Skip to main content

छोटी गोष्ट मोठ्ठी गोष्ट

मध्यंतरी  टीव्हीवर एका बिस्कीटाची सुंदर जाहिरात लागत असे 
आता सध्या बरेच दिवस नाही लागली 
त्या बिस्किटाच नाव नाही आठवत पण जाहिरात खूप सुंदर होती 
आता मधेच आठवायचं कारण म्हणजे ,,,
एका वर्षाने मोठा होता तो माझ्या वरच्या वर्गात म्हणजे 
मी पाचवीला आणि तो सहावीला ,,
बरेच दिवसांनी भेटला सागर ब्रीद आता सध्या तो अमेरिकेत असतो तेव्हापासून ची मैत्री 
त्यावेळी मध्यल्या सुट्टीत तो आवर्जून माझ्या वर्गात येत असे 
माझा डब्बा खायला मी ईतरांना नाही म्हणत असे परंतु 
का कुणास ठावूक त्याला नाही कधी म्हणताच आल नाही 
आणि परवा तो अचानक भेटला आणि तो ही 
परत निघाला होता अमेरिकेला जायला सिग्नलवर 
अचानक नजरे समोर आला आणि 
त्याने चक्क माझ्या साठी त्याच विमान चुकवल 
आणि दुसऱ्या दिवशी गेला मग काय खूप गप्पा 
खूप आठवणी ,मी खाल्लेला मार सार सार आठवल 
आणि ही जाहिरात ही,,,,,,
एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट
पाहत बसली होती. थोड्या वेळाने तिने तिथल्याच
स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला.
कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग
एरिया’त जाऊन पुस्तक वाचत बसली. तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते. शेजारी बिस्किटाचा पुडा होता.
तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी ही त्याच
पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले. त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला,,,
“काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!
माझ्या अंगी थोडी हिंमत असती, तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!’,,ती मनात विचार करत होती.
दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच
होते. आता शेवटचे बिस्कीट उरले.

“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल,
का मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’
ती विचार करत होती. “आता हे अतिच झालं,” असे
म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसली.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक
ठेवायला तिने पर्स उघडली. पाहते तर
काय, तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.
आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली,
याची तिला खूप लाज वाटली.
एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे
तिच्यासोबत वाटली होती. तिने नजर टाकली, तर शेवटचे
बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.
तात्पर्य – आयुष्यात कितीतरी वेळा आपण
दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे;
पण आपल्याला त्याची जाणीवच नसते.
दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण
सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का ?
कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात....!!!
"चांगली वस्तु",
"चांगली व्यक्ती" व
"चांगले दिवस"
यांची किंमत" निघुन गेल्यावर समजते...
"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे...तोच खरा "श्रीमंत".
चार चौघात बसण्यापेक्षा,
कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवंय हे
सुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत.
.आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहाव
आयुष्य जास्त सुंदर वाटत....!


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...