Skip to main content

अब_बस_कर_मोदी


#अंडज_बोलतात
#करे_कोई_भरे_कोई_हे_सगळं_पाप_काँग्रेसचं,,,
तेव्हा माझ्या लग्नाची गोष्ट आठवते आज 34 वर्षे झाली त्यावेळी नुकतीच नोकरिवाली बायको पाहिजे अशी नवी फेशन सुरू झाली होती ( आज ती गरज असली तरी मला मंजूर नाही असो,,,)
तर त्यावेळी मला ही काही मित्रांनी सल्ला दिला अरे नोकरी वालीच बघ
नुकताच मिसरूड फुटलेला मी ही सहज बोलून गेलो नोकरीवालीच बघू
तसा बापाने कानाखाली जाळ काढला
भडव्या जी लक्ष्मी करून घरी आणायची तीला बाहेर कामाला पाठवणार होय रे???
जी मुलगी करून आणणार तिला सांभाळायची ताकद तुझ्या मनगटात नसेल तर गाढवा लग्नच करू नकोस
#लग्न म्हणजे #जबाबदारी तिच्या बापाला ती जड आहे म्हणून तुझ्याशी लग्न नाही लावत आहेत ते
आमच्यवरचा विश्वास आणि तुझी कर्तबगारी
आपलं समाजातल वजन प्रतिष्ठा पाहून तुला ते मुलगी देत आहेत
तू जर #ही_जबाबदारी_पेलायला स्वतःला त्या लायकीचा समजत नसशील तर लग्नच करू नकोस
तुझ्या मनगटात जोर नसेल तर हे शिवधनुष्य उचलूच नकोस तो दिवस आहे आणि आजचा दिवस
कानात शिस ओतल्यासारखे पडलेले शब्द मी विसरलो नाही
आणि आज जेव्हा ही 56 इंची पिलावळ दंड थोपटून आम्ही यावं करू त्याव करू ( खर तर म्याव म्याव करत होते आम्ही मूर्ख डरकाळी समजून बसलो )
370, राम मंदिर, सारखे प्रश्न आणि ये पाकिस्तान को प्रेमपत्र लिखाना बंद करना चाहीये, दुष्मन जो भाषा समजती है उसी भाषा मे जवाब देना चाहीये
सारख्या डायलॉग वर खुश होत टाळ्या पिटत #सत्तासुंदरीशी_पाट लावून दिला पण आता हे सारं पाप काँग्रेसचं म्हणत जेव्हा स्वतःचा #56_इंची_नामर्दपणा जेव्हा पिटतात हेच का ते जे काँग्रेसच्या नामर्दपणला नाव ठेवत होते? असा प्रश्न पडतो
स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अजून किती निलाजरेपणा करणार?
#अब_बस_कर_मोदी
अशी म्हणायची पाळी येते

Comments

Popular posts from this blog

पुन्हा ते कधी हरले नाहीत,,

ऑलिंपिक ज्योतीचे गुरुवारी ग्रीस मध्ये प्राचीन ओलीमपिया येथे पारंपारिक  पद्धतीने प्रज्वलन करण्यात आले. या ऑलिंपिकची एक आठवण  ऑलिंपिक स्पर्धेत बास्केट बॉल हा एक प्रसिध्द खेळ , बास्केटबॉल चा समावेश १९३६ मध्ये करण्यात आला  तो पर्यंत ८ ऑलिंपिक स्पर्धेत ६३ सामने खेळताना अमेरिका एकही सामना हरला नव्हता. १९७२ मध्ये म्युनिच ऑलिंपिक या खेळातील सुवर्णपदकासाठी  अमेरिका रशिया याच्यात सामना झाला ,,आणि, सामन्याचे काही सेकंद बाकी असताना अमेरिकेने ५०\४९ अशी आघाडी  घेवून चेंडू रशियाच्या हातात दिला रशियाने  टाईम-आउट मागीतला ,अमेरिकेने तो नियमबाह्य असल्याचे  अपील केले , मात्र ते अपील पंचांनी फेटाळले, रशियन खेळाडूने चेंडू बास्केट करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू काही केल्या  बास्केट होईना , पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि,, सामना अमेरिकेचा हाती गेला पंचांनी अमेरिका जिंकल्याचे घोषित केले, अमेरिका जिंकली पण ,,, गोष्ट ईथे संपत नाही , आता रशियन समर्थकांनी स्कोररला घेराव घातला, त्याने  पंचांच्या आदेशां नंतरही घड्याळ ३ सेकंदांनी रिसेट केले नव्...

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्य...

आशेवर_असलेल्या_गाढवाची

 कृपया नमोंधांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये त्यांनी बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला अस म्हणत लांडोरच्या तालावर ताल धरावा आशेवर,,,,, काल माझे मित्र sameer gore यांनी घोड्याच चित्र टाकलं होतं आणि मला एकदम *#आशेवर_असलेल्या_गाढवाची* गोष्ट आठवली,,,, एक मस्त खाऊन पिऊन जाड जुड गाढव आणि दुसरं लुकड मरतुकड,,,, ते दोघे रोज नदीवर भेटत,,  दोघेही एकाच जातीचे असल्यामुळे एकमेकांची सुख दुःख हालचाल विचारत असत ,,, मग गप्पा मारता मारता मग काय ,,, अस बोलत ते धष्ट पुष्ट गाढव मग त्याच्या मालकाच कौतुक करत असे माझा मालक कसा चांगला आहे काम करून घेतो पण माझी काळजी ही तितकीच घेतो आणि भरपेट खायला देतो वेळच्या वेळी लागली तर दवा दारू ही करतो आराम करायला वेळ देतो थंडीत विशेष काळजी घेतो अगदी लहान मुलासारखं जपतो काय सांगू मित्रा अंथरून पांघरून ही घालतो खूप चांगला आहे *माझा मालक*,,,,, हे सारं ऐकताना दुसऱ्या गाढवाच्या डोळ्यात पाणी येत असे ,,, अरे काय सांगू मित्रा माझा मालक, उठता बसता लाथा घालतो वेळेवर जेवायला देत नाही अंथरून पांघरून सोड आजारी पडलो तर वेळेवर दवा दारू ही करत नाही,, अस ते गाढव रोजच तक्रार ...