Skip to main content

मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे.

खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन.

#मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे- या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः

श्लोक – १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन् तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव:

श्लोकाचा अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.



श्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः

श्लोकाचा अर्थ – आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची )पूर्ति प्रदान करो.

श्लोक ३ (प्रथमार्थ) ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।

श्लोकाचा अर्थ – आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.

श्लोक ३ (द्वितियार्थ) समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति।

श्लोकाचा अर्थ – आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.

श्लोक ४ तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।

श्लोकाचा अर्थ – या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.
संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल