Skip to main content

वेळ कशी बदलते पहा--अरनॉल्ड

जगप्रसिद्ध बाॅडीबिल्डर, माजी गव्हर्नर, हाॅलीवूड स्टार अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी त्यांच्या स्वतःच्या पुतळ्याखाली रस्त्यावर झोपलेला एक छायाचित्र पोस्ट केल आणि खिन्नपणे लिहिली *वेळ कशी बदलते*.. त्याने हे वाक्य लिहिले कारण तो फक्त वृद्ध झालाय म्हणून नव्हे परंतु तो कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर असताना त्याने या स्वतःच्या शिल्पाचे अनावरण केले होते..    एका हॉटेल प्रशासनाला स्वतःचे शिल्प ठेवण्याची परवानगी दिली होती तेव्हा हॉटेल अधिकार्यांनी अरनाॅल्डला सांगितले की  *"कोणत्याही वेळी आपण येऊन आपल्या नावावर एक खोली आरक्षित करू शकता"*. पण हल्ली जेव्हा अरनॉल्ड हॉटेल मध्ये रूम बुक करण्यास गेले तेव्हा हाॅटेल प्रशासनाने त्यांना हॉटेल पूर्णपणे बुक असल्याबद्दल सांगितले त्यामुळे कोणतीही रूम आपणास मिळू शकणार नाही असे असे सांगितले...
मग अरनॉल्डनी एक कव्हर आणले आणि स्वतःच्या पुतळ्याखाली झोपले आणि लोकांना कल्पना करायला सांगितले मी असा का पुतळ्या शेजारी झोपलो आहे ...?
ते सांगू इच्छित होता की जेव्हा माझ्याकडे पद होते तेव्हा लोकं माझी स्तुती करत होते आणि जेव्हा मी पद गमविले , तेव्हा हाॅटेल प्रशासन ते वचन विसरले आणि त्यांनी आपले वचन पूर्ण केले नाही....
 *होय, वेळ बदलली आहे.*
आपल्या स्थितीवर किंवा  आपल्या शक्तीवर किंवा आपल्या बुद्धिमत्तावर कधी अतिविश्वास ठेवू नका. हे सर्व टिकणार नाही.
आपल्या पदाचा , सत्तेचा , संपत्तीचा कधीही गर्व करू नका कारण हे शाश्वत नाही .

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...