Skip to main content

तमसो मा ज्योतिर्गमय...लाइम लाइट .

तमसो मा ज्योतिर्गमय...
दिवाळी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी
अंधारावर मात करणारी
रात्रीच्या अंधारातच प्रकाश दडलेला असतो तुम्ही तो शोधायचा असतो हे सांगणारी दिवाळी ...
प्रत्येकाला दिवाळीच अप्रुप असतच मग तो गरीब असो वा श्रीमंत ..
कुणाची फटाक्यांची तर कुणाची फराळाची,
नवीन कपड्यांची आणि आताशा नविन मोबाइलची
पण धुंधी ही असतेच दिवाळीची ,
मग कुणी दिवाळीच्या शुभेच्छा पठवत
कुणी मेल करत
कुणी मीठाई पाठवत
अनेक प्रकारे दिवाळी साजरी होते,
पण,,,
आनंदात सगळे भेद भाव विसरून सहभागी
व्हायचे असते तेव्हाच दिवाळी साजरी होते ,
असा म्हणतात ,
सण आणि ऊसव हे जिथे साजरे होतात,
तो समाज जीवंत आहें असे समजले जाते
पण आजच्या या यांत्रिक युगात आम्ही खरच जिवंत आहोत ?,,
जगातिकी करनाच्या जमान्यात आम्ही आगतिक झालोय अस नाही वाटत?
परस्पर सीमारेषा धूसर होत आहेत
आपली मानस दुरावतायतात ,परस्पर संवाद कमी होत आहेत
दिवाळी हा एक आनंदोत्स्व आहें तो कोरड्या मनाने
कोरड्या शुभेच्छांनी नाही साजरा होत .
दोन वा अनेक जणानी, मनानी, भावनाना
जोडणारे दुवे नाती याच खर्या शुभेच्छा असतात.
त्यांच्या गैर हजेरित हा सण साजरा होऊ शकत नाही.
सकाळी पत्नीने,बहिणीने,आईने
हाका मारून ऊठवावे .
साखर झोपेतच उठवावे. आणि
सक्तीने अभ्यंग स्नान घालावे .
इतकी आपुलकी दिवाळीत असावी लागते.
ही आंघोळ साधी नसते .
तुमच्या आमच्या
नात्यावर साचलेला कडू मळ ही
आंघोळ काढत  असते
भावा बहिणीच्या  नात्याला घट्ट करत असते
नवरा बायको च्या नात्याला ,
आई मुलाच्या नात्याला ,
ही आंघोळ घट्ट करत असते
वसु बारस,नरक चतुर्थी ,लक्ष्मी पूजन आणि
भाऊबिज अर्थात यमद्वितीया साक्षात् यमाची बहिन
आपली असल्यावर आपल्याला
मृत्यचे भय ते काय  ?
असाच ती सांगत असते
या सार्या मागे
घरातल्यांचे आर्शीवाद भावना यांचे बळ असते.
यासाठी श्रीमंतिची पैशाची गरज नसते ,
पाच पन्नास रुपयाचे कापड नवे कापड खरेदी करूनही
दिवाळी एवढ्या जोरात साजरी होते की ,,
लाखो रुपये खर्च करून सुध्हा हा दिवाळीचा आनंद मिळत नाही
श्रीमंताना आनंद शोधावा लागतो ,कुठे आणि किती खर्च
करून कोणती खरेदी करावी यासाठी डोक चालवाव लागत.
आणि म्हनुनच,,
या सणाचा निर्भेळ आनंद लुटन्यासाठी
सार्यानी ,,
एक दिवा ,,
ऊसाहाचा  ,,
नाविन्याचा ,,
नात्याचा ,,
मैत्रीचा ,,
आपुलकीचा ,,
सामाजिक बंधिलकिचा,,
आणि
एकमेका वरील
विश्वासाचा दिवा लावला तर आपल्या खर्या
अर्थाने दिवाळी साजरी होइल यात शंका नाही.
कारण,,
हे सारे सण म्हणजे आपुलिकिचे कट्टे आहेत .
हे कट्टे मजबूत झाले की,,
जिव्हाळ्याच्या बेटात रूपांतर
सहज शक्य होइल.
इथे मला ,,
चार्ली चाप्लीनचा लाइम लाइट ..नावाचा
एक सुंदर सिनेमा आठवतो ,,
त्यात त्याने,
रंग भुमिवरून बाहेर फेकल्या गेलेल्या
त्याच्या झगमगाटा दूर फेकल्या गेलेल्या
नटाची भूमिका केली आहें
त्यातील एक प्रसंग ,,,
हा नट जरी बाहेर फेकला गेला असला
तरी तो रोज थियेटर वर यायचा आणि तिथल्या
लोकांच्या रोज शिव्या प्रसंगी मारही खायचा
हे सर्व पाहून त्याच्या वर माया असणारी
प्रेम करणारी
नटी एक दिवस त्याला म्हणते
अरे रोज इथे येवून तू मार खातोस
लोकांची बोलनी खातोस
या सर्वांचा राग येत नाही घृणा वाटत नाही
का येतोस का इथे ?त्यावर ,,
चार्ली म्हणतो ,,
येतोना मलाही राग येतो
घृणा वाटते अग
त्या रस्त्यावर सांडलेल्या
माझ्या रक्ता कड़े
पाहून देखिल मला घृणा वाटते
पण काय करू ?
माझ्या नसा नसात तेच आहेना ?
मी कसा त्याचा राग राग करू
मी कसा त्याच्या पासून पलु  ?
 ,,,,मला वाटत ,,
आपुलकीचे हे कट्टे असेच मजबूत झाले
तर आपल्याला सुध्हा आपल्यातील
असंख्य कुरबुरिंची घृणा येणार नाही राग येणार नाही
परस्परांवीशई आपुलकीचा दिवा असाच
निर्व्याज तेवत ठेवला तर ,,
रोजच दिवाळी..साजरी करता येइल.

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...