Skip to main content

Ztv उंच माझा झोका ग,

एका ओळखिच्या मोठ्या
प्रतिष्ठित व्यक्ति कड़े एक आई आपल्या मुलाला घेवुन जाते आणि सांगते या माझ्या मुलाला जरा संमजवा हां खुप गुळ खातो
त्यावर तो म्हणतो आज ज़रा कामात आहे आठ दिवसानी या
आठ दिवसांनी ती बाई पुन्हा जाते
तेव्हा तो एव्ह्ड च म्हणतो बेटा गुळ खावु नको
आता मात्र बाई चीडते अरे हे त्या दिवशीच सांगायच आठ दिवस का लावले
त्यावर तो म्हणतो आधी मी गुळ खाण बंद केल मग मी आज तुम्हाला सांगीतल
झी टीवी ने काल हेच केल
काल संध्याकाळी झी टीवी वर
*उंच माझा झोका*
कार्यक्रम होता
अतिशय सुंदर असा कार्यक्रम होता .
सर्वच कलाकार जे पारितोषक देण्यासाठी आले होते ते सारेच
आलेल्या माता भगिनींच कार्य कर्तुत्व पाहून भारावून गेले होते
ते सारेच हे मान्य करत होते की आलेल्या माता भगिनींचा सत्कार आम्हाला करायला मिळतय हेच खर आमच भाग्य आहे
 या माता भगिनींचा सत्कार करून
आम्ही उपकृत झालो आहोत
पण त्यात ही नाना पाटेकर यांची
प्रतिक्रिया जबर्दस्त होती
नाना म्हणाला,
जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी बोलवन्यात येत तेव्हा उगाचच आपल्या मनात एक
*अहंगंड* तयार झालेला असतो की मी कुणी तरी आहे मी मोठा सेलिब्रेटी वेगेरे आहे म्हणून मला इथे सत्कार करण्यासाठी बोलावलय
पण आज इथे आलो आणि
*कळल आपन कुणीच नाही आहोत*
झी मराठीचे आभार त्यानी आम्हाला आमची जागा दाखवून दिली ,,,,,,
आणि तेव्हाच
त्यांच्या आगामी
*डॉ प्रकाश बाबा आमटे* या चित्रपटाची झलक दाखवली गेली
आणि ते सार पाहताना
याला  चित्रपट म्हणण चुक ठरेल की काय अशी शंका आली
कारण
चित्रपट म्हणजे अतिश्योक्ति अस एक समीकरण ठरलेल आहे
आणि हां चित्रपटाची झलक अशी अंगावर येते की वाटतच नाही
की नाना श्री प्रकाश आमटे यांचा अभिनय करतोय,,,,
मला वाटत
असे कार्यक्रम जर
या टीवी सिनेमा फेसबुक इंटरनेट
व्हाट्स अप ला लोक नाव नाव
ठेवणार नाहित
आजच्या पिढीला थोड़ी तरी जाणीव होइल
प्रत्येक गोष्ट ही गरज म्हणून वापरायची असते स्टेट्स म्हणून नाही आज आपन सारेच स्टेट्सच्या मागे लागल्या मुले आपल्या आजुबाजुच्या सार्याच गोष्टीतला आत्माच हरवून बसला आहे आणि मग या आत्मा बसलेल्या गोष्टी आपल्याला नाही त्या गोष्टी शिकवतात करायला लावतात आपल्या ह्याची जाणीवच नसते की अमुक एक वस्तु आपन नक्की का वापरतो गरज म्हणून
की स्टेट्स म्हणून
आणि स्टेट्सच्या मागे लागलेले आपन मग सहज मिळाल तर ठीक नाही तर ओरबाडून घ्यायला तयार असतो मग जस मिळेल तस
आणि हे खुप भयंकर भयानक आहे याची जाणीव देखिल नसते आपल्याला जो पर्यन्त यात आपल्या कुणाचा बळी जात नाही
तेव्हा मला वाटत प्रलोभनाच्या मागे न धावता आपन आपल्या मुलांना जर खर्याची जाणीव करुन दिली तर निदान एक मुलगी एक स्त्री एक आई आजी काकी मामी आत्या ह्या म्हणजे कुणी उपभोग्य नाहित ही कुणी मादी आणि आपन नर नाहित याची जाणीव होइल
हे सार लिहील आशा साठी
की एक आणखी बाई आल्या होत्या त्यात त्यांनी सांगीतल
माणूस इतका वाईट आहे की
लहान मोठी असा भेद  त्या माणसाला नसतो त्याला कुणीही चालते अगदी चार वर्षापासून साठ सत्तर वर्षा पर्यन्त सुध्हा
पण शवा बरोबर सुध्हा तो संभोग करतो
हे जेव्ह सांगीतल तेव्हा अंगावर काटा उभा राहिला
त्या मुले असे कार्यकम दाखवून झी टीवी ने खुप चागल पाउल टाकलय आता गरज आपल्या बदलण्याची
जय श्रीराम
सुनील प्रभाकर भुमकर

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...