Skip to main content

अंधेर नगरी चौपट राजा,,,अर्थात तुम्ही जिवंत कसे?

हि अशी अंधेर नगरी जिथे भाजी आणि खाजा एकाच तागडीत
तोलले जातात म्हणजे दोघांची किमत एकच
म्हणजेच राजा आणि प्रजा दोघही सारखेच मुर्ख कुणालाही कशाशीहि काहीही घेण देण नाही
तर मित्रांनो ,,,
आज आपल्या देशाची अवस्था हि अंधेर नगरी प्रमाणेच झाली आहे
प्राचीन काळी एकदा एक प्रवासी
या अंधेर नगरीत आला काही दिवस ईथे मुक्काम करून ईथली
प्रेक्षणीय स्थळ पहावीत ,जमल्यास काही काम धंदा करावा चार पैसे कमावून आपल्या गावी निघून जावे
असे त्या प्रवाशाला वाटत होते त्या प्रमाणे काही चौकशी करावी या हेतूने
शहराच्या वेशीपाशी त्याला एक ब्राम्हण भेटला
आता याच्या कडेच चौकशी करावी,
या हेतूने त्याला विचारले हे महाशय ,,,
या नगरीत असे काय महान आहे ज्याच मला दर्शन घेता येईल ?
ब्राम्हण--ईथे फक्त ताड वृक्षाचा समूह च महान आहे जो सर्वांना ताडीचे दान करतो ,,,
प्रवासी--बर दानशूर व्यक्ती असा दाता कोण आहे?
ब्राम्हण--देणारा फक्त धोबीच त्यालाच फक्त घेतलेलं परत द्यायचं माहित आहे
धुलाई साठी नेलेले कपडे ते परत प्रामाणिक पणे परत करतात
प्रवासी--अच्छा मग या नगरीत निदान दक्ष (सावध,,तत्पर) तरी कोण आहेत ?
ब्राम्हण-- हा,, हा चांगला योग्य प्रश्न विचारलात
या नाग्रीतले सारेच दक्ष आहेत पण
दुसऱ्याची संपत्ती आणि बायका पळवण्यात ,,,,
या उत्तराने आता त्या प्रवाशाची बेशुद्ध पडायची पाळी आली
पण स्वतःला सावरत त्याने विचारलं
अहो साहेब अशा या भ्रष्टाचारी आणि दुराचारी नगरीत
तुम्ही जिवंत कसे?
ब्राम्हण- पूर्वी जसे विष कन्या तयार करत किंवा एखाद्या विष पात्रात
जर एखादा किटक चुकून पडला कि त्याला जशी त्या विषाची सवय होते
आणि त्या विष पात्रात राहून हि जगतो
दुधा ऐवजी विष पचवून जशी विषकन्या तयार होते,
अगदी मी हि तसाच जगतो आहे ,,,

तात्पर्य-?????
आज आपल्या महाराष्ट्राची-देशाची अवस्था असताना सारे सत्ताधारी
सच्चर आयोगाची अंमलबजावणी करत असताना
आणि देशाला एका अधोगतीच्या दिशेने लोटताना
सारे विरोधी पक्ष सुद्धा मुग गिळून गप्प बसतात
मग एक दक्ष नागरिक म्हणू आपले कर्तव्य नाही?
कि लोकांना जमेल तितक् सावध करण,,,
सध्या रोज वर्तमान पत्र उघडावे आणि रोज २/४ बातम्या
सच्चर समितीच्या अंमलबजावणीच्या त्याच्या शिफारसीच्या
वाचायच्या आणि काही हि प्रतिक्रिया न देत आपण गप्प बसायचं?
देशाचे हे असे वाटोळे राज्यकर्ते करायला बसले असताना
देशाला आधार देणारा महाराष्ट्र देखील याच गर्तेत गटांगळ्या खातोय?
"महारष्ट्र मेला तर राष्ट्र मेले  मराठ्याविना राज्य गाडा न चाले "
अशी ज्याची ख्याती,त्याला देखील ह्या सरकारने नपुंसक बनवाव ?
सत्तेसाठी सत्वाचा आणि तत्वाचा लिलाव मांडणाऱ्या या लोकांना
महाराष्ट्राच्या शहाण्या सुशिक्षित लोकांनी ह्या सरकारला दाखवून दिले पाहिजे
कि आम्ही शिवरायाचे वंशज आहोत
२०१४ च्या निवडणुकीचे ढोल वाजू लागले आहेत
खांदेपालट होवू लागली आहे
हवे असणारे जवळ आणि नको असणारे दूर लोटू लागले आहेत
अल्पसंख्यच्या नावावर केवळ आणि केवळ मुस्लिमांची खुशामत चालली आहे
परीक्षा तोंडावर आली असताना सच्चर समितीच वादळ
घोंघावत असताना शहामृगा सारख वाळूत तोंड खुपसून
वादळ शामायाची वाट पाहणार आहात का ?
बघा विचार करा रात्र वैऱ्याची आहे ,,,


Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

एकच थप्पड पण तीच वेळीच मारली असती तर?

माझ्या लहान पणी ऐकलेली गोष्ट एका चोराची एक लहान मुलगा त्याला कुणीच खेळायला घेत नसे. या गोष्टीचा आईला हि त्याच्या खूप राग येत असे वाईट वाटत असे एकदा काय झाल त्या खेळणाऱ्या मुलांचा बॉल चुकून या मुलाच्या घरात शिरतो त्या मुलाची आई तो बॉल आलेला पाहते आणि आपल्या मांडी खाली लपवते.  जेणे करून तो आपल्या मुलाला खेळायला मिळेल. ती खेळणारी मुल येतात आणि "काकू आमचा बॉल आला का हो ईकडे "अस विचारतात. आई अर्थातच नाही अस खोटच सांगते मुलगा हे सर पाहत असतो आणि त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतो . हळू हळू त्या लहान मुलाला हि तशीच सवय लागते तो लहान सहन चोर्या करू लागतो . आणि आईला आणून देवू लागला.आई हि माझ्या राजा म्हणून त्याला कुरवाळत असे. कालांतराने तो थोडा मोठा झाल्यावर तो मोठ्या चोर्या करू लागला . मग अर्थातच पुढे डाके घालू लागला आणि एक दिवस डाका घालायला गेला असता त्याच्या हातून खून होतो अथक प्रयत्ना नंतर पोलीस त्याचा छडा लावतात आणि त्याला मुद्देमालासकट अटक करतात खटला होतो न्यायालय त्याला फाशीची सजा सुनावत. आणि तो दिवस उजाडतो त्याच्या फाशीचा ,,, न्यायालय त्याला शेवटची ईच्छ विचारते तो...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...