Skip to main content

तात्पर्य_आम्ही_हा_साप_ओळखला_आहे_त्याच__नाव_भाजपा

#तात्पर्य_आम्ही_हा_साप_ओळखला_आहे_त्याच__नाव_भाजपा

*आजची बोधकथा*

    एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता.
    एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले.

*पशुवैद्य* : साप तुझ्यासमवेतच झोपतो का ?

*मुलगा* : हो

*पशुवैद्य* : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ?

*मुलगा* : हो.

*पशुवैद्य* : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ?

*मुलगा (अतिशय आश्‍चयाने)* : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे !

*पशुवैद्य* : या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....अन् गिळलेच, तर तो पचवू शकेल कि नाही ? ?...

*या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की, जे तुमच्यासमवेत सतत असतात, ज्यांच्यासमवेत तुम्ही खाता-पिता, बसता किंवा झोपता, ते सगळेच तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात, असे नाही. त्यातील काही जण तुम्हाला गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात आणि तुम्ही भावनिक होऊन त्यांची स्थिती पाहून द्रवत असता ....जरा सांभाळून !*

*तात्पर्य* : माणसे ओळखायला शिका ,कारण ती काळाची गरज आहे!!!
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनक

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...