Skip to main content

थोर सैनिक आणि थोर त्यांचे कुटुंबीय

काय थोर असतात आपले सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय...

रविवारी सकाळी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालतेवेळी एक गोळी दुर्दैवाने भारताच्या जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्रीचे जवान, ३६ वर्षीय लान्स नाईक रणजीत सिंग यांच्या डोळ्याच्या वर घुसते.....

ूरवीर लान्स नाईक रणजितसिंग देशाच्या संरक्षणाच्या स्वतःच्या कर्तव्यात पूर्ण सन्मानाने परमोच्च बलिदान देत हुतात्मा होतात.

सोमवारी रात्री तिरंग्या झेंड्यात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव जम्मू काश्मीर इथल्याच रामबाण जिल्ह्यातल्या सुलीगाम या त्यांच्या जन्मगावी लष्करी इतमामात पोचते.

याच वेळी त्यांची पत्नी प्रसूत होते आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त होते. इवल्याश्या बाळाला छातीशी कवटाळून ती धीरोदात्त वीरपत्नी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या आपल्या नवऱ्याचे अंतिम दर्शन घ्यायला नदीकाठावर पोचते.

अश्रूंच्या सागरात पतीचे अंतिम दर्शन घेते...चटकन स्वतःला सावरते....नुकत्याच जन्मलेल्या आपल्या कन्यारत्नाला चितेवर मांडून ठेवलेल्या आपल्या पतीच्या पायावर ठेवते....

......आणि जमलेल्या हजारोंच्या जमावाच्या साक्षीने 'भारत माता की जय' च्या आसमंतात घुमणाऱ्या जयजयकारात ताठ मानेने आणि आत्मविश्वासाने उद्गारते, " आपल्या पोरीला मी शिकवून मोठे करणार...आणि तुमच्या सारखे शोर्य गाजवायला सैन्यात अधिकारी म्हणून भरती करणार...हा या क्षणी माझा तुम्हांला शब्द.".....

काय असतात आपले सैनिक आणि काय थोर असतात त्यांचे कुटुंबीय...

नतमस्तक अक्षरशः 😔🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

भारत माता की जय....

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...