Skip to main content

मनापासून मनाचं अंतर,,,

काल खूप दिवसांनी एका नातेवाईक असलेल्या आज्जीला भेटायला गेलो
त्यांचा नवरा खूप पूर्वीच वारला असल्यामुळे त्या व त्यांचा मुलगा राहत मी देखील पुण्यात शिकायला होतो त्यावेळी काही वर्षे त्यांच्या कडेच राहत असे त्यामुळे शिक्षणा नन्तर ही कामा निम्मित पुण्याला जात असे तेव्हा तेव्हा आज्जीला जरूर वेळ काढून भेटत असे,,
आणि आता तर त्यांचा मुलगा देखील शिकून अमेरिकेत गेला होता तिथेच #सेटल झाला होता लग्न देखील केलं होतं आणि त्याला मुलगी देखील होती,,,
ह्या अमेरिका वाल्यांचा घरातल्याना मोठं अप्रूप असत त्या आजीचा मुलगा तिकडे गेला त्याला आज 20 वर्ष झाली पण त्याही वेळी जर कुणाला विचारलं काय करतो मुलगा तर उत्तर एकच मिळत असे तो अमेरिकेत आहे,,,इतकं चुकीचं उत्तर मिळत पण आजही कुणाला विचारलं तर हाच अनुभव येईल मुलगा/मुलगी अमेरिकेत आहे,,
#अमेरिकेत_असणं_हेच_सर्वात_मोठं_काम_असत_त्यांच्या_दृष्टीने,,,,,
मी बोलता बोलता अनेकदा मनात विचार आणत असे की आज्जी तू इथे एकटीच का राहतेस जा ना अमेरिकेला,,,
पण कधी विचारायची हिम्मत होत नसे
कारण तिच्याशी बोलताना ती मला कधी बोलूनच देत नसे अरे तो खूप दूर आहे ना,,
मलाच मेलीला त्याच्या मुलीला पहायचं पण कशी जाऊ अमेरिका दूर आहे ना??
आता मी जरी अमेरिकेला गेलो नसलो तरी आता अमेरिका खूप जवळ आलीय जाण येणं खूप सोप्प झालंय हे मलाही कळत होत पण तिला बोलायची हिम्मत कधी केली नाही
तरीही मी मुद्दाम बोलत असे अरे मी करू का त्याला फोन तो स्वतः येईल आणि घेऊन जाईल की तुला,, पण तीच अडवत असे अरे नको रे खूप काम असत कधी तरी महिनाभराने कसा बसा फोन करत होता पण आज काल तो ही वेळ नाही त्याच्या कडे , मी कशी जाऊ अमेरिका खूप दूर आहे ना? तीच आपलं एकच पालुपद,,
आता ती खूप थकली होती एकटीच होती
पण अमेरिका खूप दूर होती ना,,,
बर ठीक अस म्हणत मी उठलो काही असेल तर मला लगेच कळव, औषधपाणी नीट वेळेवर घे , काही पैसे वैगेरे हवेत का अस म्हणत मी निरोप घेणार तोच मोबाईल वाजला मित्राचा मेसेज आला होता सहज उघडून वाचला तर त्यात लिहल होत,,,
#अस_कुठलं_अंतर_आहे_जे_आपण_मोजू_शकत_नाही?,,,,,
आता मी आज्जी कडे आणि कोड कोण सोडवणार म्हणत मी आज्जीचा निरोप घेत बाहेर पडलो रिक्षा पकडली आणि स्टेशनवर आलो आणि मुंबईला आलो
पण मित्राचा मेसेज डोक्यातून जात नव्हता
अस कुठलं अंतर आहे जे मोजू शकत नाही? खूप विचार केला रिक्षाच ,रेल्वेचं, विमानच, अगदी पृथ्वीवरून सोडलेल्या उपग्रहाच अंतर तर देखील मोजता येतच की मग असलं कसलं अंतर आहे जे मोजता येत नाही ? मला त्या प्रश्नाने भांडवून सोडलं होत
आधीच आजीचा प्रश्न सुटत नव्हता की आज्जी अस का म्हणते की खूप दूर आहे अमेरिका त्यात हा ,,,,
शेवटी न राहवून मीच पुन्हा मित्राला फोन केला त्याला विचारलं तर तो बोलला थांब मेसेजच करतो,,
 थोड्याच उत्तर आलं
#मनापासून_मनाचं_अंतर_मोजता_येत_नाही
आणि अचानक मला क्षणात उत्तर मिळाले होत की आज्जी अस का बोलते की #अमेरिका_खूप_दूर_आहे_बेटा
अंतर मोजण्यासाठी वेगवेगळी साधन आहेत माणूस चंद्रावर गेला पण मनाने मात्र आपल्याच सगे सोयऱ्यांशी आई वडिलांपासून खूप दूर गेला इतकं की ते अंतरच मजता येत नाही त्यासाठी मात्र आज अमेरिकेला देखील जायची गरज उरली नाही


Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...