Skip to main content

लेकिस पत्र -चार्ली चेपलीन यांनी आपल्या लेकिस लिहलेल पत्र

प्रत्येक आईवडिलांनी त्यांच्या लेकीला/लेकींना लिहावे असे पत्र चार्ली चॅप्लीन यांनी त्यांच्या जेराल्डिन नावाच्या मुलीला लिहिले आहे.

हे एका बापाने त्याच्या लाडक्या लेकीला दिलेलं मूल्यशिक्षण तर आहेच आणि प्रेमाने केलेले मार्गदर्शनही आहे. तसेच  माणुसकीचा धडा शिकवणारं, मनाचा तळ ढवळून काढणारं, डोळ्याच्या कडा ओलावणारं साहित्यातील एक तेजस्वी, सळसळतं पान आहे!

" लेकीस पत्र "

प्रिय मुली,
ही रात्रीची वेळ आहे.
नाताळची रात्र.
माझ्या या घरातील सगळी लुटुपुटूची भांडणं झोपली आहेत.
तुझे भाऊ-बहीण झोपेच्या कुशीत शिरले आहेत.
तुझी आईही झोपी गेलीय.
पण मी अजुनही जागा आहे.
खोलीत मंद प्रकाश साकळतोय.
तू किती दूर आहेस माझ्यापासून पण विश्वास ठेव, ज्यादिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांपुढं तरळणार नाही, त्या दिवशी आंधळं होऊन जाण्याची माझी इच्छा असेल.
तुझा फोटो तिथं टेबलवर आहे आणि इथं ह्रदयातही.
पण तू कूठं आहेस?
तिथं, स्वप्नांसारख्या पॅरिस शहरात!
तू 'चॅम्प्स एलीसिस'च्या भव्य रंगमंचावर नृत्य करत असशील.
रात्रीच्या या शांततेत मला तुझ्या पावलांचा आवाज येकू येतोय.
हिवाळ्यातील आकाशात असणाऱ्या चांदण्यांची चमक, मी तुझ्या डोळ्यांत पाहू शकतो.
असं लावण्य, असं सुंदर नृत्य, तू तारा होऊन अशीच चमकत रहा.
पण
जेव्हा प्रेक्षकांचा उत्साह आणि त्यांनी वाहिलेली स्तुतिसुमनं यांची नशा येऊ लागेल आणि त्यांनी भेटीदाखल दिलेल्या फुलांचा सुगंध तुझ्या डोक्यात शिरु लागेल
तेव्हा
गुपचूप एखाद्या कोपऱ्यात बसून तू माझं हे पत्र वाच.
आणि आपल्या ह्रदयाचा आवाज ऐक.

मी तुझा बाप आहे जेराल्डिन,
मी चार्ली, चार्ली चॅप्लीन.
तुला आठवतं का?
जेव्हा तू खूप लहान होतीस तेव्हा तुझ्या उशाशी बसून मी तुला ‘झोपणाऱ्या परी’ची गोष्ट ऐकवायचो.
पोरी, मी तुझ्या स्वप्नांचा साक्षीदार आहे.
मी तुझं भविष्य पाहिलं आहे…
रंगमंचावर नृत्य करणारी एक मुलगी, जणू आभाळातून उडणारी एखादी परी.
लोकांच्या टाळ्यांच्या आवाजात मला हे शब्द ऐकू येतात, ‘या मुलीला बघीतलत का, ती एका म्हाताऱ्या विदूषकाची मुलगी आहे. तुम्हाला आठवतं का त्याचं नाव चार्ली होतं.’
हो! मी चार्ली आहे!! एक म्हातारा विदूषक!!!
आणि आता तुझी वेळ आहे.
मी फाटून जीर्ण झालेल्या पॅंटमध्ये नाचायचो.
आणि माझी राजकुमारी! तू सूंदर रेशमी पोषाखात नृत्य करतेस.
हे नृत्य, या टाळ्या, तुला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातील.
उंच जा, खूप उंच जा – पण लक्षात ठेव की तुझी पावलं नेहमीच जमिनीवर असली पाहिजेत.
तू लोकांचं जगणं जवळून बघायला हवं –
छोट्या छोट्या गल्यांमध्ये, बाजारांमध्ये नाचणाऱ्या नर्तकांना तू जवळून बघ, ते गोठवणाऱ्या थंडीत भूकेनं तडफडताहेत.
मी ही त्यांच्यातलाच होतो, जेराल्डिन!

