Skip to main content

बाप- नियम

बापाच महत्व वाढवताना येथे मला आईच महत्व कमी नाही करायचं 
पण,,,,
कायम उपेक्षित ,दुर्लक्षित ,रागाच,वाईट पणाचा धनी ,
होणार्या   बापाच महत्व हि कमी नाही हे सांगायचा 
अल्पसा प्रयत्न,,,,
आई प्रत्येक बाबतीत रडून मोकळी होते 
पण बापाने ,,,नाही,, नियमच असतो तो ,,,
ज्योती पेक्षा समईने च तापायच असत ,,नियमच,,,
जेवण करणारी आई लक्षात राहते,
पण आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणाऱ्या बापाला 
विसरतो आपण ,,नियमच,,,
स्वतःचा बाप वारला तरी रडता येत नाही ,,नियमच,,,,
बहिणींसाठी भावांसाठी आधार व्हायचा असत ,,नियमच,,,
देवकी यशोदेच कौतुक करतो सहज पण ,,,
कंसाच्या कराल दाढेतून वाचवणारा बापच असतो,,नियमच,,,
कौसल्येचा राम असेल हि पण,,,
पुत्र वियोगाने जातो दशरथ च ,,,नियमच,,,,
मुलाबाळांना चांगल चुंगल देताना जो फाटका राहतो 
तो बापच,,, नियमच,,,
आमच्या नशिबाची भोक कायम त्याच्या 
बनियानवर ,,,नियमच,,,
आम्ही १०\१५० सहज खरचतो सलून मध्ये,
तो मात्र अंगाचा साबण दाढीला लावतो,,,नियमच,,,
आमच्या आजारपणात धावणारा बाप 
स्वतःमात्र ताप अंगावर काढतो,,,नियमच  ,,,
आजाराला नाही घाबरतो एक महिन्याच्या आरामाला 
,,,नियमच,,,
पोरीच लग्न अन पोराच शिक्षण ,,,नियमच,,,
परीक्षेत निकाल आणि निक्काल लागल्यावर जवळ घेणारी आई लक्षात राहते 
पण तो हळूच जावून पेढे आणतो त्यालाच विसरतो  ,,नियमच,,,
ठेच लागली तर आई ग,,,
आणि मोठ्ठा रस्ता ओलांडताना ,
अचानक ट्रक करकचून ब्रेक दाबतो 
तोंडातून आपसूक निघत "बाप रे",,,नियमच,,,
छोट्या संकटासाठी आई आणि वादळाला टक्कर देण्यासाठी 
लढण्यासाठी बापच लागतो मग या बापच स्मरण 
कौतुक आपण नाही करणार तर कोण,,,?
कारण उद्या आपण हि बाप होणार असतो   ,,,
नियमच असतो तो,,,

Comments

  1. 1 comments:

    मैत्रेय१९६४ said...

    प्रिय सुनिल,
    मुंबईत ब्लॉगरच्या मेळाव्यात आपण भेटलो. मनाने कुठेतरी कौल दिला की आपले जमणार. मराठी असण्याचा योग्य अभिमाने आपल्या दोघांनाही आहे. तुझा ब्लॉग मी वाचला आहे. मनात असेल ते बेधडक पणे लिहीणे हे तुझ आंगभूत वैशिष्ट. अस लिहीण किती कठीण असत हे मला कळत. असो.
    आईच्या माये बद्दल खुप लिहील गेल आहे. पण बापाची पण माया असते हे तुझ्या सारखा बाप माणुसच स्पष्ट लिहू शकतो. आम्हा बाबा लोकांच्या भावना व्यक्त केल्या बद्दल आभार.
    लवकरच प्रत्यक्षात भेटु ही आशा.
    मैत्रेय१९६४ अर्थात देवेंद्र मराठे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...