांतीकारकाच्या संघटनेचे ते सदस्य झाले. त्यांच्या बरोबर त्याकाळात अण्णा कर्वे तसेच विनायक देशपांडे जे त्याकाळी नाशिक पंचवटीत शिक्षक होतेव पुढे त्यांच्या बरोबर जाक्सन खटल्यात आरोपी देखील होते. एका भारतीयाने एका इंग्रजाच्या गोल्फ च्या बॉल ला हाथ लावला म्हणून त्याला मरेस्तोवर मारण्यात आले,,,, दुसऱ्या एका घटनेत एक युवक कालिका मंदिरा कडून येणाऱ्या रस्त्यात " वंदे मातरम " चा मंत्रघोष करीत होता. म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला लादण्यात आला,,, त्याचे वकील पत्र घेणाऱ्या बाबासाहेब खरे यांच्या घरावर त्यांनी वकील पत्र घेतल्यामुळे जप्ती आणली,,, तर त्यांना वकिली करण्यापासून आजन्म बंदी घातली,,, बाबाराव सावरकरांनी १६ पानी कवितेचे पुस्तक "कवी गोविंद" प्रकाशित केले म्हणून त्यांच्यावर खटला भरून त्यांना अटक केली,, ज्याक्सन ची नाशिक ची कारकीर्द हि अशी वा...

सचिन,क्रिकेट आणि बागी पानसिंग तोमर

का कुणास ठावूक पण पानसिंग तोमारचा सिनेमा आणि सचिनचे शतक दोन्ही एकदम आले, आणि पानसिंगच्या कार्तुत्वापुढे सचिन आणि क्रिकेट खुज वाटू लागल हे नक्की,, घरची प्रचंड गरिबी धावता येत हेच भांडवल प्राथमिक शिक्षण घेतलेल्या पानसिंग तोमरने मग "मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट"अस म्हणत लष्कराचा रस्ता धरला.वडील,आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत,भांवडांनाही कामाला जावं लागायचं. अशा परीस्थित हा लष्करात सामील झाला त्यातही मोठ्ह कारण त्याला खायला भरपूर लागत असे आणि खेळाडू म्हणू ते त्याला लष्करात मिळत होते,, पण दुर्दैव पहा त्याला डाकू म्हणून जितकी प्रसिद्धी त्याला मिळाली तितकी खेळाडू म्हणून नाही मिळाली  आणि सिनेमात तसा एक डायलॉग देखील आहे ,एकेठिकाणी तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा देवून तो एक यशस्वी अपहरण करतो लगेच टीव्हीवर आणि रेडीओवर बातमी झळकते डाकू पानसिंग ने अस केल त्यावेळी पानसिंग उद्वेगाने म्हणतो, "देशासाठी सुवर्ण पदक जिंकत होतो त्यावेळी काल कुत्र विचारात नव्हत आणि तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा काय दिला सगळीकडे नाव झाल,,,?" पायात घालायला नीट बूट नसताना पानसिंग तोमरने ...

सुभेदार "डाकू" पानसिंग तोमर ,,एक चपराक

आज सकाळीच "स्क्र्याच " नावाची गोष्ट वाचली त्यात एक नव्याने श्रीमंत झालेला माणूस आपली नवी कोरी गाडी घेवून रस्त्याने जात असतो स्वतःच्याच कौतुकास पात्र असा तो मेहनतीने हे सार मिळवलेल असत आणि त्या खुशीत तो चाललेला असतो आणि अचानक एक मोठ्ठी वीट त्याच्या गाडीवर येवून आदळते अर्थातच त्याला खूप राग येतो आणि स्व कष्टाच्या कमाईचा कुणी असा खेळ खंडोबा करत असेल तर कसे चालेल ? आणि रागात तो खाली उतरतो पाहतो तर , एक लहान मुलगा हातात दगड घेवून पुन्हा मारायला तयार ,,, हा माणूस त्याच्या कानाखाली मारणार तोच तो मुलगा विनवतो साहेब मारू नका मी मगच पासून बर्याच गाड्यांना थांबवायचा प्रयत्न करतोय माझा भाऊ अपंग आहे त्याला बराच लागल देखील आहे आता तो माझ्याच्याने तो उचलवला  जात नाही ,म्हणून खूप गाडीवाल्यांना मी विनंत्या केल्या कि मला मदत करा पण kunihi माझ ऐकल नाही नीजालास्त्व मग मला दगड उचलून तुमच्या गाडीवर मारावा लागला जेणे करून निदान त्या निमित्ताने खाली उतरला माझी अडचण ऐकल्यावर मदत कराल ,,,, गोष्टीतला तो अर्थातच त्याची मदत करतो वैगेरे वैगेरे,,,, पण खरच विचार करा आपण सारे असे कुणावर ...

प्रिय गुरूजी,

आजच्या आई वडिलांना शिवाजी महारज माहित नसतील त्यानी निदान हे लिंकन च पत्र वाचून दाखवाव आपल्या मुलांना गांधींपेक्षा लिंकनचा आदर्श केव्हाही चांगला ,,,,,,,,, त्यांच्या लक्षात येईल   आपल्या देशाला खरी गरज कुणाची आहे , अब्राहम लिंकन सारख्या बापाची की देशाला नपुंसक बनवनार्या तथाकथित महात्म्याची ? ,,,     सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात; नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा - जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात , तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहीत आहे; सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत… तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा , घाम गळून कमावलेला एकाच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेषमत्सरापासून दूर रहायला शिकवा शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नम...

गिरगाव व्हाया दादर

काही दिवसां पूर्वी आचार्य आत्रे रंगमदिरात गिरगाव व्हाया दादर नाटकाचा प्रयोग पाहिला होता ,  तसा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचलाच आहे, आणि न कळत्यावेळी अनुभव हि घेतला आहे . पण वेळ होता अन् योगायोगानेच या नाटकाचा  प्रयोग हि त्या मुळे हे शक्य झाल,  एका सत्य घटनेवर आधारीत आणि वास्तवाशी संबध आसलेल्या या नाटकाला तशी तुरळकच गर्दी होती,  आणि कोणताही धांगडधिंगा न करता शांततेत नाटक पाहत होती.. या नाटकाची संहिता तशी साधीच पण खुप काही सांगुन जाणारी काल परवाच हि घटना घडुन गेली की, काय ? आशी जाणीव करुन देणारी ..  अर्थात आज पन्नास वर्ष उलटली तरी जखम ही  आजुन ओलीच आहे फक्त थोडी खपली धरली आहे. १०५ हुत्म्याच्या बलिदाना नंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, आचार्य आत्रे, एस् एम जोशी काँ डांगे आणि अनेकाच्या नेतृत्वाने सतत पाच वर्ष मोरारजी देसाई आणि नेहरु सारख्या लोकांशी संघर्ष करुन मिळवली आहे हि मुंबई... महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल. ...