Skip to main content

Posts

ससा आणि कासव

अर्थात सुखी आणि शांततामय सहजीवनासाठी ससा आणि कासव पार्ट २ ससा आणि कासवाची गोष्ट तर आपण सर्वांना माहितच आहे . ससा आणि कासव मध्ये शर्यत लागते आणि ससा वनात गाजर, गवत आणि पाणी पिवून झोपतो आणि कासव मंद गतीने येते आणि पुढे निघून जाते . आणि शर्यत जिंकते ......... यातून बोध ईतकाच कि आपल ध्येय गाठताना टंगळ मंगळ करून चालत नाही संथ का होईना पण ध्येयाच्या दिशेने चालत राहा यश तुमचेच विजय तुमचाच. पण,,,,,,, १- खरतर येथे गोष्ट संपली पाहिजे कारण तात्पर्य तर समजल तरी दुर्दैवाने तसे होत नाही . या दोघांचे काही मित्र तर काही शत्रूही असतात . ते सशाला बाजूला घेतात आणि त्याचे कान भरतात आणि कुठेतरी सशालाही ते सलत असत कि साला कासव मला हरवतो? आणि त्या दोघांचे शत्रू नेमके त्याच्या या मनस्थितीचा फायदा घेतात. झाल ससा परत कासवा कडे येतो आणि परत त्याला शर्यत लावायचा आग्रह करतो. आणि यावेळी तो पूर्ण सावध राहतो , गृहपाठ पक्का करतो ठरवल्याप्रमाणे तो रानात कुठेही आराम करत नाही काहीही खात पीत नाही आणि शर्यत जिंकतो. येथेही बोध ईतकाच कि आपल ध्येय गाठताना टंगळ मंगळ करून चालत नाही तर कठोर परिश्रमाला पर्याय...

पतंगाच्या प्राक्तनाची कथा ,,,,काईट्स

एक प्रेमकथा बॉलीवूड मधील घराण्यांनी आता पर्यंत अनेक हिरोंना मोठ करण्यासाठी  भव्य दिव्य प्रेमकथा काढल्या ,,, पण काईट्स,,,,,,,,,,त्याहून खूप वेगळा असा सिनेमा आहे . असे नाही पण तरी सुद्धा हि आजची प्रेमकथा आहे , हे प्रेम देश, भाषा, धर्म,या सर्वांची सीमा ओलांडून  खर प्रेम दशांगुळे वर उरत हे अनुराग बसूने अत्यंत उत्तम रित्या सांगितलं आहे . लासवेगात साल्सा नृत्य शिकवून फावल्या वेळात  बेकायदा अमेरिकेत आलेल्या मुलीं सोबत (ग्रीन कार्ड साठी) लग्न लावायचा व्यवसाय करणाऱ्या "जे" (ह्रितिक   रोशन) या हरफान मौला वृत्तीच्या तरुणाची आणि ,,,,, आपल भल मोठ्ह कुटुंब  पोसण्यासाठी पैसे कमवण्याच्या उद्देशाने  मेक्सिको मधून बेकायदेशीर रीतीने अमेरिकेत येवून  टोनी( निकोलस ब्रावून) या कसिनो मालकाच्या मुलाशी लग्न करणाऱ्या  नताशा उर्फ लिंडा ( बार्बरा मोरी),,, यांची कथा ,,, हॉलीवूडला टक्कर देईल अस या बोलीवुडी प्रेमकथेत दम आहे  यात जे वर प्रेम करणारी जिना आहे (कंगना) टोनीचा बाप कबीर बेदी आहे  ,, तर अशा ह्या जे च्या प्रेमात कबीर बेदीची मुलगी पडते आणि जे हि तिची श्री...

मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत.

द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले... 'मेरीट-लिस्ट' बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मध्ये  येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुषार आहेत. अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला.. द्त्तो वामन पुढें म्हणाले.. पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत.. या वर सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला .........

आचार्य अत्रे..... विलक्षण हजरजबाबी व्यक्तीमत्व

स्व. राष्ट्रपती व्ही.व्ही.. गिरी यांना आठ मुले होती. त्याबद्दल अत्र्यांच्या ' मराठा ' वर्तमानपत्रात  बरीच गमतीदार चर्चा होत असायची. अत्र्यांनी गिरी ,सौ. गिरी आणि,,   त्यांच्या आठ मुलांचा फोटो प्रसिद्ध केला आणि त्याखाली हेडिंग दिले '' गिरी आणि त्यांची ' काम ' गिरी '' ..... कार.. अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती.  त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते  पायी पायी कामासाठी जात होते.  तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला  त्याने खवचटपणें विचारले ' काय बाबूराव आज पायी पायी,  काय कार विकली की काय?' अत्रे म्हणाले. 'अरे आज तुम्ही एकटेच?  वहिनी दिसत नाही बरोबर ? कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ? ..... '' एकटा पुरतो ना ?'' आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते. मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते. अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत. अत्रे ग्रामीण भागाच्या दौर् ‍ यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले, ' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पक...

माकड आणि बाप

सध्या मी एक जाहिरात पाहतोय पीयर्स साबणाची त्यात ती आई आपल्या मुलीला शिकवतेय आंघोळ घालताना बाबरचा मुलगा हुमायु,हुमायुचा मुलगा अकबर ,,,,,,,,,,? आणि अचानक मला टोपी विक्याची गोष्ट आठवली ,,,, एक टोपी विक्या असतो , त्याच्या टोप्या माकड पळवतात मग रागाने तो डोक्यावरची  टोपी खाली टाकतो आणि मग माकड हि टोप्या खाली टाकतात मग खुश होत त्या टोप्या उचलून घरी जातो वैगेरे वैगेरे ,,,,,आता त्यानंतरची गोष्ट ,,,,,, टोपी विक्या पार्ट २, कालांतराने त्या टोपी विक्याचा मुलगा मोठा होतो, आता टोपीचा व्यवसाय तो मुलगा करू लागतो बापाच्या मार्गदर्शनाखाली ,,,,,, तो रोज टोपी विकायला गावोगावी जात असे .कधी या गावी तर कधी त्या गावी बाप सांगेल तसा तो धंदा करत असे आणि एक दिवस  त्याला त्याच जंगलातून जावे लागणार  असते दुसर्या गावी टोपी विकायला ज्या जंगलात माकडांनी त्याच्या बापला त्रास दिलेला असतो,, हे समजल्यावर ईकडे बाप चिंतेत पडतो पण, सावरतो आणि सारा घटनाक्रम मुलाला सांगतो , आणि मग कस वागायचं ते हि सांगतो .त्याला बजावून सांगतो कि, बाबारे त्या जंगलातून जाताना सावध बरका!तिथे ती माकड आहेत ज्...

प्रामाणिक माणूस.

एकदा एका कारखान्याच्या अध्यक्षांनी आपल्या सर्व अधिकार्‍यांची वार्षिक बैठक बोलावली. अध्यक्षांनी बैठक संपवताना घोषणा केली कि थोड्या वेळाने सर्वांना एक मातीची कुंडी, एका पिशवीत माती व काही बियाणे देण्यात येतील. जो कुणी पुढच्या वर्षी वार्षिक बैठकीत सर्वात चांगले झाड दाखवेल त्याचा त्या बैठकीत सत्कार करण्यात येईल. सर्व अधिकार्‍यांनी घरी गेल्यावर ते बियाणे दिलेल्या मातीतच पेरले. वर्ष उलटले व परत वार्षिक बैठकीची वेळ आली. बैठकीचा हॉल विविध प्रकारांच्या सुंदर झाडानी भरुन गेला. काही झाडांना तर फुलेही आली होती. पण या सर्वात एक अधिकारी हिरमुसलेला पडल्या चेहर्‍याने दिलेली कुंडी व माती तशिच घेऊन एका कोपर्‍यात बसुन होता. सर्वांची झाडे बघितल्यावर अध्यक्षांनी मंचावर जावून माईक हाती घेतला व भाषण आटोपतांना त्या हिरमुसलेल्या अधिकार्‍याला बक्षिस जाहिर केलं. सर्व थक्क झाले. त्याने तर फक्त कुंडी व माती तशिच आणली होती. सत्कार झाल्यावर अध्यक्ष बोलले," तुम्हा सर्वात हा एकच प्रामाणिक माणूस आहे. तुम्हाला देण्यात आलेले बियाणे पाण्यात उकळण्यात आले होते. त्यामुळे त्यातुन झाडे लागणे अशक्य होते !...

लाइम लाइट ,,,,,

परवाच एक सुंदर सिनेमा बघण्यात आला "लाइम लाइट",,,चार्ली चा एक अत्यंत सुंदर सिनेमा, त्यात त्याने रंग भूमिवरील झगमगटा पासून दूर फेकल्या गेलेल्या नटाची भूमिका केली आहें त्या चार्लिला कुणी विचारित नाही तरी हा बाबा  रोज जिथे नाटकाच्या  तालिमी चालल्या असतील तिथे हा रोज जावून उभा रहात असे. त्याच्या कड़े इतर लोकांच लक्ष गेल्यावर सहाजिकच ते सारे हा कशाला आला इथे कडमड़ायला असा एकंदर सुर असे आणि मग राग काढन्यासाठी यथेच्छ धुलाई आणि मानहानी ही ठरलेलीच इतक सार सहन करून ही तो पुन्हा दुसर्या दिवशी मार खायला तिथे हजर असे . पण तिथे एक त्याच्या वर प्रेम करणारी त्याच्यावर माया असणारी हीरोइन असते  तिला हे सार सहन होत नसे आणि एक दिवस ती त्याला रागावून बोलते अरे ,, "कुठल्या मातीचा बनला आहें तु तुला राग येत नाही  हे लोक तुझ दुस्वास करतात शिवीगाळ करतात तुला राग येत नाही घृणा नाही येत ?" त्यावर चार्ली म्हणतो ,येते ना  "मला त्या रस्त्यावर पडलेल्या सांडलेल्या माझ्या ही रक्ताची ही घृणा येते" पण काय करू ? माझ्या नासनासत तेच वाहते आहेना? त्याचा राग राग करून कसे चालेल? मला...

राम आणि मी

आज लोकसत्ता मधे हा जोक आला होता त्यावरून मला १५ वर्षा  पूर्वीची  गोष्ट  आठवली जॉर्ज ब्यानार्ड शौ आपल्या मिस्कील स्वभावाबद्दल आणि उदगारां बद्दल प्रसिध्द होते . एकदा ते बाथरूम मध्ये टबात उघड्याने आंघोळ करत होते ,,,,,,,,, त्यांना भेटायला आणि मुलखात घ्यायला काही पत्रकार आल्याचे त्यांच्या नोकराने सांगितले . ते ती आंघोळ तशीच टाकून उघड्या अंगाने त्या पत्रकारांसमोर आले आणि ,,,,,,,,, मग मात्र सारा घोळ त्यांच्या लक्षात आला पण आता काय करणार? त्यांनी लगेच त्यांचा हजार जबाबी पण दाखवला आणि म्हणाले,,,,,,,,, "मला काहीच लपवायचे नाही तुम्ही काहीही विचारू शकता " आणि मला एक गोष्ट आठवली ती अशी,,,,,,,,, साधारण १५\१६ वर्ष झाली अयोध्येचा काळ होता  दंगल वैगेरे होवून गेली होती मी सकाळी दुकानात बसलो होतो सकाळचे ८ वाजले होते . साधारण ७५ चे rss ओक गुरुजी मला भेटायला आले . आणि आमच्या गप्पा मारून झाल्या अच्छा मी निघतो असे म्हणत निघाले. आणि लगेचच ओ ओक साहेब म्हणून आवाज आला दुकाना जवळच एक पोलीस चौकी आहे त्यात एक rpi चा पडेल उमेदवार बिचुकले बसत असे बिड्या फुंकीत ,,,,,,,,, शे...

पिल्लू कि छावा ,,,,?

एक दिवस जंगलाचा राजा सिंह  शिकारीला बाहेर पडला. खुप दुरवर जावुनही त्याला शिकार मिळाली नाही . निराश मनाने परतत असता रस्त्यात   एक  कोल्ह्याचे पिल्लू त्याला सापडते. चला काहीतरी व्यवस्था झाली या विचारत  तो  असतानाच . ते पिल्लू केविलवाण झाल आणि माफ़ी मागू लागल.. आणि त्या सिंहातला बाप जागा झाला    ,,, आणि त्याला सोडायचे  ठरवले  पण  नंतर त्याने  , विचार  केला  कि  मी सोडतोय  पण  बाहेर  कुणी  सोडणार  आहे का ? कुणीना कुणी ह्याला खावून टाकणार ,,, असा विचार  करून  त्याने त्या पिल्लाला आपल्या घरी  नेले  आणि आपल्या छाव्यांना सांगितले हा तुमचा  नवीन  मित्र  आहे किंवा भावू  समजा ,,,, दिवस  जात होते , एक दिवस  ते  तिघंही  जंगलात दूरवर खेळायला गेले  . आणि वाट चुकले आणि अचानक त्यांच्या समोर  महाकाय हत्ती उभा राहिला  ,,,,,,, आता काय  करायचे  ? या विचारात असतानाच त्या सिंहाच्या छाव्यांनी  त्या हत्तीवर झ...