Skip to main content

सचिन,क्रिकेट आणि बागी पानसिंग तोमर

का कुणास ठावूक पण
पानसिंग तोमारचा सिनेमा आणि सचिनचे शतक दोन्ही एकदम आले, आणि पानसिंगच्या कार्तुत्वापुढे सचिन आणि क्रिकेट खुज वाटू लागल हे नक्की,,
घरची प्रचंड गरिबी धावता येत हेच भांडवल प्राथमिक शिक्षण घेतलेल्या पानसिंग तोमरने मग
"मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट"अस म्हणत लष्कराचा रस्ता धरला.वडील,आई, बहीण दुसऱ्याच्या शेतात काम करीत,भांवडांनाही कामाला जावं लागायचं.
अशा परीस्थित हा लष्करात सामील झाला त्यातही मोठ्ह कारण
त्याला खायला भरपूर लागत असे आणि खेळाडू म्हणू ते त्याला
लष्करात मिळत होते,,
पण दुर्दैव पहा त्याला डाकू म्हणून जितकी प्रसिद्धी त्याला मिळाली तितकी खेळाडू म्हणून नाही मिळाली 

आणि सिनेमात तसा एक डायलॉग देखील आहे ,एकेठिकाणी तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा देवून तो एक यशस्वी
अपहरण करतो लगेच टीव्हीवर आणि रेडीओवर बातमी झळकते डाकू पानसिंग ने अस केल त्यावेळी पानसिंग उद्वेगाने म्हणतो,
"देशासाठी सुवर्ण पदक जिंकत होतो त्यावेळी काल कुत्र विचारात नव्हत आणि तीन राज्यांच्या पोलिसांना चकमा काय दिला सगळीकडे नाव झाल,,,?"
पायात घालायला नीट बूट नसताना पानसिंग तोमरने
या देशाला
(१)-२३ वी राष्ट्रीय स्पर्धा कटक १९५८

३००० मिटर्स स्टीपलचेस प्रथम ९ मिनिट १२.४ सेकंद राष्ट्रीय विक्रम,
(२)-२४ वी राष्ट्रीय स्पर्धा त्रिवेंद्रम १९५९

५००० मीटर प्रथम १४ मिनिट ५४ सेकंद राष्ट्रीय विक्रम
३००० मीटर स्टीपलचेस प्रथम ९ मिनिट १७ सेकंद.
(३)-२५ वी राष्ट्रीय स्पर्धा नवी दिल्ली १९६०

५००० मीटर प्रथम १४ मिनिट ४३.२ सेकंद 
३००० स्टीपलचेस प्रथम ९ मिनिट ०७.८ सेकंद
(४)-२६ वी राष्ट्रीय स्पर्धा जालंधर १९६१

३००० मीटर स्टीपलचेस प्रथम ९मिनित ०२.३ सेकंद राष्ट्रीय विक्रम
----
बर हे सार पानसिंग तोमार्च्याच बाबतीत या देशात घडत अस नाही असे असंख्य खेळाडू असतील जे योग्य संधी अभावी मागे पडत असतील त्यांना सरकार मदत करताना हात आखडता घेत असेल,,नव्हे घेतेच .
काय हव या गुणी खेळाडूंना जे देशासाठी खेळतात?
फक्त पाठीवर मदतीचा हात लई मागण न्हाई देवा लई मागण न्हाई..

त्यांना हवा एका साधा संधीप्रकाश हवा ज्या प्रकाशात देशाच नाव उज्ज्वल करतील असे एकसो एक हिरे ईथे आहेत,,
आणि वयोमानानुसार ज्यांच्या माथ्यावरचा सूर्य देखील अस्ताला गेला आहे असे हि काही निर्लज्जपणे म्हणतात मी आज माझ शतक झाल म्हणून निवृत्ती घेतली तर लोक स्वार्थी म्हणतील
अरे खरतर यातच तुमचा स्वार्थीपणा दिसून येतो किती काळ आपण एक जागा अडवून ठेवायची?
अजून किती पैसे कमवायचे आहेत?
अजून किती देश फिरायचे आहे?
किती जाहिराती करायच्या आहेत?
अजून किती घर बांधायची आहेत ?
किती गाड्या घोड्या घ्यायच्या आहेत ?
अरे माणूस आहत कि जनावर ?
खरतर यांना जनावर म्हणान त्या जनावरचा अपमान आहे कारण,पोट भरल्यावर जनावर हि पुन्हा तोंड लावत नाही आणि हे ?श्शी लाज वाटते अशा लोकांची आणि त्याहून लाज वाटते अशा लोकांना जे लोक डोक्यावर घेतात त्यांची देखील ,,

केवळ एका शतकासाठी ३३ सामने गमावले याची जराही खंत नाही?
आणि या शतकांचा फायदा नेमका कुणाला ?देशाला ?कि स्वतःला?
अस नेमक काय घडल सचिन ने शतक ठोकल्यावर त्याच एकदा संशोधन होवून जाऊदे
क्रिकेट सामने खेळले जात असताना या देशाच उत्पन्न वाढल कि कमी झाल ?
आणि अस जर या देशात घडत असेल तर सुभेदार या पदावर असलेला पानसिंग तोमर डाकू झाला तर ती चूक कुणाची?
वयाच्या ५० व्या वर्षी पोलिसांच्या हातून तो मारला गेला
ह्याला जबादार कोण?
पुन्हा जाता जाता सिनेमाचा सुरवातीचा एक डायलॉग सांगावासा वटतो.पत्रकार विचारतो ,तुम्ही डाकू कसे झालात ?
त्यावेळी पानसिंग बोलतो
"हम डाकू नाही हम तो बागी है साले डाकू तो सांसद में बैठे है,,,,


Comments

  1. Hi Sunil,
    Sagar Bhunje commented on your note "सचिन,क्रिकेट आणि बागी पानसिंग तोमर."
    Sagar wrote: "हम डाकू नाही हम तो बागी है साले डाकू तो सांसद में बैठे है,, jabardast"

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...