त्या जादूच्या रात्री जेव्हा मी तुला अंगाई म्हणवून झोपी घालत असे
आणि तू झोपेच्या डोहात उतरत जायचीस
तेव्हा मी जागा असे, टक्क जागा.
मी तुझा चेहरा बघायचो, तुझ्या काळजाचे ठोके ऐकायचो.
आणि विचार करायचो, ‘चार्ली ! ही पोरगी तुला कधी ओळखू शकेल का?’
तुला माझ्याबद्दल फारशी माहिती नाहिय, जेराल्डिन!
मी तुला हजारो गोष्टी ऐकवल्या, पण ‘त्याची’ गोष्ट कधीच सांगितली नाही.
ही कहाणीही तितकीच ऐकण्यासारखी आहे.
ही त्या भुकेल्या विदूषकाची गोष्ट आहे, जो लंडनच्या गरिब वस्त्यांमध्ये नाचत- गाणं म्हणत पोटापुरतं मिळवायचा.
ही माझी गोष्टय.
मला ठाऊक आहे पोटाची भूक म्हणतात, ती काय असते.
मला माहितय ‘डोक्यावर छत नसणे’ या शब्दांचा अर्थ काय आहे.
मदतीसाठी तुमच्याकडे फेकलेल्या नाण्यांतून आपल्या स्वाभिमानाची चाळण होतांना मी अनुभवली आहे. आणि तरीही मी जिवंत आहे.
असो, ही गोष्ट इथेच सोडू.

तुझ्याबद्दलच बोलणं जास्त उचित राहील, जेराल्डिन.
तुझ्या नावानंतर माझं नाव येतं…… चॅप्लीन.
हे नाव घेऊन मी चाळीस पेक्षा जास्त वर्षे लोकांचं मनोरंजन केलं आहे.
पण हसण्यापेक्षा मी जास्त रडलो आहे.
ज्या जगात तू राहातेस तिथं नाच-गाण्याव्यतिरिक्त काहीच नाहीय.
अर्ध्या रात्रीनंतर जेव्हा तू थिएटरच्या बाहेर येशील
तेव्हा तू तुझ्या समृद्ध आणि संपन्न चाहत्यांना विसरू शकतेस.
पण
ज्या टॅक्सीत बसून तू घरी जाशील, त्या टॅक्सी ड्रायव्हरला हे विचारायला विसरू नकोस, की त्याची बायको कशी आहे?
जर ती गर्भार असेल तर जन्म घेणाऱ्या बाळासाठी, त्याच्या कपड्यांसाठी आणि औषधासाठी त्याच्याकडे पैसे आहेत काय?
त्याच्या खिशात थोडे अधिकचे पैसे टाकायला विसरू नकोस.

मी तुझ्या खर्चासाठी तुझ्या बॅंक खात्यावर काही रक्कम भरली आहे,
खर्च करताना नेहमी विचार कर.
कधी कधी बसमधून प्रवास कर,
छोट्या छोट्या रस्त्यानं प्रवास कर,
कधी कधी पायाखाली शहराचे रस्ते तुडव.
लोकांकडं ध्यान देऊन बघ.
अनाथांप्रति दया ठेव.
आणि दिवसातून एकदा तरी स्वतःला हे नक्की सांग की, ‘मी सुद्धा त्यांच्या सारखीच आहे.’
हो, तू ही त्यांच्यातलीच एक आहेस पोरी.
कोणत्याही कलावंताला त्याचे पंख देण्याअगोदर कला त्याच्या पावलांना रक्ताळवत असते.
जेव्हा तुला एखाद्या दिवशी असं वाटेल की तू तुझ्या प्रेक्षकांपेक्षा मोठी आहेस तर त्याच दिवशी
रंगमंच सोडून पळ काढ.

