Skip to main content

#मॅन_ह्याज_नोन_बाय_द_कम्पनी_विच_हि_किप्स

आज राहून राहून त्या माझ्या दामले सरांची खूप आठवण येते
मी 6/7 वीत असेंन त्यांच्याकडे शिकवणीला जात असे
विंगर्जी सोडून बाकी साऱ्या विषयात मी बरा होतो
हुशार नाही आणि ढ देखील नाही पण विंगर्जी मात्र बोंब ठरलेली अगदीच नापास होत नसे हेच काय ते
ते सर बाजूलाच सहजिवंन बिल्डिंग मध्ये राहत असत
आणि मी शेजारीच bdd चाळीत
एक दिवस ते त्यांच्या गॅलरीत उभे होते
आणि मी मुलांसोबत मोठं मोठ्याने भर दुपारी चाललो होतो ओरडत खेळत जाता जाता मी डांगट असल्यामुळे एक चारचाकी उभी होती आम्ही सारेच खेळ म्हणून त्या गाडीच नुकसान करू लागलो हे *सर* वरून पाहत आहेत ह्याकडे माझं काही लक्ष नव्हतं आणि असत तरी आम्ही खेळतोय हे कुणाचं नुकसान हे काही कळत नव्हतं किंवा घेणं देणं नव्हतं झालं तिथून पुढे आमची वरात आणखी दुसरं नुकसान करायला गेलो
संध्याकाळी जेव्हा शिकवणीला गेलो तेव्हा शिकवणी
संपल्यावर सरांनी आवाज दिला भूमकर जरा थांबा
सर सर्वांशी असच बोलत आदराने मान देऊन
तर सर पुढे म्हणाले
भूमकर मला माहित आहे तुमचं इंग्रजी खूप कच्च् आहे
मग मी दुपारी काय प्रकार केला त्याची हजेरी त्यांनी घेतली मी लगेच सर चुकलो माफ करा वैगेरे बोललो
सर बोलले माफी वैगेरे राहुद्या
पण मी एक वाक्य सांगतो ते मनावर कोरून ठेवा
कदाचित आता त्याचा अर्थ कळणार नाही
आणि मी तो आता तुम्हला सांगणार देखील नाही
पण मात्र विसरू नका हे वाक्य
आज ते कळतंय अस म्हणेन
मी bdd चाळीत राहत असल्यामुळे त्यांनी हे सांगितलं होतं
#मॅन_ह्याज_नोंन_बाय_द_कम्पनी_विच_ही_किप्स
आज भाजपची काँग्रेस होताना पाहताना
तीच समर्थन करणाऱ्यांकडे पाहताना
ज्या प्रकारे केवळ संख्या वाढवायची कॉंग्रेस आणि विरोधीपक्ष संपवायचे फक्त हाच हेतू मनात धरून
फक्त संख्या वाढवल्याने त्यांना स्वर्ग चारच बोट लांब वाटत असेल लक्षात ठेवावे
#डुकराची_पिलावळ_देखील_जास्त_असते_ हे ही त्यानिमित्ताने कळलं तर बरं

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...