Skip to main content

*विजयादशमी आणि लंका जाळायची असेल तर,,,?*🤔

आज विजयादशमी
परंपरेचा अभिमानाचा आणि सीमोल्लंघनाचा आजचा हा दिवस,,,
पांडवांनी याच दिवशी शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्र काढून युद्धचा बिगुल वाजवला होता,,,
*आज रावणाची लंका जाळायची इच्छा मनात असेल तर आधी शेपूट पेटवून घ्यावं लागेल*
आधी विजय ( कर्तव्य ) साजरा करून मग त्या विजयाच्या दशम्या खायची आपली परंपरा,,,,
आणि परवाच *गाव गाता गजालीत* एक छान प्रसंग दाखवला
अचानक गावातील प्रत्येक *जुन्या वस्तूंवर* *विकणे आहे असा बोर्ड लावलेला आढळतो* त्या विकाऊ वस्तूंमध्ये देवळाची दीपमाळ पासून घरातील परंपरेने चालत आलेल्या जात्यावर सुद्धा भंगार म्हणून विक्रीचा बोर्ड लागतो तसे सारे गावकरी जमा होतात
आणि कुणी हा चावटपणा केला त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे म्हणत जमा होतात,,,
सारे गावकरी हो हो म्हणत त्याला दुजोरा देतात तसा एक 10 वर्षाचा मुलगा समोर येतो आणि म्हणतो की मला द्या शिक्षा हा आगाऊ पणा मी केला आहे,,,,,
पण मला शिक्षा देण्या आधी मला सांगा
ही दीपमाळ नेमकी कधी उजवळी होती🤔❓
हे जात यावर नक्की कधी दळण दळल होत🤔❓
कायहो गुरुजी तुम्ही तर शाळेत या आपल्या गावातील गडकिल्यांविषयी भरभरून बोलता पण या किल्यांवर कधी घेऊन जा बोललो तर तुम्ही सांगता की आता काय राहील तिथे🤔❓
*मग तो कळीचा प्रश्न विचारतो मला सांगा गाववाल्यानु ज्या परंपरेने चालत आलेल्या गोष्टींचं जतन करता येत नसतील त्यांचा वापर करता येत नसेल तर त्या भंगार मध्ये दिलेल्या काय चुकलं❓🤔*
आता माझा कळीचा प्रश्न
इथे फेसबुक व्हाट्सप वर मारे शिवभक्त नि काय नि काय आपण स्वतःला मिरवून घेत असतो
पण या पैकी किती जणांना
*शिवराया प्रमाणे तलवार चालवता येते?*
*शम्भू राजांप्रमाणे किती जणांची शारीरिक मानसिक ताकद आहे हाल सहन करायची?*
*कितीजण घोड्यावर बसून रपेट मारू शकतात?*
आता कदाचित तुम्ही म्हणाल की काय करायचं आता काय पूर्वी सारखा ढाल तलवार घेऊन लढायचं जमना आहे का❓ ठीक मग त्या ऐवजी किती जणांना बंदूक चालवता येते❓ कती जणांना कराटे जुडो बॉक्सिंग कुस्ती जोर बैठका मारता येतात❓ *ज्या परंपरांचा अभिमान आपण धरतो त्या आपल्याला पाळता येत नसतील तर फक्त मिरवण्याची फक्त दाढी वाढवून आणि हाती तलवार घेऊन फेसबुक स्टेटस अजून किती काळ रंगवणार आहोत❓*
मित्रांनो आज सीमोल्लंघन आहे तेव्हा कृपया
*आज खऱ्या अर्थाने शिवरायांचे आपल्या पूर्वजांचे त्या सर्व महाभागांचे पाईक म्हणून मिरवायची हौस असेल तर किमान आजपासून किमान 10 बैठका 10 सूर्यनमस्कार किमान एखादी कराटे सारखी निशस्त्र कला रायफल शूटिंग शिका लोकांना हे करायला उद्युक्त करा तरच आजच्या विजया दशमीच्या शुभेच्छा देण्याला अर्थ आहे* दिवसेंदिवस काळ खूप बिकट होत चालला आहे
*आरक्षणा ऐवजी देशाच्या संरक्षणाचा विचार करा तो विचार कराल तोच खरा दसरा आणि तीच खरी विजयाची दशमी असेल*
जय श्रीराम
मी
भूमकर
सुनील प्रभाकर भूमकर
कडवट शिवसैनिक

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...