Skip to main content

कृष्ण, घमण्ड,मोदी आणि चेले

घमण्ड अहंकार ह्या गोष्टी तुटतातच हे नक्की

एकदा कृष्ण महाली सत्यभामा,गरूडराज, आणि सुदर्शन निवांत गप्पा मारत बसलेले असतात अचानक
सत्यभामा कृष्णला विचारते सांगा या त्रिभुवणात माझ्या पेक्षा कुणी सुंदर आहे का??
भगवान कृष्ण मोठ्या पेचात पडतात की आता नक्की काय उत्तर द्यावे? इकडे आड तिकडे विहीर😩🤔❓
काय करावं काय उत्तर द्यावे या विचारात असतांना च इकडे गरुड महाराज ही कृष्णला विचारतात स्वामी सांगा या त्रिभुवनात माझ्या पेक्षा कोण वेगवान आहे?
हे पाहून सुदर्शन चक्राला चेव येतो सांग देवा माझ्या पेक्षा ताकदवान कोण आहे?
सगळ्याच बाजून कोंडीत अडकलेला श्रीकृष्ण आपली सोडवणूक करण्या करता
गरूड राजाला सांगतो
गरूड राज एक काम करा माझ्या रामवतारातील दास श्री हनुमंत त्या वनात आराम करत असेल आता त्याला काही काम नाही तुला पत्ता देतो तू स्वतः जा आणि हनुमंताला घेऊन ये तोच महाज्ञानी असल्यामुळे या पेचातुन मला सोडवेल आणि तुमच्या ही शंकांचं उत्तर नक्कीच देईल
गरूड राज कृष्णला म्हणतात तुम्ही आज्ञा करा देवराज बस यु गया और यु आया,,,,
अस म्हणतो आणि मारुतीरायचा शोध घेत तो त्यांच्या समोर प्रकट होतो
मारुतीरायाला भगवान श्रीकृष्णाचा निरोप देतो आणि सांगतो कृपया तुम्ही चला मी तुम्हला न्यायलाच आलो आहे
यावर मारुतीराया बोलतात बर ठीक तू हो पुढे मी येताच थोड्या वेळाने,,,
गरूड म्हणतो अहो अस काय करता मी कित्ती लांबून आलो तुम्हला माहिती आहे का? तुमचं वय तुमची ताकद पिकलेले केस पाहता तुम्हला ते शक्य नाही आणि मी घेऊन जाईन सहज आता वेळ नका दवडू,,,
मारुती राय अरे बाबा आता नुकताच आराम करायला आडवा झालो तू हो पुढे मी येतोच तुझ्या मागे
गरूड महाराज खूप विनंती करतात पण मारुती ऐकत नाही शेवटी येतो असे वचन घेऊन गरूड राज तिथून निघतात
इकडे कृष्णला निरोप देऊ म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या दालनात शिरतात तो अचंबित होतात मारुती राय आणि कृष्ण गप्पात रमलेले पाहून जे समजायचं ते समजून जातात श्रीकृष्णला वंदन करत *मला माझा उत्तर मिळाले अस म्हणत गरूड राज निघून जातात*,,,
तो पर्यंत सत्यभामा पाहुणा आला म्हणत फराळ द्यायला सामोरी जाते तेव्हा मारुती राय सहजच श्रीकृष्णला विचारतात देवा रामावतारात तर जगतसुंदरी सीतामाई तुमच्या सोबत होत्या या वेळी कुणीच नाही का आणि ह्या दासी कोण आहेत🤔😏❓ ते ऐकल्या बरोबर *सत्यभामा काय समजायचं ते समजून जाते,,*,
सत्यभामा निघून गेल्या नन्तर
श्रीकृष्ण मारुतीला विचारतात
तू माज्या नगरीत आलास खरा पण तुला कुणी अटकाव केला नाही
त्या बरोबर *जिभेखाली ठेवलेलं सुदर्शन बाहेर काढत मारुती हेच का ते😂🤔❓*
तात्पर्य:- घमण्ड माज हा उतरतोच  उतरतो फक्त तुम्ही तुमच्या *माज महिन्यात रमलेले असता*
 भक्त यातून बोध घेतील ही अपेक्षा ठेवण चूकच पण *माज उतरतो हे त्रिकालाबाधित सत्य मात्र जरूर आहे*
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...