Skip to main content

केवळ आणि केवळ बाई असते मादी असते उपभोगाच साधन असते

एकदा ग्रीकचा आजारी पडला काही केलं उपाय पडेना
मग सगळ्या वैद्यांच एक मत पडल कि
महाराजांना जो आजार झाला आहे त्याच प्रकारचा रोगी शोधून
जर त्याच्या पित्ताश्यातून जर औषध महाराजांना दिल तर नक्की फरक पडेल.
पण पित्ताशायातून म्हणजे त्याला माराव लागेल
राजाने न्यायधीशाला विचारून कायदेशीर सल्ला घेतला
अर्थातच न्यायधीशाने राजाला खुश करण्यासाठी समती दिली.
त्या करण्यास हरकत नाही असा सल्ला दिला
त्याप्रमाणे राजाचे सैनिक तसा रोगी शोधण्यासाठी बाहेर पडले
त्याप्रमाणे एका मुलाला पकडले हि कर्मधर्म संयोगाने तो गरीब
होताच घरच्यांना पैशाची लालूच देवून मग त्याला ताब्यात घेण्यात आल .
त्या मुलाला राजधानीत घेवून आले
आता कसायाच्या हाती देवून त्याला मरणार तोच
तो मुलगा आक्षाकडे पाहत जोरजोराने हसू लागला
राजा आश्चर्यचकित झाला कि आता मुलाची खांडोळी होणार
मरणाच्या दारात हा उभा आहे आणि हा हसतोय का?
राजाने त्या कसायला थांबावयास सांगितले आणि त्या मुलाला विचाराले
अरे आता तुला मारलं जाईल पाच मिनिटात तुझ शीर धडावेगळ केल जाईल ,
आणि तू हसतोस ?
तेव्हा तो मुलगा म्हणाला ,,,
ज्या मुलाचे प्राण वाचण्यासाठी आईवडिलांनी जीवच रान केल पाहिजे ,,
तेच चार रुप्ड्यासाठी विकतात ,,
न्यायमूर्ती राजाला एका निरपराधी माणसाचा जीव घ्यायला परवानगी देतात ,,,
आणि जो राजा प्रजेचा रक्षक तोच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी
प्रजेचा भक्षक बनत आहे ,,,
अशा असहाय अवस्थेत मी कुणाच आश्रय घ्यावा या विचाराने
मी दुनियेचा मालक देवाकडे पाहून हसत आहे ,,
जगाची रीत लीला कळली आता देवा तुझी पाळी
मारेकऱ्याने उगारलेल्या तलवारीच तू काय करणार आहेस?
माता पिता ,राजा ,न्यायाधीश ,तो कसाई यांच्या पापात तू
देखील सहभागी होणार का ? या विचाराने मला हसू येत आहे
अर्थातच राजाचे डोळे उघडतात आणि त्या मुलाला तो
माफ करतो सोडून देतो,,,,,,,,,,,,,,
तात्पर्य ,,,
आज देशभरात घडणाऱ्या बलात्काराला आपणही नकळत
असाच हातभार तर लावत नाही ना?
केवळ स्वतःला बर वाटाव ,आपल्याला आवडत म्हणून आधी
फ्याशनेबल कपडे लहान मुलांना आणि त्याच पठडीतले उत्तन कपडे
घालून आजूबाजूच्या लोकांना चाळवून मग जर बलात्कार
होत असतील तर यात दोष कुणाचा ?
 मला माहित आहे आणि मलाही कळत कि अगदी महाराजांच्या काळात हि
 बलात्कार घडत होते
 पण त्याच प्रमाण किती होत ते कधी तरी तपासल का?
 आणि महाराजांसारखा राजा असल्यावर असे कितीसे बलात्कार होत असतील ?
 जर हे मान्य नसेल तर सरळ सरळ तुम्ही महाराजांवर आरोप लावत आहत
 हे हि एकदा मान्य कराव लागेल,,,,?
मला हेही कळत कि लगेच कपडे सरळ साधे झाले तरी बलात्कार
थांबणार नाहीत ,,
 पण थोडा फार तरी आळा नक्कीच बसेल हे तरी मान्य करणार कि नाही?
 सरकार ,पोलीस,आमदार ,खासदार आपल्या मागे महाराजां प्रमाणे उभे आहेत का ?
 मग हि परिस्थिती बदलण्याचा आपण प्रयत्न हि नाही करायचा का?
 बलात्काराच्या घडणाऱ्या घटनांन मागे बऱ्याच करणा पैकी हे हि एक कारण आहे,
हेलनला पाहून कुठल्या आई बापाने सिनेमा पाहताना कधी शिट्या मारल्या ते जरा विचारा?
 आज सिनेमातली प्रत्येक नटी आपण किती आणि कसे उत्तान दिसू याचीच
 काळजी घेताना दिसत आहेत आणि त्याचीच री समाजात ओढली जाते आहे हे हि
 मान्य करणार कि नाही ?
ज्या ८५% स्त्रीयांच उदहरण दिल जात कि त्या अंगभर असा पंजाबी ड्रेसच घालतात
 या पंजाबी ड्रेसची व्याख्या नक्की काय हे कुणाला तर विचारलत का?
 आज सगळ्यात घाणेरडा ड्रेस असेल तर तो पंजाबी ड्रेस
 जो लेगीजच्या नावावर खपवला जातो तो कुठून तरी चांगला दिसतो का?
 या उलट सर्वात उत्तान असा हा ड्रेस आहे कुणी आंधळाहि सांगेल
 आधी बरेचदा या ड्रेस वर ओढणी घायाचीच नाही असाच नेम असावा
 ज्याला कमीझ म्हणावा असा शर्ट किती आखूड असावा याची जणू शर्यत असते .
 बर उत्तान कपडे काय फक्त उच्चभ्रू वस्तीतच घातले जातात का?
 अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे बाटगे जास्त मोठी बांग देतात हे   विसरलात का?
मग हे जर सार माहित असेल थोड का होईना मान्य असेल
छत्रपती शिवरायां सारखा राजा आज नसेल
तर आपणच हे सारे होणारे प्रकार थांबवण्यास मदत करणार कि नाही ?कि यात आपल्याच बहिणीचा ,बायकोचा ,नातेवाईकांचा बळी जाण्याच वाट पाहणार आहत का?
आपल्याच घरातील मुलगी बलात्कारी म्हणून समोर येईल त्यावेळी
तुमची नेमकी काय प्रतिक्रिया असेल ?
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट सांगताना
आपण नेमक हे विसरतो कि महाराजांना ती सून बाई सारखी नाही दिसली तर ती आई सारखी दिसली आणि
प्रामाणिक पणे आयांनी स्वतःला प्रश्न विचारावा आपण
खरच आई सारखे दिसतो का? आई सारखे राहतो का?
या गोष्टीतल्या राजाला जशी सद्बुद्धी प्राप्त झाली
व त्याने आपली चूक सुधारली हीच सद्बुद्धी आपणास हि मिळो
आणि नाही मिळाली तर तर बालात्कार्यांच्या यादीत
आपला,आपल्या मुलीचा ,नातेवाईकांचा ,मित्रांचा ,आज नाही तर उद्या कधी ना कधी आपला नंबर लागणार हे लक्षात ठेवा
कारण लिंगपिसाटाला आई बहिण काहीही कळत नसते
तिने अंगभर कपडे घातले आहेत का तोकडे याच्याशी त्याला काहीहि
घेण देण नसत त्याच्यासाठी त्या क्षणाला ती केवळ आणि केवळ बाई असते मादी असते उपभोगाच साधन असते
बघा जमल तर विचार करा
मग या पापात आपणही सहभागी होणार का ?


Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल