Skip to main content

राम आणि मी

आज लोकसत्ता मधे हा जोक आला होता त्यावरून मला १५ वर्षा  पूर्वीची  गोष्ट  आठवली
जॉर्ज ब्यानार्ड शौ
आपल्या मिस्कील स्वभावाबद्दल आणि
उदगारां बद्दल प्रसिध्द होते .
एकदा ते बाथरूम मध्ये टबात उघड्याने
आंघोळ करत होते ,,,,,,,,,
त्यांना भेटायला आणि मुलखात घ्यायला
काही पत्रकार आल्याचे त्यांच्या नोकराने सांगितले .
ते ती आंघोळ तशीच टाकून उघड्या अंगाने
त्या पत्रकारांसमोर आले आणि ,,,,,,,,,
मग मात्र सारा घोळ त्यांच्या लक्षात आला
पण आता काय करणार?
त्यांनी लगेच त्यांचा हजार जबाबी पण दाखवला आणि
म्हणाले,,,,,,,,,
"मला काहीच लपवायचे नाही तुम्ही काहीही विचारू शकता "

आणि मला एक गोष्ट आठवली ती अशी,,,,,,,,,
साधारण १५\१६ वर्ष झाली अयोध्येचा काळ होता 

दंगल वैगेरे होवून गेली होती
मी सकाळी दुकानात बसलो होतो सकाळचे ८ वाजले होते .
साधारण ७५ चे rss ओक गुरुजी मला भेटायला आले .
आणि आमच्या गप्पा मारून झाल्या अच्छा

मी निघतो असे म्हणत निघाले.
आणि लगेचच ओ ओक साहेब म्हणून आवाज आला
दुकाना जवळच एक पोलीस चौकी आहे त्यात एक
rpi चा पडेल उमेदवार बिचुकले बसत असे बिड्या फुंकीत ,,,,,,,,,
शेजारीच असल्यामुळे मला सार ऐकायला येत होत
त्यानेच आवाज दिला होता ओक साहेबांना ,
आणि अचानक त्याने विचारले
मग काय म्हणताय तुमच ते राममंदिर?
कधी बांधणार?
आणि ईतकी मंदिर आहेत आणखी काय करायचे आहे?
असा भडीमार केला मी ऐकतच होतो,,,,
ओक मात्र अचानक या सार्या प्रकाराने गांगरले
आणि त्यात त्याने आणखी एक महा भयंकर प्रश्न विचारला,,,,,,,,,,,,?
तो म्हणाला ओक तुम्ही म्हणता राम सर्वत्र आहे मग आम्ही
हागायचं कुठे?
आता मात्र ओक कावरेबावरे झाले ७५चे ओक लालबुंद झाले
काय बोलाव सुचेना,,,
आणि मग मात्र मी मध्ये उडी घेतली आणि बिचुकले ला सांगितले ,,,,,,,,,?
बिचुकले ओक साहेबांना तुम्ही प्रश्न विचारला आणि
प्रत्यक्ष रामाने मला आताच सांगितले म्हणाले सुनील
बिचुकले बोलतात ते बरोबर आहे (आता मात्र मीही गडबडलो )
प्रत्यक्ष राम बोलतो ,,,,?(काय आहे रामच आणि आपल कनेक्शन आहे ना)
मग आता मी काय सांगू त्या बिचुकलेला,,,,,,,,,?
राम म्हणाला सुनील बिचुकलेला सांग
मी तुझी सोय केली आहे तू बोलतोस ते अगदी बरोबर
मीच सर्वत्र आहे म्हणून जागाच उरत नाही तुला हगायला ,,,,,,,,
तेव्हा आता पासून ज्यांच्या तोंडी राम नाही,,,,,,,,,,,
त्याच्या तोंडात हाग म्हणाव,,,,
मी म्हणालो रामा तू त्या बिचुकलेची सोय केलीस ?
पण त्याच्याच तोंडात राम नाही ,,,,,,,,,?
अरे ती मी तुझी सोय केली .
तात्पर्य-
हजरजबाबीपणा असेल तर
तुम्ही कुठलीही बाजी कुठलेही संकट
उलटवू शकता .

Comments

  1. vaa kupach chaan ! man bharun hi aal he aikun pan jashach tase ch aahe.........

    jay Sriram !!!!

    ReplyDelete
  2. सुनीलभाऊ..काय जागा दाखवली हो त्याला....मस्त !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल