Skip to main content

हट्टी मैत्रीण,,,

मध्यंतरी सर्फची जाहिरात लागत असे
कुछ दाग अच्छे होते है ,,,
त्याची गोष्ट खूप छान होती
बाई त्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाला रागवतात आणि ,,,,,,,,,,?
त्या मित्राला वाचण्यासाठी सगळे मित्र खोट बोलतात
आज तशाच एका मैत्री साठी आपल्या केसांचाही त्याग करणाऱ्या
मुलीची गोष्ट वाचायला मिळाली वास्तविक मुलीना केस खूप प्रिय तरीही,,,,
तर,
एकुलती एक खूप वर्षांनी झालेली दिव्या,,,
घरात सर्वांचीच लाडकी कधी आजी ,कधी आजोबा ,
आणि बाबांकडूनहि तिचे लाड हट्ट पुरवले जात
आई मात्र या सर्व गोष्टीला वैतागली होती
सततच्या लाडामुळे मुलगी बिघडणार तर नाही ना ?
अशी सतत तिला काळजी वाटत असे
म्हणून घरातील प्रत्येकाला सारख्या सूचना देत असे
जास्त लाड करून नका उद्या सासरी गेल्यावर
आपल्याला हे लाड भारी पडतील,,,
पण घरातील सारे त्याकडे दुर्लक्ष करत म्हणत पाहू पुढच पुढे,,,
त्यातही तिच्या बाबांना तिच्यावर भारी विश्वास कि माझी मुलगी
हट्ट करते परंतु ते फाजील नसतात ,,,
आणि एक दिवस मात्र आईच्या मानत असत तसाच घडत
दिव्या एका नव्या हट्टाला पेटलेली असते
आजचा तिचा हट्ट जगावेगळा होता
तिच्या नावाप्रमाणेच दिव्या होता
तिला केस कापायचे होते तेही सगळे टकलू व्हायचं होत,,
घरातल्या आजी आजोबांनी शेजाऱ्या पाजार्यांनी खूप समजावल
पण दिव्या काही केल्या ऐकायला तयार नव्हती
केस कापणार म्हणजे कापणार ह्या तिच्या हट्टावर ती ठाम होती .
कुणाचाच ऐकत नाही म्हंटल्यावर संध्यकाळी
बाबा आल्यावर आईने दिव्याचा दिव्य हट्ट सांगितला
वर चार शब्द हि सुनावले ,बघा मी सांगत होते तसाच झाल ना?"
पण बाबा तरीही शांतच होता
बाबांचे प्रयत्न झाले पण स्वारी हट्टाला पेटलेली तशीच ठाम होती,,
शेवटी तीची आत मान्य करत कसबस
एकदाच तिला जेवायला घातल कारण त्यासाठी तिने
सकाळ पासून जेवणही नव्हत घेतलं ,,,,,,,,,,
मात्र बाबांनी हो बाबा करू तुझ्या मनासारख अशी कबुली दिल्यावर
ती जेवायला बसली
दुसऱ्या दिवशी शब्द दिल्याप्रमाणे बाबा तिच्या हट्टापुढे मान
झुकवत तिला सलून मध्ये नेल, तिला टकलू करून आणल
केस सारे डोक्यावरचे सफाचट केले
आजूबाजूचे लोकही सारे अचंबित आले
पण दिव्या मात्र खूप खूष होती ,सगळेच तिच्या या चमत्कारिक
वागण्याकडे चमत्कारिक नजरेनेच पाहत होते
दोन दिवस सुट्टीचे साम्ल्यावर आता मात्र खरा प्रश्न
उभा राहिला आता हिला बाहेर कस न्यायाच शाळेत कस पाठवायच ?
सगळे हि चिडवणार ए टकलू ए टकलू आता काय करायचं?
पण ईकडे दिव्या मात्र शाळेत जायचं म्हंटल्यावर खूप खूष होती,,
आणि सगळ्यांना मात्र प्रश्न पडला होता आता हीच कस होणार ?
उद्या शाळेत चिडला तर हि पुन्हा म्हणायची आता
कापलेले केस मला पुन्हा चिटकवून द्या हिचा काय भरोसा ?
शाळेचा दिवस उजाडला
बाबांनी मनाचा हिया करून तिला गाडीवर बसवली, शाळेत सोडण्यासाठी
बाबा सोडतात म्हंटल्यावर ती लगेच तयारही झाली
बाबा तिला शाळेत घेवून गेले आणि गाडीतून
उतरल्याबरोबर ती तिचा मित्र
राहुल कडे पळाली ,,,आणि त्याच्याही डोक्याचा चकोट पाहिल्यावर
तर बाबा उडालेच आयला शाळेतल्या मुलांनी
टकलू व्हायची फ्याशन आली कि काय असा विचार ते करू लागले,,
तो पर्यंत त्या राहुलची आई जवळ आली
आणि तिने जे सांगितले ते ऐकून त्यांना त्यांच्या मुलीचा
अभिमान वाटला त्यांचा ऊर् आनंदाने भरून आला
दिव्याच्या जगावेगळ्या हट्टाचा उलगडा झाला होता
आणि आता कधी घरी जावून मुलीच हे कौतुक सांगतो अस झाल होत 
अस काय सांगितलं होत राहुलच्या आईने,,,,?
राहुलच्या आईने सांगितलं,
"अहो दिव्याने केवळ राहुल साठी केस कापले
राहुलचे केस "ल्युकेमिया" मुळे गळून गेले मुल चिडवतात चिडवतील
म्हणून तो शाळेतही यायला तयार नव्हता
दिव्याने त्याला शाळेत यायला तयार केला मला खरच
तुमच्या मुलीचा खूप अभिमान वाटतो अशी मुलगी आणि
आणि अशी मैत्री याच दौलतीवर माझा मुलगा जगेल" 
तात्पर्य --
आपल्या मित्राच दुख हेच आपल दुख जो समजतो तोच खरा मित्र
जसा सुदाम्याच दुखः भगवान श्री कृष्णनी जाणल.


Comments

  1. खूप खूप आभारी आहे दादा आपण आपल्या अमूल्य वेळातून सवड काढून आवर्जून आपल मत नोंदावलत त्याबद्दल लाख लाख धन्यवाद

    ReplyDelete
  2. खूप खूप आभारी आहे जयेश दादा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...