Skip to main content

मेक्सिको महापौर ,*न्यायासाठी थेट कारवाई करणारे नागरिक* आणि आपण

मेक्सिको माफिया, मेक्सिको फूड,मेक्सिकोने पटकावले नोबेल पुरस्कारावर तर नावच कोरलेलं , याचा जसा आदर्श जनसामान्यांना असेल तर मला वाटत
*न्यायासाठी थेट कारवाई करणारे नागरिक*
 हा आदर्श देखील लोकांनी ठेवायला हवा,,,
 तर झालंय अस की मेक्सिकोतील चिआपास हे सर्वात लहान गरीब पण प्राचीन *माया संस्कृती* चा वेध आणि शोध घेणाऱ्यांचे अतिशय आवडते राज्य
 या *चिआपास मधील ही परवाची गोष्ट,,,,*
 चिअसपास मधील सांतारिटा या गावातील सामान्य शेतकरी इतके संतापले की त्यांनी,, *आपल्या महापौराला त्याच्या कार्यालयातून खेचून काढले  त्याचे हसत पाय बांधून नन्तर ट्रकच्या दोरखंडाने जखडले आणि सरळ त्याचज धिंड काढली*
 तो महापौर जॉर्ज लुईस हरणांडेझ याचा गुन्हा एकच होता तो म्हणजे,,,,*
 *निवडून येण्याआधीपासून आणि सतत नन्तरही तो नागरिकांना सांगत असे की आता आपले सगळे रस्ते चांगले होणार बघा आता मी कसे सगळे रस्ते गुळगुळीत करतो ते*
 त्याच्या या अच्छेदिनच्या वायद्यावर नागरीकांनी विश्वास ठेवला बरेच दिवस वाट पहिली,,,
 परंतु हा महापौर म्हणजे नुसतेच *शब्द बापुडे केवळ वारा,,,* आहे *एक नंबर फेकू आहे* हे लोकांच्या लक्षात आलं तेव्हा आधी त्याला,,,
 *ऑफिस मधून बाहेर खेचून मस्त फटकवला*
 परन्तु त्या नन्तर ही बरेच दिवस रस्त्याची दुरुस्ती काही वेग घेईना आणि मग मात्र सारे संतापले त्यांनी सरळ या महापौराची धिंड काढली,,,
 मग अर्थातच पोलीस मदतीला धावले महापौर थोडक्यात बचावला,,
 *तसा हा प्रकार थोडा मवाळच म्हंटला पाहिजे*,,
 याचे कारण काही महिन्यांपूर्वी एका महापौराला शपथ घेतल्या नन्तर काही तासातच थेट यमसदनीच
 पाठवण्यात आला होता,,,,
*असे बेधडक खोट बोलणारे नेते जगभरात आहेत*
नेते जेव्हा ही असली खोटी विधान * जुमले* बेधडक जाहीर बोलतात तेव्हा ही सांतारिटा तील लोक *जुमले की अश्वांसन* असला विचार न करता
रस्त्यावर डांबर पडले नाही रोडरोलर फिरताना दिसला नाही म्हणत सरळ कायदा हातात घेतला,,,
(तिथे महापौरा होता इथे वाचताना प्रधान सेवक ठेवला तरी चालेल कुणीही नाही )
*11 जणांना अटक देखील झाली आहे परन्तु झालेल्या अटके पेक्षा,,,,हा फेकू महापौर इतके दिवस थापा मारत मिरवत कास होता त्याला रस्त्यांची दुर्दशा दिसत नव्हती का हा त्यांचा प्रश्न आहे?*
*त्या मारहाणीतून सुटका झालेला महापौर
आता सगळीकडे माझ्या पायाला दोरखंड कसा बांधला मला जखडून कसे खेचत नेले याची दर्दभरी वर्णने करत फिरत आहे (रडक्या प्रधानांची आठवण आली)*
*मात्र ही दर्दभरी कहाणी सांगताना वेळेत रस्ते का बांधले नाहीत हे मात्र बोलताना आवर्जून टाळतो*
(अगदी अस्सच आपल्याकडे ही घडतच आहे राहुल काँग्रेस सोनिया पवार हे कमी की काय म्हणून नेहरू देखील🤣😝😝कित्ती कारण द्यायची?)

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...