Skip to main content

एका रात्रीची गोष्ट अर्थात ,,,

आजचा दिवस माझा सर्वांग सुंदर असा मराठी चित्रपट पाहण्यात आला
आणि नेमका १ मे महाराष्ट्र दिनाच्या आसपास चित्रपट यावा आणि जमल्यास सचिन खेडेकरांनी सदर केलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा खरतर हीच सदिच्छा व्यक्त करायला हवी ईतक्या उच्च दर्जाचा अभिनय आणि चित्रपटच सादरीकरण झाल आहे
कथा ,,
चित्रपट सुरु होतो तोचमुळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची
कधीही पडण्याची शक्यता आहे विरोधक देव पाण्यात बुडवून बसले आहेत ,सारेच गुढघ्याला बाशिंग बांधून बस आता हा जाणार आणि मीच मुख्यमंत्री होणार या दिवा स्वप्नात रमलेले आणि ,,,

साऱ्यांचे डाव उधळत,साऱ्या विरोधकांची विकेट घेत ,साऱ्या बातमीदारांना ,टीव्ही वाल्यांना उघडे पडत
आपल मुख्यमंत्रीपद तर सचिन राखतातच वर महाराष्ट्रासाठी विशेष
प्याकेज हि घेवून येतात ,,,,
चित्रपट सुरु होतो एका हुशार ,बुद्धीमान माणूस आपल्यासमोर येतो
साऱ्या विरोधकांना तोडीसतोड असा जबाब देणारा मुख्यमंत्री
आपल्या विरोधकांना त्यांची योग्य ती जागा दाखवणारा ,,
वेळात वेळ काढून एका लग्न समारंभात येतो
आणि ,,,
सारेच प्रतिष्ठित व्यापारी ,उद्योगपती ,मोठ मोठे अधिकारी आलेले असतात लग्न घरातील मंडळी या साऱ्यांची ओळख करून देत असतात मुख्यमंत्री आले म्हंटल्यावर उठून उभे राहतात ओळख-पाळख करून घेतात
एक मनुष्य मात्र तसाच बसून असतो ,,
ईकडे मु.म च्या तळपायाची आग मस्तकात जाते मला पाहून सारेच
उठून उभे राहतात हा कोण मोठा टिकोजी राव असा अहंभाव निर्माण होतो
त्यातच त्याच्या तोंडून त्या वृध्द माणसासाठी एक शिवी बाहेर पडते
आणि त्याला मग समजते कि सदर मनुष्य आंधळा गायक आहे,,
आणि आता मात्र मुख्यमंत्री शरमेने जीव का नाही गेला ?
असा त्याला वाटत त्या आंधळ्या गायकाने हातात मिळवलेला हात
कसाबसा सोडवतो जीव कासावीस होतो 

घसा हि कोरडा पडतो,लग्नात हि थांबत नाही ,,
चुकून का होईना माझ्या हातून चूक झाली आणि ते हि
एका आंधळ्या व्यक्तीचा अपमान झाला याची बोचणी त्याला पडते
आणि ईथुन पुढे सुरु होतो एका रात्रीची गोष्ट ,,,,,,

तो वृद्ध कलाकाराने त्याला एक पत्र दिलेलं असत त्यात 
आठ वर्षापासून चकरा मारतोय पण मला 
एक गायक म्हणून एका घराची मागणी केली आहे 
ती अजून पूर्ण झाली नाही अस त्यात लिहिले असत ,,,
निदान आपण तरी यात लक्ष घालवे अस त्यात असत आणि मग 
काहीही करून त्या वृध्द कलाकारच्या आपल्या हातून चुकून झालेल्या अपमानाची
आता त्याला भरपाई करायची असते आणि ती हि एका रात्रीत ,,,,?
आपल्या मुख्यमंत्र्याच्या अधिकारात तो सर्वांना कामला लावून
त्या वृध्द गायक कलाकाराला एका रात्रीत घर मिळवून देतो
साऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवत
आपल्या अधिकारच वापर करत
अत्यंत सुंदर तरल असा अभिनय सचिन खेडेकर यांनी केला आहे
कदाचीत असा संवेदनशील मुख्यमंत्री हे आपल दिवास्वप्न असेल हि
पण आज ते पाहायला नक्कीच पाहिजे नाहीतर
या महाराष्ट्र भवानीला तरी कस कळेल आपल्याला कसा
मुख्यमंत्री हवाय ?
तात्पर्य-- ज्या निर्लज्ज मंत्र्यांना आता काय मी त्या
धरणात मुतू का म्हणायला जराही लाज वाटत नाही
अशाच्या या महारष्ट्राला एका हळव्या संवेदनशील आणि तितकाच
मुख्यमंत्र्याच स्वप्न किती परवडणार आहे देव जाणे पण आज
खरतर अशाच मंत्रायंची गरज महाराष्ट्राला आहे
आई भवानी ऐकते आहेस ना?


Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...