Skip to main content

हृदयाच्या भिक्षा पात्राला मनाच भोक

आज ह्या ईमेल ईंटरनेटच्या जगात
मला वाटल नव्हत मी वाचलेल्या गोष्टींचा संदर्भ
म्हणुन मला वापर करता येईल ,,,,,,
कालच मी आ.मा. सुरेश जी कलमाड़ी जी यांच्या विस्मरनाची गोष्ट लिहली होती आणि परत त्यांनी त्यांची 

शरद वारसा कडून हक्काने मिळालेली टोपी फिरवली 
 दिवसापूर्वीमला काहीच आठवत नहीं मला विस्मरनाचा
आजार झालाय अस डॉक्टरांकडून वदवून घेतलं होत
आज अचानक म्हणाले ,,,,,
"नाही माझी स्मृती ठीक आहे मला हृदयाचा विकार आहे"
आणि लहान पणी वाचलेली त्या साधूची गोष्ट आठवली ,,,,,
एक हरिवंश नावाचा राजा त्याच्या
उदारपणा साठी खूप प्रसिध्द होता .
एकदा दरबारात बसला असता एक साधू त्याच्या कडे आला
राजाचा दंडक होता दरबारात जो पहिला त्याची जी असेल ती ईछापुर्ति करायची,,,
आणि आज साधू पहिला आला होता,
त्याचे यथायोग्य स्वागत करून राजाने विचारलं साधू महाराज तुम्हाला काय हव?
साधू म्हणाला राजा तुझ्या
उदारपणाची कीर्ती ऐकून मी आलो आहे.
हे घे माझ भिक्षापात्र त्याला सोन्याने भरून टाक,,,,,
राजाने ते भिक्षा पात्र भरायची आज्ञा दिली
राजाचा खजिना रिकामा झाला पण भिक्षा पात्र काही भरायचं नाव घेईना,,,
शेवटी राणीचे, राजपुत्रांचे हि दाग दागिने त्यात टाकण्यात आले .
पण तरीही भिक्षा पात्र रिकामाच,,,
आता मोठा  प्रश्न राजा समोर उभा राहिला,
शेवटी साधू म्हणाल राहूदे राजा मी जातो तुला नाही जमणार ,
काय होईल तुझा दंडक मोडेल तुझ्या कीर्तीला बट्टा लागेल
जातो मी अस म्हणू साधू निघाला तस राजाने त्यांना
अडवून सांगितले महाराज हे भिक्षापात्र जादूचे असेल भरणार कसे?
त्यावर साधू म्हणाल राजा हे भिक्षा पात्र जादूचे नाही तर ते
माणसाच्या हृदयापासून बनवले आहे आणि त्याला मनाच भोक पाडलं आहे .

त्यामुळे ते कितीही भरलं तरी रिकामाच राहणार ,,,,,,
ह्या खोट्या गोष्टीनी भरण्यासाठी ते भिक्षापात्र बनलेलं नाही
तात्पर्य----कारण त्यात धन दौलत अधिकार कशानेही ते भारत नाही
ते रिकामाच राहत माणसाच हृदय कधी भरेल जेव्हा त्याच मन भरेल,,

आणि हे न समजल्या मुळेच मनुष्य हे सार नश्वर जमवत असतो
उद्या जगण्याचा ईर्षे पाई आज मरत असतो .
 
कलमाडी सारख्या हरामखोर नेत्यांची अवस्था अशीच आहे
याचं मन हृदय कधी भरणार?
त्यासाठी 
जेल मधून सुटण्यासाठी नाही नाही ती
सोंग अवलंबली जात आहेत ईतके पैसे कि रुपये खाल्ले आहेत तरी अजून नव्याने भ्रष्टाचार करण्यासाठी ते आजारी पणाची टोपी फिरवत आहेत
पूना कॉफी हाऊस’च्या गल्ल्यावर बसून ‘ए उनको पाणी दो’ 
असा आवाज देणारा हा उडप्या
‘मी पळणारा नाही, पळविणारा आहे,’
अशी दर्पोक्ती करणारा हा कलमाड्याला
अखेर आज सीबीआयने अटक केली.
आणि कलमाडी हे तिहार जेलचे ‘नंबरकारी’ झाले
मी एकटा नाही’ असा आरोप करणारे कलमाडी त्यांच्या सोबतचे ‘दुकटे’ कोण आहेत याबाबतआता तरी तोंड उघडणार आहेत का? 

का फक्त आजारी पणाच सोंग घेत राहणार आहेत.

Comments

  1. यांची सोंग आणि ढोंग भारतालाच फार महागात पडते राव

    ReplyDelete
  2. एकदम मस्त .. आज वाचले

    आपली नम्र वसुधा
    ***
    .... सगळे रस्ते बंद होतील, तेव्हा फक्त विश्वास ठेव
    जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साद देतो देव



    आपली नम्र

    kulvasu21@gmail.com

    ‘गुरुकृपेवाचूनि कैसा कोणी जाणेल कृष्ण । कृष्णकृपेवाचूनि कैसे मिळेल गुरुप्रेम ।। अवचित आला क्षण अमृत भाग्याचा । श्रीगुरुंनी पेरिला बीज नामाचा ।। ऐसा थोर गुरु लाभला कृष्ण कृपे । अन् कृष्ण आम्ही देखिला डोळा गुरुकृपे ।।

    ReplyDelete
  3. तात्पर्य----कारण त्यात धन दौलत अधिकार कशानेही ते भारत नाही
    ते रिकामाच राहत माणसाच हृदय कधी भरेल जेव्हा त्याच मन भरेल,,
    आणि हे न समजल्या मुळेच मनुष्य हे सार नश्वर जमवत असतो
    उद्या जगण्याचा ईर्षे पाई आज मरत असतो .
    कलमाडी सारख्या हरामखोर नेत्यांची अवस्था अशीच आहे
    याचं मन हृदय कधी भरणार?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...