टॅक्सी पकड आणि पॅरिसच्या कुठल्याही गल्लीबोळात जा.
मला माहितीय तिथं तुला तुझ्यासारख्या कितीतरी नर्तकी भेटतील –
तुझ्यापेक्षाही जास्त सूंदर आणि प्रतिभासंपन्न.
अंतर फक्त ऐवढचंय की त्यांच्याजवळ थियटरचा झगमगाट नाही,
त्यांच्याजवळ चमचम करणारा उजेड नाही.
चंद्रप्रकाश हाच त्यांचा सर्च लाईट आहे.
जर तुला वाटलं की यातील एखादी जरी तुझ्यापेक्षा चांगलं नृत्य करतेय तर नृत्य करणं सोडून दे.
नेहमीच कुणी ना कुणी अधिक चांगलं असतं, हे लक्षात घे.
सतत पुढे जात राहाणं आणि सतत शिकत राहाणं म्हणजेच तर कला आहे.
मी मरून जाईन, तू जिवंत राहशील.
मला वाटतं तुला कधीही गरिबीचा स्पर्श होऊ नये.
या पत्रासोबत मी तुला चेकबुकही पाठवतोय, म्हणजे तुला मनासारखा खर्च करता येईल.
पण, दोन नाणी खर्च केल्यानंतर हा विचार कर, की तुझ्या हातात असणारं तिसरं नाणं तुझं नाहीय –
ते त्या अनोळखी माणसाचं आहे, ज्याची त्याला खूप खूप गरज आहे.
असा माणूस तू सहज शोधू शकतेस, फक्त आजूबाजुला चौकस नजर टाकली पाहिजे.
मी पैशांबद्दल बोलतोय कारण मला पैश्यांची राक्षसी शक्ती परिचितय.

होऊ शकतं एखाद्या दिवशी कुणी राजकुमार तुझ्यावर भाळेल!
बाहेरचं रंगीन जग पाहून आपलं सुंदर काळीज कुणाला देऊ नकोस.
लक्षात घे, जगातला सगळ्यात मौल्यवान हिरा हा सूर्य आहे, जो सगळ्यांसाठी प्रकाशतो.
आणि हो, जेव्हा एखाद्यावर प्रेम करशील तेव्हा काळजाच्या देठापासून प्रेम कर.
मी तुझ्या आईला याबद्दल तुला पत्र लिहायला सांगितलं आहे,
प्रेमाच्या बाबतीत तिला माझ्यापेक्षा जरा जास्त कळतं.
मला हे ठाऊक आहे , की बाप आणि त्याच्या लेकरांत नेहमीच एक तणाव असतो.
पण विश्वास ठेव
मला फार आज्ञाधारक मुलंही आवडत नाहीत.

मला वाटतं या नाताळच्या रात्री एखादा चमत्कार व्हावा, म्हणजे मला तुला जे सांगायचंय ते तुला नीट समजून येईल.
चार्ली आता म्हातारा झालाय जेराल्डिन.
कधी ना कधी, शोकमग्न काळ्या कपड्यात तुला माझ्या कबरीवर यावं लागेल.
मी तुला विचलित करू इच्छित नाही
पण वेळोवेळी स्वतःला आरशात बघ, तुला माझंच प्रतिबींब त्यात दिसेल.
तुझ्या धमण्यात माझंच तर रक्त वाहतय.
जेव्हा माझ्या धमण्यातील रक्त गोठून जाईल, तेव्हा तुझ्या धमण्यांतून वाहणारं रक्त तुला माझी आठवण करून देईल.
हे लक्षात ठेव, की तुझा बाप कुणी देवदूत नव्हता, कुणी महात्मा नव्हता, तर तो नेहमीच एक चांगला माणूस होण्यासाठी धडपडत राहीला.
तू ही असाच प्रयत्न करावास, ही माझी इच्छा आहे.
खूप सगळ्या प्रेमासह,
चार्ली.

अनुवाद: पृथ्वीराज तौर

(चार्ली चॅप्लीन यांनी आपल्या मुलीला जेराल्डिन ला हे पत्र लिहिले आहे. जेराल्डिन या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ‘डॉ. झिवागो’ या कादंबरीवरील त्याच शीर्षकाच्या चित्रपटातील त्यांचा अभिनय संस्मरणीय आहे. अनुवादक डॉ. पृथ्वीराज तौर हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत.)

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल