Skip to main content

फरक तुझ्या माझ्यातला ,,,,

एक सुंदर गोष्ट वाचायला मिळाली
आपण कसे आहोत हे कळण्यासाठी सतत स्वतः कडे लक्ष असणे खूप गरजेचे असते
मग इतरांनी ते कितीही सांगितलं कि तुम्ही कसे आहात तरीही त्याकडे दुर्लक्ष करत तुम्हाला तुमची चाल ठरवता येते आणि मग "अरे गेलो असतो तर बरे झाले असते "असे वाटणे. आणि चालल्यावर "अरे थांबलो असतो तर ?"

"उगाचच बोललो " असे वाटणे बंद होते कारण तुम्ही तुमच्या मतांवर आणि विचारांवर ठाम असता
दुसरा त्याचा काहीही अर्थ काढो,,,कारण
"जे आहे ते आहे जे नाही ते नाही " अस वैराग्य एकदा प्राप्त
झाल कि दुसऱ्याच्या श्रीमंतीचा डामडौल पाहून चळत नाही वळत नाही
एका गुरुची आणि राजाची ही अशीच गोष्ट ,,,
त्या राजाला वारंवार वाटे कि आपल्या गुरूने देखील आपल्या
सारखच आपल्या राजवाडयात राहव ,,,काय आहे त्या जंगलात ?
दरवेळेस राजा आमंत्रण देई ,राजाने दरवेळेस आमंत्रण द्यावे
"चला साहेब राजवाड्यात" आणि गुरूने बोलावे,"नकोरे बाबा मी ईथेच बरा आहे " गुरु बोले "ईथे काय आणि तिथे काय "सारखच
तुका म्हणे धन आम्हा मृत्तिके समान ,,,,
परंतु राजाला वाटे कि गुरु खोट बोलतोय कदाचित राजवाड्यात आल्यावर त्याला मोह आवरता येणार नाही कदाचित आपला सुख बघून आपलाही पाय घसरेल,,,
एक दिवस राजा गुरूच्या खनपटीला बसला कि काय नुसतच बोलता
"ईथे काय तिथे काय मला दोन्ही सारखेच "
अस जर आहे मला तिथे राहून दाखवा ,,अस जवळ जवळ
आव्हानच दिल,,,,
कसेबसे तयार होत गुरुवर्य म्हणाले बघ हा निट विचार कर
नंतर पस्त्वाशील? तुला वाटेल कुठून याला बोलावले ?
राजा म्हणाला गुरुजी असकस म्हणेन मी मला तुम्ही वंद्य आहात,
देवासारखे आहात, अहो माझे गुरु आहात,
तस गुरुजी ताडकन उभे राहत म्हणाले "चल" झाले
दोघाही राजवाडयात आले ,राजाने गुरूला साऱ्या आरामदायी
सोयी करून दिल्या ,दास दासी ,नोकरचाकर दिमतीला ठेवले ,,
दिवस मजेत चालले होते ,,,,,,,
एके दिवशी गुरूने मद्य मागवून मदिरापान केले असे राजाला कळले
तर एकेदिवशी गुरूंनी मांसाहार केला असेही कळले ,,,
आणि एकदा तर गुरूंनी स्त्रीसंग केला हे ही राजाला कळले
हे कळल्यावर मात्र राजाचा धीर सुटला
तो तडक गुरूला भेत्याला गेला बघतो तर गुरु एकदम मजेत होते ,
राजाला ते पाहून खूप राग आला हेटाळणीच्या आवाजात
राजा गुरूला म्हणाला आता सांगा गुरुजी तुमच्यात आणि माझ्यात फरक काय ?
गुरुजी पुन्हा ताडकन उभे राहिले आणि म्हणाले चल सांगतो ,,,
सांगतो सांगतो म्हणत ते राजाला राजवाड्याबाहेर घेवून गेले,
पुढे राजधानीची सीमा ओलांडली तरी गुरु बोलेना ,
सांगत होते थांब जरा सांगतो ,,,पुढे गेल्यावर सांगतो असच सांगत होते, आता जंगलाची वाट सुरु झाली तसा राजाचा धीर सुटला
आता याच्यापुढे मी नाही येवू शकत.
माझ सैन्य, सरदार,राण्या ,राजवाडा ,प्रजा यांना सोडून मी या पुढे येवू शकत नाही
तसे गुरु म्हणाले ,राजा हाच तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे
तुझ ते राज वैभव सोडून मी बाहेर पडलोय मला त्याचा मोह नाही
आणि तुला मोह सोडवत नाही मी हे सार वैभव जस उपभोगू शकतो
तसच ते सोडू ही शकतो परंतु तुझ्या मानत माझ्या विषयी
किल्मिष आले आता मी जातो अस म्हणत साधू निघून गेले पुन्हा
आपल्या चंद्रमौळी झोपडीत राहण्यासाठी
तात्पर्य --आपल्याला जे सांगायचे आहे तसेच वागता येणे बोलता येणे हे फार थोड्या लोकांना जमते "बोले तैसा चाले हे त्यासाठीच,,,
हे जमल नाही कि मग मला अस बोलायचं नव्हत तर तस बोलायचं होत अशी थुंकी बदलावी लागत नाही 


Comments

  1. Atishay chaan Bhumkar saheb.
    Ha tola aaplya paikich ekala tar nahi na...?

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा नाही हो पण अस असल पाहिजे

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...