Skip to main content

1 इतिहातील तो दिवस होता वटपौर्णिमेचा*,,,,,,, अर्थात

*इतिहातील तो दिवस होता वटपौर्णिमेचा*,,,,,,,
अर्थात
*वटपौर्णिमा ते वठलेला महाराष्ट्र* *1*
पुण्यात पाय टाकताच जिजाईचे विचार फुलायला आणि रुजवायला सुरवात झालीच होती
आणि त्यानुसार शिवराय चालतच होते खेळता खेळता किल्ला घेण्याचे आणि त्याचे महत्व जाणून घ्यायचे काम चालूच होते
अशातच पुढे काही दिवसांनी शिवराय आणि जिजाई वडिलांना भेटायला विजापुरी गेले आणि बादशहाला कुर्निसात न करणारा शिवबा त्याच पाणी त्याची स्वराज्य निर्मितीची इच्छा शहाजीराजांच्या नजरेत भरली
आणि ते लगोलग बोलून गेले शिवबा अरे तुझ्यासारखा मुलगा मला मिळाला आता अस वाटायला लागलय की तुझ्या बरोबर स्वराज्यात यावं
आणि ,,,,
*इथेच खरी ओळख होते जिजाबाईंनी त्याच्या कर्तृत्वाची *इथे त्या बुद्धिबळातील चेकमेट खेळत होत्या कारण,,*

आणि इथे सुरू झाला प्रवास
जिजाईच्या बुद्धिबळाचा आणि शिवरायांच्या पराक्रमी बुद्धेमत्तेचा

*जिजाई म्हणाल्या तुम्ही जर इथेच विजापूरात आदिलशाहीत  राहिलात तर तिकडे शिवबाला हात लावताना शत्रू दाहदा विचार करेल आणि स्वराज्यासाठी थोडा अजून वियोग सहन करावा लागला तरी चालेल काही डाव आपण ही खेळले पाहिजे लोकांना माहीत आहे शहाजी राजांची ताकद ते कधी ही कुणाविरुद्धही बंड करून उठतील आणि आपल्याला ते भारी पडेल,,,,*
इकडे पुण्यात परतल्यावर शिवाजी राजे स्वराज्य निर्मितीच्या कामाला भिडले एका 5/6 किल्ले घेतले आणि ते कळल्याबरोबर *आदिलशहाने एक विचित्र डाव खेळला*
अफजल खान मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यालाही बोलवून घेतलं,,,
मुस्तफाला आदेश दिला शहाजी राजा फसवून विश्वासघातांन अटक करा सोबत बाजी घोरपडेला घ्या ज्यामुळे
अफजखनाची स्वारी सोपी होईल
आणि त्यानुसार *मुस्तफाने दगलबाजी केली बाजी घोरपड्या हरामखोर आपल्या सैन्यासह बेसावध शहाजी राजावर तुटून पडला* आणि सह्याद्रीचा हा वाघ जेरबंद झाला,,,,
अफजल खानानं स्वतः शहाजीराजांना बेड्या घालून हत्तीवरून धिंड काढल्यासरखं मिरवत विजापूरात आणलं
दुसरीकडे फत्तेखान 5000 माणस आणि 40 तोफा घेऊन राजांवर पाठवला
*आता उंदराला पकडायला लागणार काय❓*
*बापाला तर कैद केले,,,*

*विचार केला तर कळेल की खऱ्या अर्थाने आदिलशहाने जिजाबाईनच आव्हान दिल होत की पोराच्या कारवाया थांबव नाही तर गाठ मगळसूत्राशी आहे तुला तुझं कुंकू हवंय की पोरगा? हे स्वराज्याचे उद्योग ताबडतोब थांबव,,,,आणि नवरा हवा असेल तर दोघा माय लेकरांनी या गुडघ्यावर आणि मागा भीक प्राणाची*,,,,,

ही बातमी शिवरायांना समजली त्यांनी आईला विचारलं आई काय करायच❓
हे स्वराज्याच काम थांबवू का थोडा बाबांसाठी आता❓
तशा जिजाई गरजल्या अरे हे काम थांबवायला तुझं का हे राज्य आहे❓कधी ही उघडायला आणि बंद करायला हे काय दुकान आहे❓हे साधुसंताच्या आशीर्वादाचा गडकील्ये घेताना धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांचा आणि या घडीला तुमच्या सोबत अडणाऱ्यांचं हे राज्य आहे काय समजलात😡😡
तुम्ही स्वराज्याची चिंता करा आम्ही आमच्या कुंकवाची करू जा तुकोबारायांकडे सल्ला मसलत करा ,,,
आता हे लक्षात घ्या तुकोबाराय म्हणजे एका गालावर मारली तर दुसरा पुढे करा असा सल्ला देणारे नव्हे तर,, *देवहऱ्यावर विंचू बैसला तेथे पैजाराचे काम अधमाशी अधम असा सल्ला देणारे होते*
*कुणी कितीही वाईट वागलं तरी आपण चांगलंच वागायचं असले देशबुडवे सल्ले देत नव्हते तुकोबा*
आणि तुकोबारायांशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं
*शिवबा आदिलशहाने विश्वासघात केलाय त्याच्याशी तू तसच वाग तू घाबरव म्हणून शहाजी राजानं अटक केली ना❓मग आदिलशहा घाबरले अस कुणी असेलच की नाही❓*
आणि डोक्यात लख्ख उजेड पडला क्षणात सारे रस्ते मोकळे झाले डोक्यात विचार चक्र सुरू झाली सापडला रस्ता सापडला तुकोबांच्या पायी मस्तक ठेवलं आणि महाराज निघाले,,
त्यांच्या हेरांनी नुकतीच बातमी आणली होती दिल्लीच्या बादशहाचा मुलगा मुराद त्यावेळी महाराष्ट्र् दौऱ्यावर आला होता
दिल्लीचा झेंडा महाराष्ट्रात फडकवण्यासाठी तो आला होता
आणि लगोलग जिजाईच्या सल्ला *मसलतीनुसार मुरदला पत्र टाकलं*
,,,,त्या आदिलशहकडे आमचा सारखा अपमान होत असतो,
आमच्या कर्तुत्वाला वाव नाही,
आणि त्यामुळे मी आणि माझे वडील दोघेही तुमच्या सेवेस यावं आणि दिल्लीचा झेंडा महाराष्ट्रात फडकवण्यास मदत करावी पण,,
ही कुणकुण त्या आदिलशहास कळली आणि त्याने आमच्या वडिलांस कैद केले आहे आणि मला असं वाटत नव्हे तेच खरे आहे की तुमच्या केंद्रातील सत्तेतील अधिकाऱ्याला कुणी एक घटक राज्यातील लोक अटक करतात आणि ही जर बातमी झाली तर राज्यात आणि केंद्रात तुमचीच छि थू होईल,,😄
शाहजी राजांची सुटका होताच आम्ही दोघेही आपल्या भेटीस येऊ
( कसली भेट आणि कसलं काय)😃
मुराद हे वाचून मनातून खुश झाला कारण शहाजीची कीर्ती तो ऐकून होताच *माझे वडील दिल्लीपती शहाजहान ज्यांना शहाजीनी हरवलं होत ते आज माझा सरदार व्हाची इच्छा धरतात खूपच भारी बातमी होती ती*शिवरायांचा पराक्रम देखील तो जाणून होता आणि लगोलग आनंदाने हुरळून मुराद च आदिलशहाला पत्र गेलं ,,,
*मुगलांचे असलेलं सरदार शहाजी राजे यांना तुम्ही बंदिवासात टाकले असून हे मुघल बादशहास। कळले असून त्यामुळे मुघलांची तुमच्यवर कधी इतराजी होईल हे सांगता येत नाही*
आता गंमत अशी की
*आदिलशला कळेना की शहाजी राजे हे मुघलांचे सरदार कधी झाले हा वशिला कधी कुठे कसा लागला🤔😃❓*
आणि मुघलांची इतराजी म्हणजे काय ते आदिलशहा जाणून होता
मुगलांच्या विरोधात कुणी हरामखोर बरीदशा ,इमामशा, कुतुबशाह आपल्याला मदत करणार नाहीत हे तो जाणून होता
आणि त्यामुळे त्याला
*सन्मानपूर्वक शहाजी राजांची सुटका करावी लागली😄👍*
आता उरला फत्तेखान त्याला मारायला आपली मानस कशाला❓ दगडांच्याही देशा  हे काय फक्त गाण्यासाठी आहे😃❓ अरे याचा वापर आपण कधी करणार❓म्हणत इथे गनिमी कावा जन्मला आला😄 अर्थातच ठेचकळलेला कपडे फाटलेला फत्तेखान कसाबसा जीव वाचवत आदिलशहा ला मुजरा करायला गेला आणि तिकडून शहाजी राजे सन्मानाने दरबारातून बाहेर आले
*तो दिवस होता वटपौर्णिमेचा*
त्या सावित्रीने यमापासून सत्यवानाचे प्राण वाचवले होते
आणि *जिजाबाईसाहेबांनी त्यांच्या सत्यवानाचे म्हणजे शहाजी राजांचे प्राण आदिलशहा या यामापासून वाचवले होते*

*क्रमशः,,,,,,,,*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल