Skip to main content

शंख, आपण आणि अमेरीका,,१

बोल बोल म्हणता दिवाळी संपली ,,,
या महिन्याभरात एक जाहिरात रोज लागत होती
उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली ,,खूप सुंदर जाहिरात होती खरतर अत्यंत साधी सरळ अशी जाहिरात पण मनाला भुरळ घालून गेली आणि ती ही

"जाहिरात ओलेत्या बाई" विना देखील
कशी करता येते ते दाखवून गेली ,,,
नाही तर आज पर्यंत अगदी दाढीच्या किंवा ईतर पुरुषांच्या जाहिरातीत
बायकांचं आणि तेही कमी कपड्यात काय काम
हा प्रश्न मला नेहमी पडत असे असो ,,,
जाहिरातीतल्या त्या लहान मुलाने त्या आजोबांच काम पुढे
मी चालवेन असच जणू आपल्याला सांगितलं आणि तेच खर आहे.
ज्या ज्या गोष्टी आपल्याला हव्यात अस वाटत त्या साठी आपणच
हे काम आपल्या पुढच्या पिढीच्या हातात काम सोपवण
आपलाच काम आहे आपल्या मुलांना आपण नाही सांगणार तर कोण सांगणार ? आपल्या वाड-वडिलांनी पराक्रमाचे खूप झेंडे गाडले पण आपल काय ? आपण जर हे काम पुढे चालवणार नाही तर आपल्या मुलांकडून
तुम्ही कसल्या अपेक्षा ठेवणार आहात ?
आज साध पाहिलं तर लक्षात येईल
कि साधा डॉक्टर असलेल्या माणसाला देखील आपला मुलगा मुलगी
आपल्यापेक्षा जास्त मोठा डॉक्टर व्हावा असे वाटते
त्यासाठी तो माणूस आवश्यक ती मेहनत घेवून
त्या मुलांना योग्य शिक्षण देवून आपल्यापेक्षा मोठ करायचा
प्रयत्न करतो आणि मग जर आपण,

देवा-दिकांचा ,रामायण महाभारताचा ,वेदांचा ,
पुराणांचा , छत्रपतींचा ,शंभू महादेवाचा ,सावरकरांचा ,भगतसिंगांचा ,राजगुरूंचा, ऋषीमुनींचा हिंदू धर्माचा वारसा मानत असू तर आपल कर्तव्य नाही यांच्या पावलावर पाऊल टाकायचा?
तुकारामबुवांचा एक सुंदर अभंग आहे ,
"समुद्र हा पिता, बंधू तो चंद्रमा ,
भगीनी ती रमा ,मेहुणा जायचा द्वारकेचा हरी शंख दारोदारी भीक मागे,,,?"
या अभंगात त्यांनी एक छान दृशांत दिलाय ,,
दुपारची वेळ असते एक भिक्षेकरी एका ब्राम्हणाच्या दारात
शंख वाजवून भीक मागतो त्यावेळी तो ब्राम्हण बाहेर येवून म्हणतो
आरे बाबा आता जेवायची वेळ झाली आता भिक्षा घेवून तू बनवणार कधी
आणि मग जेवण कधी करणार त्या पेक्षा अस कर आज आमच्या घरात कुणीच नाही जेवायची वेळही झालीय मी ही विचार करत होतो एकटा कसा जेवू? अनायासे तू आलाच आहेस तर आपण दोघा ही जेवायला अस बसू ?
त्यावेळी तो भिक्षेकरी म्हणतो ठीक आहे मी नदीवर
आंघोळ करून येतो मग आपण दोघाही जेवण करू ,,,
आता तो भिक्षेकरी गेल्यावर सहज चाळा म्हणून
त्या भिक्षेकार्याच्या झोळीतील शंखाशी गप्पा मारतो त्याचा
हा अभंग ,,,,
"ब्राम्हण सहजच त्या शंखाला विचारतो ,
काय मग शंख महाराज आपण कोण? कुठून आलात?
आणि या भिक्षेकार्याच्या झोळीत काय करताय ?
त्यावर तो शंख मोठ्या अभिमानाने आपण कुणाचे वारसदार आहोत
आपली किती मोठी वट आहे ,आपले नातेवाईक कोण ते सांगतो,,,
शंख म्हणतो महाराज मी काय तुम्हाला असा तसा वाटलो काय?
अहो आजही ज्याच्या पोटातील अगणित रत्न आजही संपली नाहीत
तो रत्नाकर म्हणजेच समुद्र हा माझा बाप आहे ,,,
आकाशाच तारांगण ज्याच्या हाती तो चंद्रमा माझा भाऊ आहे ,,,
साक्षात माता रमा माता लक्ष्मी ही माझी बहिण आहे,,,
आणि हो या रमेचा पती म्हणजे द्वारकाधीश भगवान
श्रीकृष्ण ज्याची नागरी सोन्याची ,तेथील रस्ते सोन्याचे ,
घर तीही सोन्याची ,घरांच्या भिंती सोन्याच्या,
फक्त माझ्या मेहुण्याचेच नाहीतर त्याच्या नगरीतील प्रत्येक माणूस हा त्याच्या ईतकाच गर्भ श्रीमंत आहे ,,,मग असा तसा वाटलो काय?"
त्यावर तो ब्राम्हण म्हणतो ,
"आरे वा ईतके सारे मात्तबर नातेवाईक असताना शंख महाराज
आपण काय करताय ?
त्यावर शंख म्हणतो मी काय करणार मी भिका मागतोय,,,"
किती यातना झाल्या असतील विचार करा ,,,
बर आपली अवस्था यापेक्षा वेगळी नाही
आपण ही अभिमानी वारशाचे परंपरेचे गोडवे गातो
आणि आपणही भिकच मागतो आम्हाला द्या कि हो समाधानाच राज्य आम्हाला द्या कि हो चांगल राज्य ????

परंतु अस बोलून का येणार आहे चांगल राज्य ?
त्यासाठी प्रयत्न नको करायला ?
आमचा वारसा आमची परंपरा याचा आम्हाला अभिमान
जरूर आहे परंतु ती शिवाजी नावाची बला दुसऱ्याच्या घरात
जन्माला यावी ,,,ही आमची भूमिका
जर खरच आपण याचे वारसदार असू आहोत तर
आपल काम नाही आपल्या वारशाला अभिमान वाटेल
अशी वागणूक नको ,,,?
कार्ल मार्क्सच सुंदर वाक्य आहे,,,
"पराभवाच्या ईतिहासाची पुनरावृत्ती जेव्हा पहिल्यांदा
होते तेव्हा ती शोकांतिका ठरते ,,आणि दुसऱ्यांदा होते
तेव्हा ती हस्यास्पस्द होते ,,"
आता आपण एक हिशोब मांडू फक्त गेल्या १०\१२ वर्षाचा कारण गेला महिना
हा सप्टेंबर महिना होता याच सप्टेंबर महिन्यात अमेरिकेवर मुसलमानांनी हल्ला केला
आणि ट्विन टोवर्स उडवले ,,,,,,,,,,,,
आज या गोष्टीला १०\१२ वर्षे झाली या १०/१२ वर्षात अमेरिकेवर पुन्हा
किती हल्ले झाले ? आणि याच १०/१२ वर्षात किती वेळा आपल्या देशाची अब्रू वेशीवर टांगली गेली काय केल आपण ,,,?
परंतु अमेरिकेला बहुदा कार्ल मार्क्स ते वाक्य कदाचित माहित असाव याउपर शोकांतिका आणि पुन्हा जगात हास्यास्पद ठरू नये याची काळजी घेत त्यांनी त्यांची कुंडली उघडली तिचा रीतसर अभ्यास केला आणि ओसामाला
आणि त्यांच्या जिहादी आतंकवादाला नेस्तनाबूत केला .........
तात्पर्य--त्यांना हे पक्क ठावूक होत कि "काही धडे हे गिरवायचे नसतात तर
त्यांच्यापासून धडा घ्यायचा असतो ,,"
आणि आम्ही मात्र "मुळाक्षर गिर्वावीत तसे हिरवटांनी दिलेले धडे गिरवण्यातच धन्यता मानत आहोत"
क्रमशः


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल